मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन

खेळ राजकारणी असा रंगला....

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून, मूळ गीत - फड सांभाळ तुर्‍याला ग आला.... खेळ राजकारणी असा रंगला.... काका लागला काड्या घालायला || धृ || मूळ बारामतीचं बेणं.... हळूहळू यानं गिळलं पुणं.... धोका देण्यात अति प्रवीण.... घेतलं कडेवर जनता पार्टीला.... दिला धक्का वसंतदादांला.... बाईने हाकललं याच्या सरकारला.... परतून धरले राजीवच्या पायाला…. काका लागला काड्या घालायला || १ || पाळले कलानी आणि ठाकूर.... खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर.... पोरगी - पुतण्या आणले वर.... गोवारींवर काठ्या बरसल्या.... करुन विरोध गोर्‍या बाईला.... काढला पक्ष दुकान चालवायला.... परी सरकारी जोडीने नांदला…. काका लागला काड्या घाला

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

अज्ञात ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
दादा कोंडकेंची माफी मागून मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान.... एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध || माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा... जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा? पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ || चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया... सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया... खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ || देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव.... करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव... चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान...

तुझ्या 'सविते'ची ओळ उर्फ भाभीजी

दमामि ·
लेखनविषय:
काव्यरस
पेर्ना तुझ्या 'सविते"ची ओळ अवचित दिठी येते 'रानातल्या' निवडुंगा इवलेसे फूल येते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते खाटल्याच्या खोळातून कामधून उमटते.. तुझ्या 'सविते'ची ओळ अवचित दिठी येते पाखरांच्या थर्थरीने वठली वेल मोहोरते.. 'सविते'ची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा दिठी येते पुन्हा पुन्हा भिजवूनिया पुन्हा पुन्हा हुबारते..

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)

चिनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचे प्रेरणास्थान... साडेतीन शहाणे https://www.misalpav.com/node/43829 दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम... जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो... ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये. कबीर: इम्रान आला नाही यार अजून? अर्जुन: त्याचं नेहमीचंच आहे रे. चल आपण सुरु करू. काय घेणार तू?

(तनुने नानास मी टू म्हणणे )

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात तनुने नानास मी टू म्हणणे रसिकांच्या मनी अदम्य लवथव पडद्यावरचे विश्व विभ्रमी कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव नटसम्राटासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती मिडीयाची लाईक डीस्लाईक मोजुनी थकती व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती हलकट स्पर्शी फोडा मुस्काट जागेवराती लंपटाचे मौन रहाणे अनेक वर्षे विणती जाळे संशयाचे पैजारबुवा,

'विडंबित' अंगाई गीत

वेल्लाभट ·
ब्लॉग दुवा https://www.apurvaoka.com/2018/12/blog-post.html लहान मुलं झोपत नाहीत अशी तक्रार बहुतेक पालकांची असेल कदाचित. अशाच एका पालकाच्या तक्रारीवर चिंतन करताना गमतीत सुचलेलं एक काव्य. सो गया ये जहाँ च्या चालीवर काही मराठी ओळी. यांनी चार दोन मुलं मुली वेळेवर झोपल्या तर त्यांच्या पालकांनी जरूर अभिप्राय कळवावा☺️ झोपली जंगले झोपली श्वापदे झोपले झाड ही झोपली पाखरे झोपली धरा अन अंबरे घरे अन मंदिरे झोपले चराचर झोपल्या या नद्या झोपले हे झरे झोपल्या टेकड्या पर्वतांचे कडे झोपली उन्हे किरणे नभी तिथे क्षितिजावरी झोपला रवी तो सो गया ये जहाँ चा मराठी अवतार.

मी घेतली यॉट

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
मी घेतली यॉट ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. मी तर घेतली बाबा यॉट फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ || नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१|| इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२|| आय.आय.टी., आय.आय.एम.

तुझ्या माझ्यासवे......(विडंबन)

OBAMA80 ·
तुझ्या माझ्यासवे.... तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही पडेना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही *********************** विडंबन तुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही तुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही होईना पाच मिनीटे भेटूनी तुला कसा कोठूनी अलगद टपकाय