हसण्या उसंत नाही
काव्यरस
हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
वाचने
9970
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत.
वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.
In reply to अनुभव शब्दाला अर्थ देतो by संजय क्षीरसागर
आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू
पण मी सारख्याच कविता लिहीत नाही
मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच
कविता जुन्या आहेत
मस्त.
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoomछान आहे
सुंदर
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही. >>> रोखठोक!
अनुभव शब्दाला अर्थ देतो