मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

चुकचुकली पाल एक...!

खेडूत ·
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

मी आर्ची बोलत्येय.

आंबट चिंच ·
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

कवितेपलिकडील कविता

आनन्दा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे.

काजूकतलीची गोष्ट

हृषिकेश पांडकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहामाही परीक्षांचे निकाल जे लागायचे ते लागून गेले होते.शाळेतील आणि घरातील वातावरण आता निवळले होते.प्रगती पुस्तकावर पालकांची सही करून पुन्हा ती शाळेत पोहोचली होती.थोडक्यात काय तर सहली,स्पोर्ट्स आणि स्नेहसंमेलन सुरू होण्याअगोदर असलेला विसावा आम्ही अनुभवत होतो.ऑक्टोबरचा शेवट असल्याने शाळेचे स्वेटर घालायचे दिवस चालू होते.शनिवारी असलेली सकाळची शाळा नकोशी झाली होती.अर्थात शाळा नकोशी होण्यापेक्षाही सकाळचे उठणे असह्य होत होते.कारण शाळा नकोशी व्हावी अशी वेळच कधी आयुष्यात आली नव्हती. सातवीत होतो त्यामुळे अजूनही हाफ चड्डीचा गणवेश होता.पुढच्या इयत्तेपासून म्हणजे आठवीपासून पूर्ण चड्डी असायची.सक

उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!

शान्तिप्रिय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट. सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर". चित्रपट पंजाबचे भयाण वास्तव दाखवतो. आलिया भटला अभिनयाची उत्तम जाण आहे. पैशाच्या आणि प्रसिध्धीच्या हव्यासापायी नकळत ड्रग कडे ओढली जाणारी एक खेळाडू तिने वठवली आहे. एक नंबर अभिनय तिचाच.

कांचीवरम

किसन शिंदे ·
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

चित्रगुप्त ·
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

तबला/ढोलकिच जग

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच. लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्‍या बदलत गेल्या, जबाबदार्‍या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली. माणुस सत्तरीच्या पुढे.

झोप उडवणारा 'उडता पंजाब'

चलत मुसाफिर ·
लेखनविषय:
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे) वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको! निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या! सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन.

'कोसला'सोबत एक दिवस

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा.