राजी -' छा '-लिया
हेर पट म्हटला कि आपल्यासमोर बॉण्ड पट वा टायगर पट डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्यतः हेर पट हे नायक प्रधान चित्रपट असतात, या अंगाने राझी चे वेगळेपण उठून दिसते.
हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या " सेहमत कॉलिंग " या कथेवर आधारित आहे. या चित्रपटातील कथा १९७१ च्या युद्ध काळातील आहे. हिदायत खान ( रजत कपूर ) व बायको तेजी खान ( सोनी राझदान - आलियाची खरी आई ) ( तेजीच्या कपाळावर सिंदूर दाखवला आहे याचे कारण कळले नाही ) काश्मिरात वास्तव्य असते व पाकिस्तान काश्मिरात त्यांचे व्यापारानिमित्त येणेजाणे होत असते . हिदायत खान हे भारतासाठी डबल एजन्ट ( मराठी शब्द ? ) ची कामगिरी निभावत असतात. हिदायत खान यांना पुप्फुसाच्या कर्करोगाची लागण होते. त्यांना शंका असते कि शत्रू राष्ट्र मोठा कट रचत आहे , नि त्या कटाची माहिती काढणे अत्यंत निकडीचे आहे , अशा वेळेस ते आपल्या दिल्लीत शिकत असलेल्या मुलीला - सेहमतला ( आलिया भट ) पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेतात. यासाठी तिला भारतीय अधिकारी १ महिन्याचे विशेष प्रशिक्षण देतात.हिदायत खान यांच्या ओळखीतील लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाशी तीचे लग्न लावून दिले जाते . शत्रू राष्ट्रात जाऊन सेहमत काय , कशी नी कुठे कामगिरी पार पाडते यासाठी आपणास राझी चित्रपट पाहावा लागेल.
नाम शबाना हा जरी महिला गुप्तहेरीवरील चित्रपट सध्याच येऊन गेलेला असला तरी या चित्रपटाची धाटणी पूर्णतः वेगळी आहे. या चित्रपटात अनेक चरित्र अभिनेते असले तरी सर्वांना मोजून मापून रोल दिले गेले आहेत, या चित्रपटाचा श्वास " आलियाच " आहे. विकी कौशल ( मसान चित्रपटातील हिरो ) याने सेहमतच्या शौहरचा रोल चांगल्या रित्या निभावला आहे.नवऱ्याशी नि त्याच्या राहत्या देशाशी तीने गद्दारी केली असली तरी "अपने वतन से परस्त हैं " हे तो जाणून असतो. अमृता खानविलकर या चित्रपटात आलियाची भावजय दाखवण्यात आली आहे, ती या रोल मध्ये तोलून मापून वावरली आहे. लक्षणीय रोल आहे तो " खालिद मीर या पात्राचा !" ( जयदीप अहलावत) ट्रैनिंग दरम्यान आलिया व या पात्रातील दृश्ये पाहण्यासारखी आहेत. कंवलजीत सिंग यांची छोटी भूमिका आहे परंतु त्यांना मिळालेले संवाद लक्ष्यवेधी आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्ये हि त्यातील हळुवारपणामुळे लक्षात राहतात ( साधारणतः हेरपटात मारझोड , बंदुकीच्या गोळ्यांचा खच असतो ) उदा . - सेहमत नि तिचे वडील यांच्यातील तिला हेर बनवण्यावेळचा संवाद, आपली कामगिरी पार पडून परत आपल्या देशात येतेवेळचा संवाद , विक्रांत वरील संवाद ..... चित्रपटाचे संवाद , संगीत नि छायाचित्रण हे अनुक्रमे मुख ,कान व डॊळे आहेत. हे तिन्ही विभाग सर्वोत्तम नसले तरी उत्तम नक्कीच आहेत. देशभक्तीपर चित्रपट जरी असला तरी कुठेही गदरची (भडकतेची ) झलक नाही. पूर्वार्ध जरी थोडा रटाळ असला तरी उत्तरार्ध चांगलाच वेग पकडतो.
