श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप
नमस्कार.
अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते. लेखकांनी उत्स्फूर्तपणे आपण केलेल्या प्रयोगांचे, प्रकल्पांचे, स्वनिर्मितीचे लेख पाठवले.
आणि विषयांचा आवाका तरी केवढा!
मातीच्या भांड्यांना रंगवून त्यांचं सौंदर्य खुलवण्याची कल्पना, 'वैद्यकीय डॉक्टर' असून Y2K वर केलेली मात, सायकलिंगच्या माध्यमातून दीडशे किलो वजन शंभरवर आणण्याचा अनुभव, आरत्या व श्लोक यांचा इतिहास व अर्थ, पेशवेकालीन गणेशोत्सव, जुन्या सूटकेसमध्ये बनवलेली सौर चूल, जगभरात एकल प्रवासाचा अनुभव, शून्यातून सुरुवात करत २००-३००-६०० किमी सायकलिंग, ब्लू टूथची तांत्रिक करामत, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहाद्दरांच्या सांगायलाच हव्यात अशा गोष्टी.... कला, तंत्र, विज्ञान, मनोनिग्रह यांचं मनोज्ञ दर्शन घडलं.
आणि प्रत्येक लेखाला मिळालेला मिपाकरांचा भरघोस प्रतिसाद!! असे लेखक आणि चोखंदळ वाचक हीच तर आहेत मिपाची बलस्थानं!
अर्थात आणखी काही उत्तम लेख प्रकाशित करता यायला हवे होते अशी हुरहुर आहेच आणि त्याबरोबरच 'पुढच्या वर्षी लवकर या' ही भावनासुद्धा आहे.
पुन्हा एकदा सर्व लेखकांचे व वाचकांचे मनापासून आभार.
ता.क.
आणि हो, आता वेध लागलेत दिवाळीचे.. फराळाचे.. आणि मिपा दिवाळी विशेषांकाचे!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रीगणेश लेखनमालेत माझा लेख
सुरेख झाली श्री गणेश लेखमाला.
छान झाली लेखमाला! आता दिवाळी
आपण घरात केलेले खटाटोप,फसलेले
सुंदर, रोचक आणि उपयोगी
जियो..