विठूबंदी
( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)
विठूबंदी
धाडा रे कुणीतरी,
विठूला सांगावा,
आरक्षणाचा कांगावा,
फार झाला।
मागे होते एकदा
मराठा मंत्री सोळा,
आरक्षणाचा गोळा,
तेव्हाका नाही।
मुख्यमंत्र्यांना यंदा,
नाही महापूजा,
कारण बलभूजा,
जातीभेद।
संत सांगो गेले,
वारकरी एकता धर्म
भेदाभेद अमंगळ जर्म
जळो जळो।
नावडतीचे तुम्हा,
जरी अळणी मीठ,
निषेधाचे व्यासपीठ,
इथे नव्हे।
समतेचे वाळवंट,
एकमेका लोटांगणे,
तिथे धटिंगणे,
कशासाठी?
जिथे सर्वकाळ
नामाचा जागर
सत्तेचे गाजर,
तिथे कायी?
किती काळ देवा
राहशील मूक
तिच तिच चूक
जन्मोजन्मी।
सांगे "बाजीगर",
म्हणोनी जगजेठी
धरु नका वेठी,
आर्जवूनी।
छान...!
+१
अर्थगर्भ कविता
छान....
1 नंबर कविता
नाना
छान !!!! प्रसंगानुरूप कविता .
Publishing time of this poem
Click on "Load more comments"
The last lines of the poem
सेरु0927 साहेब ...मीच तो
Okay
निषेध !
आरक्षणाचा कांगावा>>> निषेध ! ठार निषेध !! ५८ मोर्चे अत्यंत शांततेत काढल्यानंतरही मागण्या मान्य न करता केवळ गाजरच दाखवले असेल तर शेवटी कोणीही पेटुन उठेलच ! इतक्या शांततेत आंदोनल केले आणि तरीही तुम्ही कांगावा हा शब्द वापरता ??? त्रिवार निषेध !!! मराठा समाजाचा अंत पाहु नका ! आरक्षणाच्या बाबतीत अळंमटळंंम करण्याचे पाप भाजपा सरकारला भोवल्याशिवाय रहाणार नाही !आरक्षण हा "अधिकार" आहे असे
कविता आवडलीच
समयोचित आणि चपखल !