Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बाजीगर on Sun, 07/22/2018 - 22:24
( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री) विठूबंदी धाडा रे कुणीतरी, विठूला सांगावा, आरक्षणाचा कांगावा, फार झाला। मागे होते एकदा मराठा मंत्री सोळा, आरक्षणाचा गोळा, तेव्हाका नाही। मुख्यमंत्र्यांना यंदा, नाही महापूजा, कारण बलभूजा, जातीभेद। संत सांगो गेले, वारकरी एकता धर्म भेदाभेद अमंगळ जर्म जळो जळो। नावडतीचे तुम्हा, जरी अळणी मीठ, निषेधाचे व्यासपीठ, इथे नव्हे। समतेचे वाळवंट, एकमेका लोटांगणे, तिथे धटिंगणे, कशासाठी? जिथे सर्वकाळ नामाचा जागर सत्तेचे गाजर, तिथे कायी? किती काळ देवा राहशील मूक तिच तिच चूक जन्मोजन्मी। सांगे "बाजीगर", म्हणोनी जगजेठी धरु नका वेठी, आर्जवूनी।

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/22/2018 - 23:16

Permalink

छान...!

वास्तववादी कविता आणि आशयाशीही सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by शाली on Mon, 07/23/2018 - 08:18

In reply to छान...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Sun, 07/22/2018 - 23:58

Permalink

अर्थगर्भ कविता

मराठा आरक्षणा साठी विठुला वेठिस धरण्या पर्यंत मजल गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on Mon, 07/23/2018 - 00:12

Permalink

छान....

आवडली.. विठ्ठलाला सुद्धा वेठीस धरणारे आरक्शणासाठीचे राजकारण.. उबग आलाय आता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Mon, 07/23/2018 - 11:08

Permalink

1 नंबर कविता

आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 07/23/2018 - 11:25

Permalink

नाना

नाना फडणवीस कोणालाही हार जाणार नाहीत. येसट्या फोडा, गर्दीत साप सोडा, परि याचे खापर मुख्यमन्त्र्यावर फोडा, हा डाव फुकट गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Mon, 07/23/2018 - 13:17

Permalink

छान !!!! प्रसंगानुरूप कविता .

छान !!!! प्रसंगानुरूप कविता .
  • Log in or register to post comments

Submitted by सेरू०९२७ on Mon, 07/23/2018 - 15:33

Permalink

Publishing time of this poem

Publishing time of this poem on Misalpav is 10:24 pm. However, this poem has been published in Loksatta yesterday at 7 pm in the readers' comments on the following news item. https://www.loksatta.com/maharashtra-news/chief-minister-will-not-come-to-pandharpur-for-vitthal-pujya-for-strong-feelings-of-the-maratha-community-1717669/ Scroll down readers' comments at the bottom. Initially one reader published it in readers' comments at 6 pm. Later on, another reader modified a bit and published modified version at 7 pm. The modified version is published on Misalpav.
  • Log in or register to post comments

Submitted by सेरू०९२७ on Mon, 07/23/2018 - 15:36

Permalink

Click on "Load more comments"

Click on "Load more comments" to read the poems.
  • Log in or register to post comments

Submitted by सेरू०९२७ on Mon, 07/23/2018 - 16:18

Permalink

The last lines of the poem

The last lines of the poem published in Loksatta are, सांगे वारकरी, म्हणोनी जगजेठी धरु नका वेठी, आर्जवूनी. However, the last lines of the poem published on Misalpav are, सांगे "बाजीगर", म्हणोनी जगजेठी धरु नका वेठी, आर्जवूनी। Clear case of poem theft.
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीगर on Mon, 07/23/2018 - 17:07

Permalink

सेरु0927 साहेब ...मीच तो

मीच तो . investigation करायचे असेल तर mobile IMEI num शोधा सर.
  • Log in or register to post comments

Submitted by सेरू०९२७ on Mon, 07/23/2018 - 17:43

Permalink

Okay

Okay
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/25/2018 - 01:40

Permalink

निषेध !

निषेध ! आरक्षणाचा कांगावा >>> निषेध ! ठार निषेध !! ५८ मोर्चे अत्यंत शांततेत काढल्यानंतरही मागण्या मान्य न करता केवळ गाजरच दाखवले असेल तर शेवटी कोणीही पेटुन उठेलच ! इतक्या शांततेत आंदोनल केले आणि तरीही तुम्ही कांगावा हा शब्द वापरता ??? त्रिवार निषेध !!! मराठा समाजाचा अंत पाहु नका ! आरक्षणाच्या बाबतीत अळंमटळंंम करण्याचे पाप भाजपा सरकारला भोवल्याशिवाय रहाणार नाही !
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 07/25/2018 - 04:53

In reply to निषेध ! by प्रसाद गोडबोले

Permalink

आरक्षण हा "अधिकार" आहे असे

आरक्षण हा "अधिकार" आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 07/27/2018 - 11:54

Permalink

कविता आवडलीच

समयोचित फडणवीस यांचा चाहता असल्याचा शिक्का बसलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 07/27/2018 - 12:55

Permalink

समयोचित आणि चपखल !

समयोचित आणि चपखल !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6475 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com