बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
वाचने
85608
प्रतिक्रिया
194
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच
In reply to http://www.purnabramha.com by माहितगार
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा
In reply to खरे आहे.. सामान्यपणे मी तेच by आनन्दा
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
सहमत
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
आनंदराव
In reply to खरे तर परवा पूर्णब्रह्म वर by आनन्दा
कामतांनी भारंभार फ्रांचाईझी
In reply to आनंदराव by सुबोध खरे
नाही
पंडित कुलकर्णींचे ना?
In reply to नाही by नाखु
व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून
In reply to पंडित कुलकर्णींचे ना? by पिलीयन रायडर
हो? अरेरे... मी स्वतः थाळी
In reply to व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून by हतोळकरांचा प्रसाद
रसगंध
In reply to हो? अरेरे... मी स्वतः थाळी by पिलीयन रायडर
सेल्फ obsessed वाटत आहेत या बाई
Sprouted
भाषण झेपले नाही
अशुद्ध भाषाशास्त्राचे साशंकीत प्रयोजन
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
+१
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
खरचं भाषण झेपले नाही !!!!
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
त्या नाग पुर च्या आहेत
In reply to भाषण झेपले नाही by हुप्प्या
मी काय म्हणतो.
माझा विषय मुळातच वेगळा आहे -
In reply to मी काय म्हणतो. by मृत्युन्जय
तुमचा अपेक्शाभंग मी समजु शकतो
In reply to माझा विषय मुळातच वेगळा आहे - by आनन्दा
Sixer!!
In reply to मी काय म्हणतो. by मृत्युन्जय
हायला ! हा खरा पुणेरी तडका !
In reply to मी काय म्हणतो. by मृत्युन्जय
खेड शिवापूर आणि पुढेमागे इतकी
अगदी अगदी अस्संच होतं गवि सर.
In reply to खेड शिवापूर आणि पुढेमागे इतकी by गवि
विडिओ बघितल्यानंतर एक ना एक
वरती एक जहाल पुणेप्रेमी प्रतिसाद वाचला
पुण्यात प्रॉपर पुण्याचा
In reply to वरती एक जहाल पुणेप्रेमी प्रतिसाद वाचला by जेम्स वांड
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?म्हणजे शिक्रण, मटारउसळ, काकडी कोशिंबीर (खमंग काकडी) इ. का?शिकरणीचा उगम माहिती नाही
In reply to पुण्यात प्रॉपर पुण्याचा by गवि
.
In reply to शिकरणीचा उगम माहिती नाही by जेम्स वांड
...पुण्यात प्रॉपर पुण्याचा
In reply to वरती एक जहाल पुणेप्रेमी प्रतिसाद वाचला by जेम्स वांड
हम्म
In reply to ...पुण्यात प्रॉपर पुण्याचा by माहितगार
दहिवड्यात साखरेची चव घालणे हे
In reply to हम्म by जेम्स वांड
बाकरवडी
In reply to दहिवड्यात साखरेची चव घालणे हे by माहितगार
गुजराती लोकसंख्या
In reply to बाकरवडी by जेम्स वांड
तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची !
In reply to गुजराती लोकसंख्या by जेम्स वांड
मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी
In reply to तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची ! by माहितगार
शेवपाव वगैरे लेटेस्ट पदार्थ
In reply to मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी by प्रचेतस
जरा थांबा.
In reply to मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी by प्रचेतस
भज्याऐवजी काही ठिकाणी वडे
In reply to जरा थांबा. by अभ्या..
जसे आपण जाड पोहे भिजवून फोडणी
In reply to भज्याऐवजी काही ठिकाणी वडे by परिंदा
चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि
In reply to जसे आपण जाड पोहे भिजवून फोडणी by पिलीयन रायडर
नाही ओ, अगदी साबुदाणा
In reply to चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि by गवि
छे छे.. हे पहा.. https://www
In reply to चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि by गवि
अभ्याशेठ, पिराजी .. धन्यवाद.
In reply to छे छे.. हे पहा.. https://www by पिलीयन रायडर
हम्म
In reply to मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी by प्रचेतस
आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ
In reply to मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी by प्रचेतस
च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा
In reply to आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ by चिनार
तुम्हाला दावा कुठे दिसला ब्वा
In reply to च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा by अभ्या..
पण "गुळचट मिसळ" ह्या
In reply to च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा by अभ्या..
मिसळीत गोडवा आणून मिसळीच्या
In reply to पण "गुळचट मिसळ" ह्या by चिनार
छ्या..
In reply to च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा by अभ्या..
हम्म्म
In reply to छ्या.. by अभिदेश
कोण ?
In reply to हम्म्म by अभ्या..
वेदातील मिसळ
In reply to च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा by अभ्या..
च्यायला गड्डा मिसळ !
In reply to आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ by चिनार
कालच अमरावतीला चक्कर झाली..
In reply to आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ by चिनार
भांडणे लावू नयेत
In reply to तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची ! by माहितगार
मराठी बाणा
In reply to भांडणे लावू नयेत by जेम्स वांड
देवाला विचारलेल्या प्रश्नाचं
In reply to वरती एक जहाल पुणेप्रेमी प्रतिसाद वाचला by जेम्स वांड
हो का!
In reply to देवाला विचारलेल्या प्रश्नाचं by चिनार
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर
In reply to देवाला विचारलेल्या प्रश्नाचं by चिनार
अगदी असेच नाही. काही
In reply to प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर by ट्रम्प
+/-
In reply to अगदी असेच नाही. काही by बॅटमॅन
बंगाल आणि ओडिशा यांच्यामधील
In reply to +/- by सुनील
शिवाय, दूध फाडून त्याचे गोळे
In reply to बंगाल आणि ओडिशा यांच्यामधील by बॅटमॅन
मला वाटतं
In reply to शिवाय, दूध फाडून त्याचे गोळे by बॅटमॅन
पक्का बंगाली खवय्या/बंगला भोज प्रेमी खवय्या
In reply to मला वाटतं by जेम्स वांड