चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर
लेखनप्रकार
- Read more about चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“नाहीतर काय?अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १
लेखनप्रकार
- Read more about अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १
- 41 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती!
-----------------------------------------------------------------------------
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय.
चाळीची चिंता
लेखनविषय:
- Read more about चाळीची चिंता
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
अमुकराव: रामराम हो तमुकराव रामराम.
तमुकराव: हं. रामराम.
अमुकराव: काय हो, काय लई चिंतेत हाय काय? रामरामबी करूना वाटं व्हय?
तमुकराव: काय नाय हो. आपलं नेहमीचंच चाललंय.
अमुकराव: काही म्हणा तुमी तमुकराव, तुमचा चेहेराच सांगू र्हायलाय की कायतरी घडलंय म्हनून. कायतरी हाय तुमच्या मनात. काय आसंल तर सांगून टाका. मन मोकळं करा बघा.
तमुकराव: काय सांगायचं तुमाला अमुकराव. माझं दुख तुमाला सांगून कमी व्हनार हाय काय?
अमुकराव: आसं कसं? आवं जरी तुमी मला सांगीतलं तर म्या काय तुमचं दुख वाटून घेनार नाय पन त्या दुखातून बाहेर पडायचा कायतरी उपायतरी सापडल का नाय? सांगा सांगा.
गजरा - एक प्रवास
- Read more about गजरा - एक प्रवास
- 26 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)
लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.
धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)
- Read more about धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)
- 72 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...???
प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D
र ला ट जोडले
कसेतरी यमक जुळले
बसल्या बसल्या कविता पडली
हे मलाच कसे नाही कळले???
अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे..
कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून,
पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून...
यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ...
पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
*(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)
हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?
- Read more about हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ?
असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे.
मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर.
तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा.
सुरुवात स्वत:पासून करतो:
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.
तुम्ही किती व्यवस्थित आहात?
लेखनप्रकार
- Read more about तुम्ही किती व्यवस्थित आहात?
- 31 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.