अनुभव
सेन्टी मेन्टी : जखम आणि खपली
प्रेषक, मन, Sat, 23/03/2013 - 01:19काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो.
तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते.
लहान मुलांच्या बाबतीत
प्रेषक, नर्मदेतला गोटा, Fri, 22/03/2013 - 14:11लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये.
म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा.
चंद्राला म्हणतो,
नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू
किंवा
यक्ष-पर्यांनो स्वप्नीं नाचून नीज नका चाळवू
म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये.
किती खोलवर विचार केलाय कविने.
लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा.
पण उदाहरणे मात्र उलट दिसतात.
गपगार
प्रेषक, आतिवास, Fri, 22/03/2013 - 10:39बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली.
शेताला गेल्ती सक्काळी.
हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत.
म्याबी चाल्ली व्हती.
आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.”
आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ.
ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला.
गजगं; फुटकी काकणं; चिचोके;
गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं;
– समदं फुकाट.
म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती.
आभार
प्रेषक, तिमा, Thu, 21/03/2013 - 13:51बर्याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून.
१. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार.
२. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.
Gunjasa hai koi Iktara...!
प्रेषक, प्राजक्ता.., Mon, 18/03/2013 - 18:29माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.
प्रेषक, तुमचा अभिषेक, Sat, 16/03/2013 - 13:32"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ...
बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते..
पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते..
वाट
प्रेषक, आतिवास, Fri, 15/03/2013 - 11:24त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी.
येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं.
आणि मग तो आला की भरपूर गर्दी.
ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे.
येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा.
ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची.
इमोशनल फुलांच्या देशा…
प्रेषक, रामबाण, Mon, 11/03/2013 - 10:35आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं.
आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.
आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य.
40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय... तर, नमस्स्स्त्ते.
एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?
प्रेषक, लिलि काळे, Sat, 09/03/2013 - 17:49आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?
आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.
पैला नंबर
प्रेषक, आतिवास, Sat, 09/03/2013 - 12:32आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.
गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची.
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.
म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.
पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.
कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.