एका गुलाबी संध्याकाळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about एका गुलाबी संध्याकाळी
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एका गुलाबी संध्याकाळी
________________________
संध्याकाळची वेळ ... साधारण साडेचार पाच वाजले असावेत. शांतपणे टेरेसवर उभा होतो सुर्यास्ताची वाट पाहात. नुकतेच दिवाळी संपुन गेली होती पण ह्यावर्षी दिवाळी अशी दिवाळी वाटलीच नाही. लॉकडाऊनमध्ये जशी संधी मिळाली, जसे वातावरण रिलॅक्स झाले, तसे तसे सोसायटीमधले सर्व लोकं आपापल्या मुळ गावी निघुन गेले होते.
अगदी मोजक्या फ्लॅट्सच्या बाल्कन्यांना रोषणाई केलेली होती, कुठे फटाक्यांच्या आवाज नाही की लहान मुलांचा गोंगाट नाही. अगदी इतर दिवाळीत संध्याकाळ झाली की टेरेसवर मुलांची लगबग सुरु व्हायची रात्रीची आतिषबाजी पहायला अन करायलाही.