मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

सुख

चांदणे संदीप ·
हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे

जॉर्ज कार्लीन - अधिभौतीकवाद, राष्ट्रीय गर्व, व्यंजना, गर्भपात.

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जॉर्ज कार्लीन हे अमेरिकन स्टेन्डअप कोमेडीअन, लेखक व नट होते. न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि आंतरजाल चित्रपट माहितीकोश (IMDB) येथे त्यांचा उल्लेख शतकातील सर्वोत्कृष्ट कोमेडीअन असा केलेला आढळतो.१९५६ ते २००८ पर्यंत तब्बल चोपन्न वर्षांच्या कारकिर्दीत ते त्यांच्या स्फोटक व विवादात्मक विधानांसाठी नेहमी चर्चेत असायचे. विविध संवेदनशील विषयांवर कार्लीन यांनी केलेले वक्तव्य हे जितके विनोदी होते तितकेच ते विचार करायला लावणारे आणि स्फोटक होते.

शब्दांची ताकद

shawshanky ·
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

अखेर ऑस्करला लिओ भेटलाच

shawshanky ·
आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे … कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण …. अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !!

रामा मेघ दे.......प्रत्यक्ष प्रयोग

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दुवा http://www.misalpav.com/node/34751
संदेश गायकवाडच्या उत्तम दिग्दर्शनाने बहरलेल्या, चंदर पाटीलच्या अस्सल हजरजबाबी विनोदी अभिनयाने रंगलेल्या, नामांतर कांबळे , श्रीकांत हांडे कल्पना कदम, श्रुती चव्हाण या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजवलेल्या , लोक संगीताने नटलेल्या अशा माझ्या "रामा मेघ दे " या विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ................ नेहमी लक्षात राहील अशी एक आनंदी, हास्य विनोदाने बहरलेली संध्याकाळ साजरी करण्यासाठी एक मिपाकर म्हणून मी तुम्हा सर्वाना आमंत्रीत करतोय. आपला विजुभाऊ ( चकोर शाह)
आज शुक्रवार.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल

साहित्य संपादक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे. आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.

सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत

अभिनव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता. हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल? २. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात.

एका सूर सम्राज्ञीला विनम्र अभिवादन

शान्तिप्रिय ·
लेखनविषय:
सुमन कल्याणपूर ............ एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी. आपल्या अवीट स्वरांनी गेली अनेक दशके भारतीय मनांवर राज्य करणाऱ्या सुमनताई म्हणजे संगीताच्या सम्राज्ञीच! उद्या २७ जानेवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! "समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला गे माये " या त्यांनी गायलेल्या गीताने माझ्या बालपणात मला त्यांच्या आवाजाची ओळख झाली.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

अन् मलाही!

चांदणे संदीप ·
एक सांगू? ऐकशील? ते कंगव्यातून सुटणारे केस राहूदे तसेच, भुरभुरूदे तेवढाच त्यांना विरंगुळा ...अन् मलाही! वाराही कधी लाडात येतो पदराशी सलगी करतो तू तशीच राहा, मला सावरू दे खेळू दे त्या दोघांना ...अन् मलाही! मोकळी छान हसताना इकडे तिकडे पाहताना वेडी डूलं झुलत राहतात झुलू दे त्यांना मजेत ...अन् मलाही! गालावरच्या खळ्यांना लाल ओठ नि चंद्रबिंदीला न्याहाळत बसतो आरसा पाहू दे ग निवांत त्याला ...अन् मलाही! - संदीप चांदणे