वाटणी - एक लघुकथा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते.
- 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला.
मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले.
पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता. त्याच्यापेक्षा पहिला माणूस अगदीच कमकुवत होता, पेटीला नुसता हात लावून तो मागेमागे चालत होता - स्वतःचा हक्क कायम ठेवत.
दोघे सुरक्षित स्थानी पोचले. पेटी खाली ठेवून दमलेल्याने विचारले - आता बोल, मला ह्यातील किती माल देणार?
- पाव भाग तुझा, रुपयात चार आणे.
- खूप कमी होतात.
- कमी नाही, उलट खूप जास्त देतोय. पेटीवर आधी मीच हात टाकला होता ना?
- ते ठीक आहे, पण हे धूड इथवर उचलून कोणी आणले?
- ठीक आहे. दोघांत अर्धे-अर्धे वाटून घेऊ. बोल, मंजूर?
- मंजूर. उघड पेटी.
पेटी उघडली. त्यातून हाती तलवार घेतलेला एक माणूस बाहेर पडला. तलवारीनी सपासप वार करत त्याने दोन वाटेकऱ्यांची चार तुकड्यात वाटणी केली !
(सआदत हसन मंटो ह्यांच्या 'तक़सीम' ह्या मूळ उर्दू कथेवर आधारित.)
* * *
ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :-
तक़सीम ही कथा प्रसिद्ध झाली १९४८ साली. पण तेंव्हा मंटोंना 'साहित्यकार' मानायला कोणी तयार नव्हते. अनेक लोकांना तर मंटोंना वेड लागलंय असा दाट संशय होता. पुढे वीसेक वर्षानंतर त्यांच्या साहित्याला लोकप्रियता मिळाली. मला स्वतःला ही कथा प्रतीकात्मक वाटते.
भाषान्तरातले न्यून ते माझे समजावे.
प्रतिक्रिया
खरी कथा एवढीच लहान आहे की
मंटोंची मूळ कथा छोटीशीच आहे,
कथा आवडली.
_/\_
छान लिखाण
आणि दुर्दैवाने तत्कालीन
आवडली ! बरीच अर्थपूर्ण आहे
आभार ! _/\_
परिणामकारक कथा.
थँक्यू !
ही कथा सुद्धा आधी वाचनात आली नव्हती. छान अनुवाद केला आहेत, धन्य
होय, आधीच मराठीत आलेल्या मंटो
छान अर्थपूर्ण कथा .
आभार !
कथा आवडली.
@ पद्मावति, आभार.
आवडली...
_/\_
छान अनुवाद. आवडली कथा
@ ज्योति अलवनि, आभार.
थोडक्यात पण सुंदर लघु कथा.
@ Sanjay Uwach,