हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
(पाक प्रवक्ता हे मुख्य पात्र आहे. त्याचे नाव आहे फुरफुर. त्याने वॉररूम सारखी ट्विटररूम बनवली आहे. त्यात तो स्वत: व त्याचे तीन दुय्यम सहकारी बसलेले आहेत. सर्वाच्या पुढे फोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळी अत्याधुनिक साधने आहेत. याच रूमला जोडून फुरफुरची एक साऊंडफ्रुफ केबीन आहे.)
भाग १
पहिला: सर, भारताची तीन विमाने पडली आहेत.
दुसरा: नक्कीच आपण पाडलेली असणार. आपण २४ पाठवली होती. त्यांची सगळी मिळून अशी किती असतील?
फुरफुर: १९९१ च्या गल्फ वॉरनंतर एवढं मोठ्ठ २४ विमानांच फॉरमेशन जगात प्रथमच होतंय. हेच तर आपलं धक्कातंत्र आहे.