✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्हेलेंटाईन्स डे...२

प — प्राजु, Sun, 02/10/2008 - 01:23

प्रतिक्रिया द्या
23586 वाचन

💬 प्रतिसाद (53)
इ
इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 01:42 नवीन

सय

मलाही सय झाली आहे तूझ्याशिवाय जगायची कारण तूही करुन घेतली आहेस कोरडेपणाने वागायची -इनोबा सय=सवय
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 01:47 नवीन

छान आहे

छान आहे चारोळी ... पण .. मला वाटतं , सय याचा अर्थ आठवण. (उदास कविता लिहू नयेत, असे मी पहिल्या भागांत लिहिले होते इथे वेगळे लिहावे लागेल बहुतेक.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/10/2008 - 10:35 नवीन

उदास लिहू नये :(

प्राजु आम्हाला आपल्या चारोळ्या आवडतात. अरे, पण आम्हाला उदास,हताश, निराश, रडणे,पडणे, अशा वेदनेच्याच चारोळ्या सुचतात ना ( सुचल्या तर ) तुम्ही आमच्यासारख्या एका प्रतिभावंत कवीला प्रतिबंध केलाय बॊ इथे :) ( ह. घे. ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 20:24 नवीन

अहो,

अहो, व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्त संत व्हॅलेंटाईनच्या चरणी या सगळ्या चारोळ्या अर्पण. मग त्यात उदासवाण्या चारोळ्या कशाला? आपल्याला ही छान लिहिता येतात.. अपण नक्की लिहाल दिलिपजी, याची खात्री आहे मला. - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/10/2008 - 20:34 नवीन

चालू देत !!!!

आम्हाला कितीही हरब-याच्या झाडावर बसवले तरी आम्हाला आनंदाच्या चारोळ्या सुचणार नाही.
संत व्हॅलेंटाईन बाबाची जत्रा संपली की आम्ही लिहू आमच्या आरोळ्या :)
तो पर्यंत आम्ही आपल्या सर्वांच्या सुरेख चारोळ्या वाचत राहू  !!!! परप्रांतिय दिलीपजी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 02:01 नवीन

तुझ्या

तुझ्या ओठीचे गीत होऊन मला झंकारून जाऊदे तुझ्या नयनी आशेची ज्योत लावून जाऊ दे - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 02:17 नवीन

गीत माझ्या

गीत माझ्या मनीचे तूझ्या ओठी येऊ दे आनंदाशृ माझे नयनी तुझ्या वाहू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 03:21 नवीन

हिमफुलांच

हिमफुलांचा दुलईवरती कोवळी किरणे पसरली स्पर्शाने त्या मोहरून फुले लाजेत विरघळली - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:20 नवीन

वा ....

सुरेख. आणखी येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 20:21 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद.. सुधिरजी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 20:32 नवीन

फुलांनी

फुलांनी फुलावे तरूवरी खगांनी भुलावे नभावरी पतंग जळतो ज्योतीवरी काय लिहावे या प्रितीवरी??? - प्राजु
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/10/2008 - 23:20 नवीन

अरे वा, वा!!!

तात्या दिवाना अनुष्कावर मरतो अनुष्कासाठीच अहोरात्र झुरतो.. आपला, (अनुष्का प्रेमी) तात्या. प्राजु, तुझ्या आवाहनाने खरंच कमाल केली एका वधस्तंभाला काव्याची पालवी फुटली.. -खोडकर डांबिसकाका
  • Log in or register to post comments
र
रविराज Mon, 02/11/2008 - 05:05 नवीन

हसता हसता पुरेवाट झाली

खरे तर मला अजुन मराठी टाइप करण्यात मी पुरेसा पारंगत नाहीये. त्यामुळे चारोळी आवडली तरी मी कमेंट द्यायचा आळस करतो. पण खोडकर डांबिसकाकांची चारोळी वाचुन अ़क्षरशः हसता हसता पुरेवाट झाली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्राजु Mon, 02/11/2008 - 20:04 नवीन

अलका, अचला,

अलका, अचला, विश्वमोहिनी रूप गर्विता गजगामिनी मुग्धा, कामिनी, अभिसारिणी प्रेमसवरूप तू, जगत् जननी...... - प्राजु
  • Log in or register to post comments
क
किशोरी Mon, 02/11/2008 - 16:13 नवीन

नजर..

