खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची.
खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत. त्यांचे आपल्या आहारातील गरजेनुसार दोन गटांत वर्गीकरण केले जाते:
१. जास्त प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा अधिक असते. यांमध्ये मुख्यत्वे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांचा समावेश होतो.
२. सूक्ष्म प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा कमी असते. यांमध्ये मुख्यत्वे लोह, आयोडीन, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅन्गेनीज, क्रोमियम, सेलेनियम व फ्लुओराइड यांचा समावेश होतो.
आहारातून घेतलेल्या या खनिजांचा आपण शरीरात साठा करतो. एक प्रकारे तो आपला ‘आरोग्य खजिना’च असतो. खनिजे शरीरात अनेकविध कामे करतात. थोडक्यात ती खालील स्वरूपाची असतात:
१. पेशींचे मूलभूत कामकाज
२. हाडे व दातांची बळकटी
३. महत्वाच्या प्रथिनांचे घटक (उदा. हिमोग्लोबिन)
४. अनेक एन्झाइम्सच्या कामाचे गतिवर्धक
५. हॉर्मोन वा जीवनसत्वाचे घटक.
६. Antioxidant कार्य.
या यादीवरून त्यांचे महत्व लक्षात येईल. लेखमालेत तुलनेने अधिक महत्वाच्या खनिजांवर स्वतंत्र लेख असतील तर उर्वरित खनिजे ही शेवटच्या एका लेखात समाविष्ट होतील.
प्रत्येक खनिजाबद्दलच्या लेखात त्याचे आहारातील स्त्रोत, गरज, शरीरकार्य, त्याच्या अभावाचा आजार आणि अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम असे विवेचन असेल. अन्य पूरक माहिती प्रतिसादानुरूप दिली जाईल. वाचकांनीही त्यात जरूर भर घालावी.
आणि हो, एक सांगितलेच पाहिजे ....
लेखमालेचे ‘खनिजांचा खजिना’ हे सुरेख शीर्षक मिपाकर ‘अनिंद्य’ यांनी सुचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ! अर्थात वाचकांच्या सोयीसाठी प्रत्येक लेखाला मात्र ज्या त्या खनिजाचेच नाव त्याच्या वैशिष्ट्यासह देत आहे.
.. तर लवकरच भेटूया ‘सोडियम’ च्या पहिल्या लेखातून.
धन्यवाद !
- सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !
- पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार
- कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी
- फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक
- खनिज-खजिन्यातील रंगीत धातू
- उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप
Book traversal links for खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा ...
शुभेच्छा
नेहमीसारखाच उत्तम उपक्रम !
@ कुमार१
* लिहिण्याच्या
माहितीचा हा खजिना लुटण्यासाठी
शुभेच्छा
उत्तम
नवीन लेखमालेस शुभेच्छा
पर्वणी
खजिन्यातील
आरोग्य लेखनावर मनापासून प्रेम
आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.
दुवि, अभिप्रायाबद्दल
कुमार साहेब ,
मनापासून धन्यवाद
सोमनाथ व नाखु,
सोमनाथ व नाखु,
शुभेच्छा .....
खजिन्यातील पहिले रत्न
एक शंका
@ चित्रगुप्त,