मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौजमजा

बेण आणि मी - एक ओळख.

भरत्_पलुसकर ·
लेखनप्रकार
तर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला. "छान!

"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."

Anand More ·
लेखनविषय:
आरोप: तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात. स्पष्ट शब्दात दिलेली समज:
  1. तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
  2. फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय.

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

स्वीट टॉकर ·
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ _________________________________________________ शाळेसमोर उभा होतो. Reunion चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये होतं. मी जिममध्ये केलेल्या सरावाचे स्मरण करत जिना चढून वर गेलो. मुलींनी छान रांगोळी वगैरे काढली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजच्या मागे पडद्यावर Reunion चा फ्लेक्स लावला होता. काही जण माझ्या आधीच येउन बसले होते. हुबळी वरून किरण, पुण्यावरून स्वाती, राज, सारंग, अनघा, मीनल, मुंबई वरून ओंकार असे कोण कोण कुठून कुठून आले होते. मुली साड्या नेसून तर मुलं झब्बे बिब्बे घालून, सगळे छान दिसत होते. त्यांच्या सगळ्यात, सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ टी शर्ट घातलेला मी वेगळा दिसतोय असे मला वाटू लागले. पण मग माझे लक्ष जरा बारीक झाले. अनेकांची पोटे माझ्यापेक्षा जास्त सुटली आहेत, कित्येकांच्या केसावर काळाने आपला हात फिरवला आहे हे दिसू लागले. मला थोडे माणसात आल्यासारखे वाटू लागले. ग दि मांच्या "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला. मी तिला शोधत होतो. अजून कुठे दिसत नव्हती.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ भाग २ भाग ३ _________________________________________________ सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला मी बाहुबली असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.

कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

माम्लेदारचा पन्खा ·
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी : ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ भाग २ _________________________________________________ माझी नववी, दहावीच्या आधी आली आणि आठवीच्या नंतर. आठवीत असताना अनेक नवीन गोष्टी घडल्या. माझा अवखळ स्वभाव पाहून शाळा सुटताना सर्व विद्यार्थी रांगेत नीट जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी माझीच नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मला आवरण्याचा शिक्षकांचा त्रास वाचला. आणि मला ती दिसली. छान होती. छोटीशी. तिचे कपडे कडक इस्त्रीचे असायचे. चेहऱ्यावर एक उदास हसू असायचे. जणू कुणाला तरी शोधत असावी. मी बघितले की तिची नजर खाली जायची. एकदा ती माझ्याकडे बघून हसली असे मला वाटले आणि इतके दिवस मनाचे श्लोक, मूर्खांची लक्षणे, मारुतीस्तोत्र वगैरेंच्या पाठांतरात प्रत्यक्ष कल्याण स्वामींशी स्पर्धा करणाऱ्या माझी छाटी उडाली.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ ___________________________________________________ मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.