तुझ्या एका नजरेने अशी काय जादु घडली तुझ्या प्रेमाची धुंदी माझ्या मनावर चढली
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 02/11/2008 - 17:31 नवीन

अरे वा

प्राजु, किशोरी सहीच...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/11/2008 - 20:27 नवीन

वा.. किशोरी,

वा.. किशोरी, खूपच छान. लिही अजूनी. - प्राजु
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 02/11/2008 - 22:09 नवीन

काहीच्या काही

लिहील्यावर चारोळिला मजला हे कळले होते बाटलीत फक्त आता घोट दोनच उरले होते -असुरावादी पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 03:08 नवीन

अश्रु

घोट दोनच उरले होते तेही होते दु:खाश्रु तुच नवा हा चषक भरला हिंदकळती आनंदाश्रु (ही थोडी पाडलेली चारोळी वाटतेय नाहि;) ) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/12/2008 - 03:54 नवीन

तू सहजच

तू सहजच येऊन येथे भरलास चषक मदिरेचा त्या मदिरेतून भिनतच जाई हा कैफ जवानीचा. (पाडलेल्या चारोळीनंतर केलेली 'बळचं' चारोळी) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
र
रविराज Tue, 02/12/2008 - 05:26 नवीन

भरलेला

भरलेला विलोभनीय तो पुन्हा एकदा रिकामा झाला वेडे मन माझे विचारी घेउ का मी अजुन एकच प्याला. -रविराज (माझा ही एक प्रयत्न)
  • Log in or register to post comments
र
रविराज Tue, 02/12/2008 - 07:14 नवीन

पुन्हा भरलेला

अतीव सुंदर पाहुन तो प्याला एकच हल्लकल्लोळ झाला संडे आहे, उद्याचे टेंशन कशाला मनसोक्त घे तू, नको आवरु स्वतःला -रविराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
प
प्राजु Tue, 02/12/2008 - 08:42 नवीन

नकोस पाहू

नकोस पाहू अशी राणी, नशा चढेल गं.. काळोख्या अमावसेत चांदणं पडेल गं.. - प्राजु
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 02/12/2008 - 09:44 नवीन

वाह

हे म्हणजे एकदम झकासच. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
किशोरी Tue, 02/12/2008 - 10:26 नवीन

चांदण्यांना ...

आमावस्येच्या चांदण्यांना लागली चंद्राची चाहुल जेव्हा माझ्या आयुष्यात तु टाकलेस प्रेममय पाऊल (जमल की!!लग्न नाही हो,चारोळी लिहीणे जमले,मला आता थोड थोड जमायला लागल आहे :)) धन्यवाद वरदा,प्राजु !!)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/12/2008 - 19:45 नवीन

किशोरी..

चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. - प्राजु
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त Wed, 02/13/2008 - 00:45 नवीन

अन्तुरी

तु मम अधराची बासुरी... घेशि लकेरि नानापरी अन गाशी सुस्वरी, तव झन्कारीशी तारा मम अन्तरि... सान्ग ना केव्ह होशि तु मम ह्रुदयाची अन्तुरी...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 00:53 नवीन

हे ठिक..

अव्यक्त, आपण आपली चारोळी संपादन केलित त्याबद्दल मी आभारी आहे. आपण चांगले लिहिता, ही चारोळी सुंदर आहे. अशिच तुमची प्रतिभा फुलत राहुदे. वरचेवर इथे येत रहा आणि हा गोफ विणायला मदत करत रहा. - प्राजु
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त Wed, 02/13/2008 - 01:22 नवीन

स्मारक...