सामान्यतः हेरपटात असामान्य व्यक्तिरेखा असामान्य कामगिरी करून दाखवतात परंतु या चित्रपटात सामान्य व्यक्तिरेखा सुद्धा असामान्य कामगिरी करून दाखवू शकतात हे आहे हेच चित्रपटाचे यश आहे.
विशेष नोंद - वयाच्या २५व्या वर्षी आलियाने इतकी विविधता दिलीये , अजून १० वर्षे जरी इंडस्ट्रीत काढली तर नक्कीच लेडी अमिताभ होईल. आलियासाठी तालिया जरूर द्या .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छोटं पण उत्कृष्ट समीक्षण .
समीक्षा आवडली.
छान. सुंदर
चित्रपट चांगला आहे. मेघना
बरोबर .....
आलिया भट्ट टॅलेंटेड आहे
थोडक्यात पण सुंदर समिक्षण !
विक्रांत
विक्रांत
वरील संवाद छिद्रान्वेष -- दाखवलेली युद्धनौका"विराट"
आहे. बाकी असे गुप्तहेर कोणत्या मातीचे बनलेले असतात हे मला अजून कुतूहल आहे? पकडले गेलो तर मृत्यू किंवा आयुष्यभर होणारा छळ हे नक्की माहिती असूनही जाज्वल्य देशभक्ती साठी हि माणसे एवढा प्रचंड धोका कसा पत्करू शकतात याचे मला अत्यंत आश्चर्य वाटत आले आहे. या निमित्ताने श्री कुलभूषण जाधव यांची होणारी छळवणूक परत आठवली. आणि श्री मोरारजी देसाई यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे कहूता या अणू प्रकल्पात हेरगिरीची तयार झालेली साखळी अक्षरशः तोफेच्या तोंडी दिली गेली याची आठवण होऊन अंगाची लाही होते. http://www.indiandefencereview.com/how-we-killed-the-kaoboys/लिंक वाचली. फार वाईट वाटले. :
चित्रपट बघितला
जबरदस्त परीक्षण
डबल एजन्ट = दुहेरी हेर.
समर्पक शब्द !!!!
थोडं शब्दानुवाद वाटलं
द्विहेर च म्हणाना मग ;)
दुहेर
प्रतिक्रियां साठी सर्वांचे आभार -/\-
डबल एजंट = ....
हा चित्रपट यायच्या आधीच माहित
संज्ञामालिन्य
गा पै तुमच्या मताशी सहमत आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malharस्व -कर्तृत्व
कालच बघितला. अत्यन्त सुंदर
आणि चक्क आलिया सुद्धा!
उडता पंजाब बद्दल खूप ऐकून आहे
हो . बरोबर . गलती से
छान परीक्षण.. पहायचाच आहे..
सैराट
प्रतिसाद रोचक आहेत!
http://www.bigul.co.in/bigul
हा रिव्ह्यू फारच आवडला.
आलियाने इन्स्टा
सुंदर लिहिलंय, लेख आवडला !
चित्रपट अतिशय सुंदर आहे!
विकी कौशल
राजकुमार राव
ठरावा!. (होय आमच्यालेखी राजकुमार राव तितक्या उंचीवर पोचलेला अन 'अभिनय जाणणारा' कलावंत आहेच) रावचं टॅलेंट दाखवणारा हा एक मजेशीर विडिओ, एकच ओळ कित्येक वेगवेगळ्या भावनांत गुंफून पेश-ए-खिदमत करणारा हा कलाकार बॉलीवूड मधील टॅलेंटचा एक महत्वपूर्ण दीपस्तंभ आहे असे वाटते.लै भारी ! झक्क्कास !
न्यूटन
मस्तच मस्त सिनेमा. आलिया आता