Skip to main content

पितृ"पक्षी"

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 30/09/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कावळा अजब जीवखड्याशी खेळतो इहलोकीच्या अंगणी परलोक धुंडाळतो माझा कावळा गणिती तेरा आकडे मोजतो आठ नख्यांच्या अष्टकी पंचप्राण मिळवितो माझा कावळा तत्वज्ञ गुह्य विश्वाचे जाणतो जे जे पिंडी ते ब्रह्मांडी पिंड फोडून सांगतो पैलतीरी कोकताना हळवा का होसी काऊ जीवखड्याची रे माझ्या आज नको वाट पाहू
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6676
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आहे ते चांगले आहे,एक दोन मुद्दे विस्तार करून सांगितले तरी बरं होईल. आडवाटेला असलेला नाखुयात्री

देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

हा कावळा , बगळ्याच्या पोटी जन्माला आलेला दिसतोय . ( ह घ्या ) अजून एक आपण समर्पक चित्रे जोडता त्यामुळे तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अधिक जास्त खुलून दिसते .

In reply to by खिलजि

कवितेची पहिली ओळच आहे "माझा कावळा अजब" त्यामुळे तसा अजब कावळा शोधणे भागच होते :-) हमारे चित्रों की तारीफ के लिये शुक्रिया ! .

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्राची अश्विनी आपण योजलेला चित्रसाद आणि अत्रुप्त आत्मा यांनी योजलेला पांडू = पां डुब्बा. हे दोन्ही शब्दप्रयोग आवडले!

छान

आवडली रचना. -दिलीप बिरुटे

काव्य आवडले.... (स्वगत : खरे सांगायचे तर, कावळ्यासारखा उत्तम पक्षी नाही. वेळेच्या बाबतीत एकदम पक्का.आमच्या सौ.आईच्या घरी ११:३० ते १२:०० पर्यंत रोज जेवायला येतो.आणि त्याच्या, ह्याच वेळेच्या बाबतीत काटेकोर रहाण्याचा फायदा माणसांनी घेतला.सध्या आमच्या डोंबोलीत तरी, ज्या ठिकाणी पिंडदान करतात तिथे ९ते सव्वा ९ च्या दरम्यान कावळा लगेच तो भात खायला येतो.पण दुपारी १२ वाजता येत नाहीत.त्यामुळे, डोंबोलीत तरी पिंडाला कावळा, ९ ते सव्वा नऊच्या सुमारास नक्की शिवतो आणि इहलोकातील मृताचे नातेवाईक, नि:श्र्वास सोडतात....... कावळ्यांच्या बाबतीत ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यात इंग्रज पण मागे नाहीत....असा एक लेख वाचनांत आला होता.)