ती स्फोटक, ती दाहक... ती भेदक, ती मारक नव्हे ती मोहक, ती प्रेरक ती उद्बोधक, ती स्मारक... ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 01:33 नवीन

चारोळि तर

चारोळि तर सुंदरच आहे पण त्यापेक्षाही.. ...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त हे जास्ती छान वाटले. - प्राजु
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 02/13/2008 - 04:03 नवीन

सुधीर मोघे

सुधीर मोघे यांच्या 'लय' पुस्तकातील ही चारोळी. येथे स्वरचित चारोळ्या द्यायच्या असल्या, तरीही या धाग्याच्या संदर्भात चपखल वाटली म्हणून देण्याचा मोह आवरला नाही. ना सांगताच तू मला उमगते सारे कळतात तुलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचा बांध? कळण्याचा चाले कळण्याशी संवाद नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/13/2008 - 04:50 नवीन

वा वा

छानच आहे...थँक्यू नंदन...
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/13/2008 - 04:55 नवीन

आता मी

डोळ्यांनी तुझ्या प्रेमतुषार उधळले पापण्यांनी माझ्याही ते अलगद झेलले.....
  • Log in or register to post comments
क
किशोरी Wed, 02/13/2008 - 17:23 नवीन

पहिली भेट

>>चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते. "अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय.. हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद आठव पहिली भेट आपुली नयन गुजगोष्टी करी मनातील भाव बोलुन गेल्या बरसणार्‍या श्रावण सरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 21:19 नवीन

हो

हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद जी मत कहिये जी... वैसे तो आजकल बिस्कीट को भी पारले-जी कहते है... पर आप मुझे प्राजक्ता या प्राजु ही कहिये किशोरीजी । ( - प्राजु (जी) - प्राजी... :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किशोरी
स
स्वाती राजेश Wed, 02/13/2008 - 19:41 नवीन

छान उपक्रम आहे.

प्रथम प्राजुला धन्यवाद. वरदा, किशोरी यानाही प्राजुला साथ दिल्याबद्दल. नंदन, अव्यक्त,अभिजीत, रविराज, धनंजय, विनायक आणि ऋषिकेश यांना धन्यवाद. तुमच्या मुळे इतक्या सुंदर चारोळ्या वाचायला मिळाल्या.:)
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 02/13/2008 - 20:24 नवीन

स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा ....

वर्षाव प्रेमाचा आज व्हावा असा दिवस हा अति खास व्हावा बघुनि आपले प्रेम ते ... स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा .... - सागर
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 02/13/2008 - 20:30 नवीन

अजून एक....का अधर तुझे हे थरथरले ...

प्रेमधारांत चिंब भिजवुनि मजला का नयन तुझे हे लाजले.... ओढ याच दिसाची तुजला का अधर तुझे हे थरथरले ... - सागर
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/13/2008 - 20:38 नवीन

क्या बात है

सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता...सहीच...किशोरी खूपच छान...
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:17 नवीन

सगळे प्रोफेशनल

सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता वरदा, तुमच्या मनात सगळ्या ओळी (खरेतर चारोळ्या) उतरल्या म्हणजे सगळे प्रोफेशनल समजायला हरकत नाही ... दर्दीपणा असेल तरच त्या कविता...तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते.... तेव्हा प्रोफेशनल कॅटेगरीत आल्यामुळे आनंद झाला... (चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठीच्या ऑफरची वाट पाहणारा ) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 21:20 नवीन

वा..

