✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 08/13/2018 - 07:51  ·  लेख
लेख
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची. खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत. त्यांचे आपल्या आहारातील गरजेनुसार दोन गटांत वर्गीकरण केले जाते: १. जास्त प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा अधिक असते. यांमध्ये मुख्यत्वे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांचा समावेश होतो. २. सूक्ष्म प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा कमी असते. यांमध्ये मुख्यत्वे लोह, आयोडीन, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅन्गेनीज, क्रोमियम, सेलेनियम व फ्लुओराइड यांचा समावेश होतो. आहारातून घेतलेल्या या खनिजांचा आपण शरीरात साठा करतो. एक प्रकारे तो आपला ‘आरोग्य खजिना’च असतो. खनिजे शरीरात अनेकविध कामे करतात. थोडक्यात ती खालील स्वरूपाची असतात: १. पेशींचे मूलभूत कामकाज २. हाडे व दातांची बळकटी ३. महत्वाच्या प्रथिनांचे घटक (उदा. हिमोग्लोबिन) ४. अनेक एन्झाइम्सच्या कामाचे गतिवर्धक ५. हॉर्मोन वा जीवनसत्वाचे घटक. ६. Antioxidant कार्य. या यादीवरून त्यांचे महत्व लक्षात येईल. लेखमालेत तुलनेने अधिक महत्वाच्या खनिजांवर स्वतंत्र लेख असतील तर उर्वरित खनिजे ही शेवटच्या एका लेखात समाविष्ट होतील. प्रत्येक खनिजाबद्दलच्या लेखात त्याचे आहारातील स्त्रोत, गरज, शरीरकार्य, त्याच्या अभावाचा आजार आणि अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम असे विवेचन असेल. अन्य पूरक माहिती प्रतिसादानुरूप दिली जाईल. वाचकांनीही त्यात जरूर भर घालावी. आणि हो, एक सांगितलेच पाहिजे .... लेखमालेचे ‘खनिजांचा खजिना’ हे सुरेख शीर्षक मिपाकर ‘अनिंद्य’ यांनी सुचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ! अर्थात वाचकांच्या सोयीसाठी प्रत्येक लेखाला मात्र ज्या त्या खनिजाचेच नाव त्याच्या वैशिष्ट्यासह देत आहे. .. तर लवकरच भेटूया ‘सोडियम’ च्या पहिल्या लेखातून. धन्यवाद !
  • सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !
  • पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार
  • कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी
  • फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक
  • खनिज-खजिन्यातील रंगीत धातू
  • उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

Book traversal links for खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

  • सोडियम : मीठ तारी, मीठ मारी ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
19980 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

शुभेच्छा ...

उगा काहितरीच
Mon, 08/13/2018 - 09:04 नवीन
शुभेच्छा ...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

तनमयी
Mon, 08/13/2018 - 11:52 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

नेहमीसारखाच उत्तम उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/13/2018 - 13:00 नवीन
नेहमीसारखाच उत्तम उपक्रम ! मिपाकरांना आरोग्यासाठी उपयुक्त असलेली बरीच माहिती मिळेल !
  • Log in or register to post comments

@ कुमार१

अनिंद्य
Mon, 08/13/2018 - 13:08 नवीन
@ कुमार१ तुमच्या लहिण्याच्या उत्साहाला सलाम आहे. ही मालिकाही माहितीपूर्ण होणार, शंका नाही. पु भा प्र, अनिंद्य
  • Log in or register to post comments

* लिहिण्याच्या

अनिंद्य
Mon, 08/13/2018 - 13:37 नवीन
* लिहिण्याच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

माहितीचा हा खजिना लुटण्यासाठी

टर्मीनेटर
Mon, 08/13/2018 - 13:30 नवीन
माहितीचा हा खजिना लुटण्यासाठी आम्ही वाचक तयारच आहोत. लेख मालीकेस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

वकील साहेब
Mon, 08/13/2018 - 14:26 नवीन
ही मालिकाही उत्तम होईल यात शंका नाही. मालिकेच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments

उत्तम

वरुण मोहिते
Mon, 08/13/2018 - 14:58 नवीन
वाचत आहेच आपल्या मालिका
  • Log in or register to post comments

नवीन लेखमालेस शुभेच्छा

खिलजि
Mon, 08/13/2018 - 15:28 नवीन
नवीन लेखमालेस शुभेच्छा डॉक्टरसाहेब ...
  • Log in or register to post comments

पर्वणी

चाणक्य
Mon, 08/13/2018 - 16:19 नवीन
लेखनमालेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

खजिन्यातील

सुमो
Mon, 08/13/2018 - 16:32 नवीन
सोडियम या पहिल्या खनिज रत्नाच्या प्रतीक्षेत .... लेखमालेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आरोग्य लेखनावर मनापासून प्रेम

हेमंतकुमार
Mon, 08/13/2018 - 17:26 नवीन
आरोग्य लेखनावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या वरील सर्व मित्रांचे आभार !
  • Log in or register to post comments

आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.

