देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला
दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला
देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती
हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....
-शिवकन्या
वाचने
14209
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू
मस्त लिहलेले आहे
जॉनविक्क
In reply to मस्त लिहलेले आहे by जॉनविक्क
:) हा हा हा. आहे ना आमच्या देवघरात सध्या
In reply to जॉनविक्क by माहितगार
:)
In reply to :) हा हा हा. आहे ना आमच्या देवघरात सध्या by जॉनविक्क
नास्तिकतेचा माजोरडेपणा?
In reply to :) हा हा हा. आहे ना आमच्या देवघरात सध्या by जॉनविक्क
अवांतर असल्याने सेपरेट धागा काढावा अवश्य चर्चा होईल
In reply to नास्तिकतेचा माजोरडेपणा? by सर टोबी
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी
सुरेख.
शब्द सामर्थ्य
++ अगदी तंतोतंत
In reply to शब्द सामर्थ्य by नाखु
देखणे गो बाय तुझा देवघर.
कविता आवडली,
छान रुपक.
रूपक ज्याचे असेल ते अप्रतिम हे नक्की
In reply to छान रुपक. by जालिम लोशन
माहितगार
In reply to रूपक ज्याचे असेल ते अप्रतिम हे नक्की by माहितगार
कांत सतीचा > शिव मंदीर
In reply to माहितगार by शिव कन्या