सागर, किती छान लिहिल्या आहेत चारोळ्या तुम्ही. खरचं खूप आवडल्या.. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 02/14/2008 - 18:54 नवीन

म्हटलं पहावं करुन :)

धन्यवाद प्राजु, खरंतर चारोळ्या हा माझा प्रांत नव्हता. पण म्हटलं पहावं करुन :) आता चारोळ्याही करायला हरकत नाही.... (म्हणजे मी अजून त्रास देणार सगळ्यांना.... हा हा हा....) (स्वयंघोषित कवी) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:06 नवीन

हो ना

तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते अगदी पटलं आणि तुमच्या चारोळ्यात ते स्किल अगदी खरंच छान दिसतंय.. मी उगाच टाईमपास म्हणून लिहायला लागले..तुम्ही आणि किशोरीचं तसं नाही असं म्हणायचं होतं मला...तुम्ही अगदी प्राजु सारखाच छान चारोळ्या करायला लागलात असं म्हणत होते.....
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 02/14/2008 - 19:25 नवीन

स्तुतिबद्दल धन्यवाद वरदा

स्तुतिबद्दल धन्यवाद वरदा, पण मला अजूनही असे वाटते की मी अजून तितका मुरलेला कवी नाहीये... ती पातळी गाठण्यासाठी अजून बरीच मोठी वाटचाल करायची आहे. सध्या मी केवळ बाल्यावस्थेतील कवी आहे. बाळसे धरायला थोडा वेळ लागेल... आणि प्राजुंशी माझी तुलना होणे तर अशक्य आहे. त्यांच्या कविता वा लेखन बरेच प्रगल्भ असते.... मी येथे फक्त मिसळपावाच्या सागरात तरंगण्याचा प्रयत्न करतोय.... पट्टीचा पोहायला वेळ तर लागेलच आणि तुम्हीही खरेच छान लिहितात. सतत लिहित गेलात तर नक्की नावाजलेल्या कवयित्री वा लेखिका व्हाल... शेवटी वाचकांना मनापासून जे लिहिलेले असते ते भावते हेच खरे... तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून खूप खूप आभार.... तुमच्यासारख्या रसिकांमुळे तर कवी जन्मतात.... :) धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा गुरुवार, 02/14/2008 - 19:35 नवीन

क्या बात है

अहो तुम्ही पहीलीत तरी पोचलात मी अजुन शिशुवर्गात आहे कवितेच्या... पण मी रसिक म्हणून छान आहे हे बाकी ऐकून बरं वाट्लं थँक्यू..... ठीक तर आता अशाच छान चारोळ्या करत राहा...मी ही प्रयत्न करतेच.....
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 02/14/2008 - 20:44 नवीन

मग येऊ द्या की अजून चारोळ्या

मी ही प्रयत्न करतेच..... वरदा, मग येऊ द्यात की अजून चारोळ्या (या वाक्यावरुनही चारोळी करायचा मोह आवरत नाही....) ऐकून तुमच्या आरोळ्या वाटाव्या वाघाच्या डरकाळ्या येऊ द्यात की अजून चारोळ्या त्या व्हॅलेंटाईनच्या उडो चिरफाळ्या..... - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:13 नवीन

वा राव .......

मिठाईवरिल चारोळ्या खाल्या आहेत. तुमची एकदम मिसळीतल्या तर्रीत मुरलेली वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सागर Mon, 02/18/2008 - 15:45 नवीन

अस्सल मिसळपावीच झणझणीत चारोळी हाणणार

सुधीरकाका, अरे हो की..... मी हा विचारच नव्हता केला... अस्सल मिसळपावी झणझणीत चारोळी नाही हाणणार तर कोण? :) मनापासून अनेक धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
व
विकास्_मी मराठी गुरुवार, 02/14/2008 - 19:45 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ वाट तुझी,पावले माझी सोबती माझा होशील का ?? चित्र तुझे,रंग माझे रंगात माझ्या रंगशील का ????
  • Log in or register to post comments
प
पुष्कर गुरुवार, 02/14/2008 - 20:36 नवीन

झकास

चित्रात तव त्या रंग माझे एकदा रंगून जा, कुंचला घेऊन हाती चित्र ते माखून जा
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा