बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
वाचने
85608
प्रतिक्रिया
194
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर
In reply to देवाला विचारलेल्या प्रश्नाचं by चिनार
सहमत व्हायला होतय.
In reply to प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर by ट्रम्प
पुणेरी मिसळ
ते मिसळ इतिहास वगैरे खरंच
In reply to पुणेरी मिसळ by जेम्स वांड
नाशिकपण मिसळ स्पर्धेत
In reply to ते मिसळ इतिहास वगैरे खरंच by प्रचेतस
पुणेच पहिलं निघावं अशी माझी
In reply to नाशिकपण मिसळ स्पर्धेत by माहितगार
एस.पी.डी.पी.चाही इतिहास
एस.पी.डी.पी.चाही इतिहास
In reply to एस.पी.डी.पी.चाही इतिहास by माहितगार
बरं, पोटं भरली का आता तरी
छ्या
In reply to बरं, पोटं भरली का आता तरी by यशोधरा
फक्त वाईटाला वाईट म्हणलं तर इतका त्रागा?
In reply to छ्या by नाखु
मिसळ हा पदार्थ बहुधा पुण्यात
In reply to फक्त वाईटाला वाईट म्हणलं तर इतका त्रागा? by जेम्स वांड
मिसळ-पाव
In reply to मिसळ हा पदार्थ बहुधा पुण्यात by बॅटमॅन
तर काय!!
In reply to छ्या by नाखु
तथास्तु
In reply to तर काय!! by यशोधरा
हाहाहा
In reply to तर काय!! by यशोधरा
दादा, मी तुम्हाला काहीच म्हणल
In reply to हाहाहा by जेम्स वांड
ओके :)
In reply to दादा, मी तुम्हाला काहीच म्हणल by यशोधरा
थोडेसे अवांतर: एक ज्येष्ठ
ते
In reply to थोडेसे अवांतर: एक ज्येष्ठ by सतिश गावडे
वांड भौ
In reply to ते by जेम्स वांड
आयला काय अगोचर चेष्टा हो तुमच्या!
In reply to वांड भौ by नाखु
कोण हो ते?
In reply to थोडेसे अवांतर: एक ज्येष्ठ by सतिश गावडे
आज पुणे इट औट्स वर एकदम
असेल बाबा एखादेवेळेस चांगलेपन
In reply to आज पुणे इट औट्स वर एकदम by पिलीयन रायडर
तसेच दिसतेय रिव्ह्यू पाहता.
In reply to असेल बाबा एखादेवेळेस चांगलेपन by अभ्या..
खूप लिहावेसे वाटतेय, बऱ्याच
In reply to तसेच दिसतेय रिव्ह्यू पाहता. by यशोधरा
वरील रिव्ह्यू हा आनन्दा
In reply to खूप लिहावेसे वाटतेय, बऱ्याच by आनन्दा
मला हा वरचा रिव्ह्यू जरा
In reply to असेल बाबा एखादेवेळेस चांगलेपन by अभ्या..
सिंहासनावर बसवून बाजूला कुणी
In reply to मला हा वरचा रिव्ह्यू जरा by पिलीयन रायडर
सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा जरी घातली तरी लाल भोपळ्याची भाजी खायला मी हॉटेलात जाणार नाहीच :)=)) =)) =)) सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा घातली तर तो राजेशाही अनुभव घ्यायला मी हॉटेलात नक्की जाईन. नाहीतर इतके पारंपारिक कौतुक रु३५०+ मध्ये दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?! मात्र, लाल भोपळ्याची भाजी नक्की खाणार नाही... इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन ! :) (हघ्याहेवेसांन)इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते
In reply to सिंहासनावर बसवून बाजूला कुणी by डॉ सुहास म्हात्रे
इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन !बाकी पंख्याने वारा बिरा असले लाड असले तर कुणाला नको असतात? बरेचसे सलून्स न पार्लर्स न बार ह्या तर एका युएसपीवर दणकून चालतात. पर्सनल अटेन्शन महत्त्वाचे हो. पण खाण्याचा विचार करता बहुतेक हेच लॉजिक असते थाळीचे. नुसत्या डिश सिस्टमनुसार दोन डिश मागवल्या आणि त्या आवडल्या नाहीत तर पैसे वेस्ट जातात. पुण्यात तर २५० च्या खाली डिश दिसतच नाही. थाळीत एखादी भाजी आवडली नाही तर दुसरे तीन चार तरी पर्याय असतात. गुजराती वगैरे टाईपच्या थाळीत गुळचट भाज्यात एखादी तरी टेस्टी तिखी मिळुन जाते. बाकी भात वगैरे नॉर्मल आयटमला चवीपेक्षा टेक्श्चर, गरमपणा आदि भाग बघितले जातील पन दाळ किंवा रस्सा भाजीसोबत तोही खपून जातो. पापड, चटण्या, लोणची असे पदार्थ चार्जेस न भरता ताटात असतात त्यामुळे थाळी हा बराचसा सेफ मार्ग असतो हॉटेलात जेवायचा. पुण्यात दुर्वांकुर, सुकांता आदि मान्यवर थाळी हॉटेलात खाल्ले, इतरही ठिकाणी ट्राय केले पण फारसे नावीन्य अथवा एक्सलन्स जाणवला नाही. टिपिकल वाटीतल्या भाज्या, चपाती किंवा फुलके आणि स्वीट हे तर सोलापुरातही मिळते. किंबहुना अजिंक्य, निसर्ग, मंत्रालय, अंगराज अशा हॉटेलातल्या थाळ्या दुर्वांकुर, सुकांतापेक्षा कीतीतरी दर्जेदार आहेत. शिवाय चटणी, ठेचा, भाकरी, धपाटे, घट्ट दही असे स्पे. सोलापुरी पदार्थ ऑप्शनला असतातच. बरे ह्या थाळ्यांची किंमत कुठेच १००-११० च्या वर नाही. बाकी इतर डिशच्या बाबतीत बोलायलाच नको, कुठल्याही चित्रविचित्र नावाने डब्बू मिर्ची, पनीर, कांदे फ्राय करुन ग्रेव्हीत देणे किंवा कोफ्ते करुन देणे म्हणजे मेन कोर्सला पैसे मोजणे मला झेपत नाही. काही स्पेशालिटी जसे इटालिअन, लेबनीज, चायनीज अशांच्या बाबतीत मात्र मी अडाणी आहे आणि त्यातले शहाणपण शिकायची इच्छा आहे.मला औरंगाबादच्या थाळ्या सरस
In reply to इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते by अभ्या..
खरे तर आताशा मला मराठी
In reply to इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते by अभ्या..
नुसती क्वांटिटि नव्हे तर
In reply to खरे तर आताशा मला मराठी by बॅटमॅन
हिंजवडीत दोन तीन आहेत.
In reply to नुसती क्वांटिटि नव्हे तर by बॅटमॅन
नाव आणि पत्ता द्या.
In reply to हिंजवडीत दोन तीन आहेत. by प्रचेतस
महेश आणि दुसरी बहुधा पॅराडाइज
In reply to नाव आणि पत्ता द्या. by खटपट्या
तांदूळ तसा स्वस्त असतो.
In reply to नुसती क्वांटिटि नव्हे तर by बॅटमॅन
अगदी अगदी.
In reply to खरे तर आताशा मला मराठी by बॅटमॅन
पुंगळ्या बे पुंगळ्या. चटणीला
In reply to अगदी अगदी. by अभ्या..
खरे तर आताशा मला मराठी
In reply to खरे तर आताशा मला मराठी by बॅटमॅन
खरे तर आताशा मला मराठी थाळीपेक्षा आंध्र थाळीच जास्त भारी वाटू लागली आहेअगदी अगदी, मलाही आवडते आंध्र थाळी /जेवण. चटण्या तर अप्रतिम असतात. दोडकी, वांगी, गवार कुठल्याही भाज्यांच्या इतक्या छान चटण्या बनवणे तिकडचे लोकंच बनवू जाणेत. कस्टमर सर्व्हिस पण उत्तम. खचाखच हॉटेल भरलं असून सुद्धा एखाद्या ग्राहकाची आवड लक्षात ठेवून ऑर्डर करण्याच्या आधीच टेबल वर 'गारे' ( मेदू वड्यांचं चटपटीत व्हर्जन) आवर्जून आणून देणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. बाकी मराठी रेस्टॉरंट्सचा तर मला फारसा अनुभव नाही पण एकूण मराठी ग्राहकसेवेचा अनुभव माझा तरी फारसा बरा नाही. प्रामाणिकपणा असतो. उदाहरणार्थ एखाद्या पदार्थाची ऑर्डर दिली की प्रामाणिकपणे सांगतात की हा पदार्थ तुम्ही सांगितलेल्या दिवसापर्यंत आम्ही देऊ शकत नाही किंवा हा पदार्थ आम्ही बनवतच नाही. ते खरोखर चांगलंय पण बोलण्याची पद्धत चांगली नसते. म्हणजे आपल्याला ऑर्डर दिल्याबद्दलअल्मोस्ट गिल्टी वाटायला लागतं :) याउलट अमराठी दुकानांमध्ये. बिनधास्त हो म्हणतात मग भलेही गोंधळ घालतील.पद्मावतीजी
In reply to खरे तर आताशा मला मराठी by पद्मावति
पुण्याची खाद्यसंस्कृती कशी का
अवांतर : राहण्यासाठी मुंबई
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती कशी का by गणामास्तर
x ७
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती कशी का by गणामास्तर
पुणेकर म्हणत आहेतः आली रे आली
यालाच
In reply to पुणेकर म्हणत आहेतः आली रे आली by सतिश गावडे
श्रीखंड ??
मराठी थाळी वगैरे सब झूठ आहे.
आमच्या मुंबईला भिकारी म्हँताव
म्हणू द्यात हो प्रमोदजी, :)
In reply to आमच्या मुंबईला भिकारी म्हँताव by प्रमोद देर्देकर
तेच म्हणतो!
In reply to म्हणू द्यात हो प्रमोदजी, :) by टर्मीनेटर
:)
In reply to तेच म्हणतो! by सुनील
पुण्याची खाद्यसंस्कॄती