दुर्गविहारी
Mon, 08/13/2018 - 19:45 नवीन
अतिशय उत्तम धागे असतात तुमचे. रसायनशास्त्राची आवड असूनही तुमचे आधीचे धागा वाचून त्यावर प्रतिसाद देता आले नाहीत याचा खेद वाटतो. मागची लेखमाला सवडीने पुर्ण वाचून मग प्रतिसाद देईन. या लेखमालेच्या प्रत्येक धाग्याच्या प्रतिक्षेत असेन. सध्या दै. लोकसत्तामधे कुतुहल या सदरामधे विज्ञान परिषदेतर्फे मुलद्रव्यांची छान माहिती येत आहे आणि इथे मि.पा.वर खनिजाविषयी माहिती येणार आहे. माहितीची उत्तम मेजवानी आहे. आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

दुवि, अभिप्रायाबद्दल

हेमंतकुमार
Mon, 08/13/2018 - 20:48 नवीन
व लोकसत्तातील माहिती बद्दल आभार. चर्चेत स्वागत.
  • Log in or register to post comments

कुमार साहेब ,

सोमनाथ खांदवे
Mon, 08/13/2018 - 21:21 नवीन
तुमचा ' खनिजांचा खजिना ' रॉबिनहूड प्रमाणे आम्हा गरिबांना लवकरात लवकर वाटायला सुरवात करा .
  • Log in or register to post comments

मनापासून धन्यवाद

नाखु
Mon, 08/13/2018 - 23:04 नवीन
आणि शुभेच्छा वाचक नाखु
  • Log in or register to post comments

सोमनाथ व नाखु,

हेमंतकुमार
Tue, 08/14/2018 - 09:55 नवीन
उत्साहवर्धनाबद्दल आभार. भावी चर्चेत तुमचे स्वागत असेल.
  • Log in or register to post comments

सोमनाथ व नाखु,

हेमंतकुमार
Tue, 08/14/2018 - 09:57 नवीन
उत्साहवर्धनाबद्दल आभार. भावी चर्चेत तुमचे स्वागत असेल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा .....

सुधीर कांदळकर
Wed, 08/15/2018 - 11:49 नवीन
अनेक, अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

खजिन्यातील पहिले रत्न

हेमंतकुमार
Wed, 08/15/2018 - 11:57 नवीन
सोडियम बाहेर काढले असून ते इथे सापडेल : https://www.misalpav.com/node/43167
  • Log in or register to post comments

एक शंका

चित्रगुप्त
Wed, 08/15/2018 - 19:14 नवीन
भाजीपाला, फळे इ. तून मिळणार्‍या खनिजांविषयी एक प्रश्न आहे, तो असा की ही खनिजद्रव्ये जमिनीतून वनस्पतींमधे येतात ना? मग शेकडो वर्षांपासून लागवडीत असलेल्या जमिनीत ती टिकून राहिलेली असतात की संपलेली असतात ? मातीतील खनिजद्रव्यांचे नकाशे उपलब्ध असतात, त्याप्रमाणे एकाद्या प्रदेशात अमूक एक खनिज मुळात जमीनीत नसलेच, तर ते भाजीपाल्यात कुठून येणार ? उदा. सेलेनियम हे खनिज ब्राझील नट मधे असते, ते ब्राझील खेरीज अन्य देशात कशातून मिळते ?
  • Log in or register to post comments

@ चित्रगुप्त,

हेमंतकुमार
Wed, 08/15/2018 - 19:34 नवीन
@ चित्रगुप्त, तुमची शंका रास्त आहे. काही खनिजांचे स्त्रोत प्राणीजन्य सुद्धा आहेत. तर काही खनिजे ही ‘संपन्न’ खाद्यान्नातून पुरवली जातात. आयोडीनचे उदा. देतो. हे समुद्राकाठच्या जमिनीत व माशांत भरपूर. जसे आपण समुद्राकडून वरच्या उंचीकडे सरकू लागतो, तसे त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पर्वतीय क्षेत्रात ते नगण्य असते. त्यामुळे तेथील जनतेसाठी आयोडीनयुक्त मीठ काढावे लागले. ... याबाबत भूगोल वा वनस्पतीतज्ञाचे मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा