✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी - compliance training

स
स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी
Tue, 01/13/2015 - 22:55  ·  लेख
लेख
एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ,दहा,अकरा ***********************************************

7a2d64250d5fa7b447fcbcb44a8b60db

या लेखमालिकेतील ७व्या लेखात तुम्ही Applied Behavior Analysis बद्दल थोडे वाचले. आता जरासे खोलात जाऊन पाहू, एबीए मध्ये नक्की काय काय होते.

आमच्या घरी जेव्हा एबीए थेरपिस्ट सर्वप्रथम आली, तेव्हा आम्ही खूप उत्सूक होतो, की आता काय होते. ही काय करतेय.. पण ती आल्यापासून इतकी शांतता घरात. नुसती बबल्स व पेन-कागद व कमालीचा पेशन्स घेऊन आली होती ती. बसून राहीली मुलासमोर. बबल्सने त्याचे लक्ष वेधून घेतले. व कागदावर रेघोट्या मारत बसली. आश्चर्य म्हणजे मुलाने देखील पेन घेऊन रेघोट्या मारायला सुरवात केली. चक्क तिच्यासारखे पॅटर्न्स काढण्याचाही प्रयत्न केला त्याने. एक शब्द बोलण्याची, कमांड्स देण्याची गरज पडली नाही तिला.

अर्थात एबीए म्हणजे कायम शांतता किंवा इतकेच नव्हे. परंतू सुरवात कायम मुलांच्या नेतृत्वाने होणार हे नक्की. हळूहळू मुलाला समजून घेतले, त्याच्या आवडीनिवडी - आवडीचे छंद, व्हिडीओज, खेळणी इत्यादी ओळख झाली की पुढील मार्ग सोपा होतो. रिलेशनशिप बिल्ड करणे सोपे जाते.

मी मागील बर्‍याच लेखात उल्लेख केलेले पेरंट ट्रेनिंगबद्दल मी मुख्यत्वेकरून आज लिहीणार आहे. प्रत्येक थेरपिस्ट हे ट्रेनिंग कोळून प्यायलेली असते (निदान आयडीयली असं असावे.)

  1. ट्रेनिंगची सुरवात होते, attend कसं करावं इथपासून. म्हणजे, पालकाने निदान १० मिनिटं तरी पाल्याबरोबर बसून त्याच्या नेतृत्वाने पुढे जावे. म्हणजे मुलगा जर लेगो ब्लॉक्सशी खेळत असेल, तर त्याला तो गेम खेळू द्यावा, "चल, आपण कार्सशी खेळू " असं म्हणून त्याचे लेगो ब्लॉक्स काढून घेणं हे चुकीचे. त्याला लेगो ब्लॉक्सशी खेळू द्यावे. आपण त्याच्या शेजारी बसून नुसते तो काय करत आहे याचे वर्णन करावे. उदा: "You are playing with lego", "You took the yellow block", "Yellow on the red" , "Oh you are throwing the blocks" इत्यादी. लक्षात ठेवा या स्टेपला आपण शेवटचे वाक्य म्हणू शकतो. कारण आपण त्याला अटेंड करत आहोत. त्यामुळे इनअप्रॉप्रिएट बिहेविअर देखील आपण अटेंड करणार आहोत. हे असं केल्यानंतर मुलं लगेच तुमच्याशी येऊन खेळतील असं नाही, परंतू त्याच्या डोक्यात कुठेतरी तुमचे बोलणे रजिस्टर होते. तो यलो ब्लॉक रेडवर ठेवेल तेव्हा तुमचे वाक्य ऐकून त्याला "ऑन द टॉप ऑफ" हे प्रिपोझिशन समजेल. पूर्णपणे नाही कदाचित परंतू हळूहळू भाषा समजायला या पद्धतीचा फायदा होतो. या फेजमध्ये आपण मुलांना ना प्रश्न विचारू शकतो, ना कमांड देऊ शकतो.
  2. दुसर्‍या स्टेपला अटेंड करता करता तुम्ही प्रेझेस द्या, कौतुक करा. उदा: "you are playing with the legos (अटेंड)" - "I like the way you are sitting quietly (प्रेझेस)" साधारण ३-४ अटेंड्स नंतर एक प्रेझ हा चांगला रेशो आहे. :) नुसतंच कौतुक करणं हे तोंडदेखलं आहे हे ही मुलंसुद्धा ओळखू शकतील! त्यामुळे त्यांचे खेळणं बघा, तो कशा पद्धतीने खेळत आहे, त्याच्या डोक्यात काय चालले असेल ह्याचा विचार करून अटेंड्स करणं, प्रेझेस देणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे - रिलेशनशिप बिल्ड करण्याच्या दृष्टीने.
  3. इनअप्रॉप्रिएट बिहेविअर कडे दुर्लक्ष. लेगो खेळता खेळता मुलगा उठून रूममध्ये गोल गोल चकरा मारू लागला, फ्लॅपिंग-स्टिमिंग करू लागला तर तुम्ही त्याकडे कम्प्लिट दुर्लक्ष करणे. लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या फेजवर असाल तर हे देखील काही प्रमाणात एक्स्प्लेन करू शकता, परंतू या आत्ताच्या फेजला नाही. मुलांना हळूहळू कळत जाते की असं वागलो की काही लक्ष नसतं बाबांचे माझ्याकडे, किंवा काहीच अटेंड्स वा प्रेझेस मिळत नाहीत मला. जाऊदे जाऊन बसूया शेजारी त्यांच्या. ज्या क्षणाला मुलगा बाबांच्या शेजारी जाऊन बसेल, तेव्हाच बाबांनी एकदम लक्ष मुलाकडे देऊन त्याचे कौतुक केले पाहीजे. "अरे वा, तू खेळायला आलास परत!" "you want to play with the blocks"इत्यादी.
  4. या पुढच्या फेजला तुम्ही कमांड देऊ शकता. पण ती अल्फा कमांड असली पाहीजे. अल्फा कमांड म्हणजे प्लेन साधी कमांड. डू धिस. सिट डाऊन, गिव्ह मी अ कप या झाल्या अल्फा कमांड्स. बीटा कमांड म्हणजे जराश्या व्हेग वाटू शकतील अशी वाक्यं. "let's do this". "why don't you clean up?" ऑटीझम असलेल्या मुलांना हळूहळू हे प्रश्न किंवा ही संवादशैली समजेलही, परंतू सुरवातील साधी,सोपी वाक्यं कमांड म्हणून वापरणे हेच श्रेयस्कर.
  5. मुलांच्याकडून जास्तीत जास्त कम्प्लायन्स हवा असेल तर हाय-पी, लो-पी पद्धतीचा वापर करावा. हाय-प्रोबॅबिलीटी कमांड फॉलोड बाय लो-प्रोबॅबिलिटी कमांड. मुलाला नाक, डोळे कुठे आहेत हे दाखवणे सहज जमत असेल, आवडत असेल तर ते विचारून नंतर लगेच त्याला जमणारे परंतू तो करायला खळखळ करेल असं काहीतरी विचारल्यास तो ते करून दाखवण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण सुरवातीला त्याला आवडणारे, येणारे प्रश्न विचारून एक टेम्पो तयार करत असतो.त्या प्रत्येक हाय प्रोबॅबिलिटी प्रश्नाच्या त्याने दिलेल्या रिस्पॉन्सला आपण प्रेझ करत असतो, त्या नादात अवघड गोष्ट देखील बर्‍याचदा सहज केली जाते. हळूहळू येणार्‍या, हमखास जमणार्‍या गोष्टींमध्ये वाढ होऊन मूल नवनवीन गोष्टी शिकत जातो.
  6. ह्या सर्वांहीपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट : ३ स्टेप कम्प्लायन्स. १)टेल मी २) शो मी ३) हेल्प मी डू इट. तुम्ही मुलाला सांगत असाल, वॉश युअर हँड्स. तर फर्स्ट स्टेप : मुलाला सांगा, "वॉश हँड्स" त्याने लगेच ऐकले तर बिग पार्टी! नाही ऐकले तर थोड्या वेळ थांबून २) "वॉश हँड्स"-> बेसिनकडे हात दाखवा/ बेसिनपाशी जा. त्याने ऐकले तर थोडक्यात कौतुक करा. नाही ऐकले तर थोडं थांबून, ३) परत एकदा "वॉश हँड्स" म्हणून त्याच्या हातावर हात ठेऊन हात धूण्यास मदत करा. या वेळेस कौतुक नाही - कारण त्याला मॅक्झिमम प्रॉम्प्टची गरज पडली. प्रत्येक इंटरॅक्शनला हे असं वागणं पालकांकडून अपेक्षित आहे. 3 step compliance हे चित्र इथून घेतले आहे.

ऑफकोर्स हे असं सतत वागणं, किंवा अशीच इंटरॅक्शन असणे, त्यावरच मुलांनी रिअ‍ॅक्ट करणं हे सगळं फार फार रोबोटीक आहे. मुलं रोबोसारखी वागतातच! त्यामुळे बराच काळ वापरल्यानंतर एबीए पद्धत थोडी रोबोटीक वाटते. पण काही महत्वाच्या गोष्टी , शिस्त, मॅनर्स तसेच कसे खेळावे हे शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर अनिवार्य आहे. मुलं बरीच स्किल्स डेव्हलप करतात. दैनंदिन जीवनातील बर्‍याच गोष्टींसाठी ही सिस्टीम नक्कीच पूरक आहे.

http://marathi.journeywithautism.com/

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3045 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

वाचत आहे...

मुक्त विहारि
Tue, 01/13/2015 - 23:11 नवीन
खूप माहिती मिळत आहे...
  • Log in or register to post comments

प्रत्येक पायरी अगदी व्यवस्थित

विशाखा पाटील
Wed, 01/14/2015 - 09:28 नवीन
प्रत्येक पायरी अगदी व्यवस्थित मांडली आहे. patience ला सलाम!
  • Log in or register to post comments

वाचतेय. अगदी सोप्या भाषेत

मधुरा देशपांडे
Wed, 01/14/2015 - 14:51 नवीन
वाचतेय. अगदी सोप्या भाषेत लिहिताय.
  • Log in or register to post comments

बारीक अभ्यास !

सस्नेह
Wed, 01/14/2015 - 15:55 नवीन
वाचतेय..
  • Log in or register to post comments

वाचतोय आणि खुप आवडतय.. सलाम..

शैलेन्द्र
Wed, 01/14/2015 - 16:49 नवीन
वाचतोय आणि खुप आवडतय.. सलाम..
  • Log in or register to post comments

वाचतेय.. तुमची जिद्द आणि

आनन्दिता
गुरुवार, 01/15/2015 - 01:21 नवीन
वाचतेय.. तुमची जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत नेहमी असो ही सदिच्छा !
  • Log in or register to post comments

केव्हढा संयम पाहिजे हे सगळ

स्पंदना
गुरुवार, 01/15/2015 - 04:13 नवीन
केव्हढा संयम पाहिजे हे सगळ करायला! खुप सोप्प करुन सांगितलं आहे सगळं. आणि सगळ्यांसारखाच माझाही सलाम!!
  • Log in or register to post comments

एक वेगळा विचार

सुबोध खरे
Sat, 01/17/2015 - 00:51 नवीन
स्वमग्नता ताई तुम्हाला एक सुचवावेसे वाटते. तुम्ही सुमाता आहातच परंतु थोडा`सा वेळ सुपत्नी होण्यासाठी सुद्धा द्या.आपण देत नसाल असे मी म्हणत नाही पण जर तसे होत असेल तर आपल्याला आपल्या यजमानांसाठी थोडासा वेळ पत्नी म्हणून देणे आवश्यक आहे. आपले मूल वेगळे आहे आणी त्याच्या कडे सतत लक्ष द्यावे लागते हि कितीही वस्तुस्थिती असली तरीही आपल्या बायकोने आपल्याकडेहि थोडावेळ लक्ष द्यावे असे आपल्या यजमानांनाहि वाटत असेल.तशी मागणी आपल्याकडे करणे हेही त्यांना कठीण वाटत असते त्यामुले बर्याच वेळेस ते बोलून दाखवू शकत नाहीत. फार नाही पण आठवड्यात एखाद दोन तास त्यांच्या आवडीचे कपडे, शृंगार ई आपण केलात तर त्यानाही बरे वाटेल आणी आपल्यालाही विरंगुळा वाटेल. शेवटी कोणत्याही स्त्री ला आपल्या आवडत्या माणसासाठी नटायला आणी साज शृंगार करायला आवडतेच. (आपले लग्नानंतरचे सोनेरी दिवस आठवून पहा आणी ते दिवस परत जगण्याचा एकदा तरी प्रयत्न करून पहा) (आपण हे करतही असाल.) कोणत्या नवर्याला आपली बायको आपल्या अवती भवती सुंदर कपड्यात वावरत असलेली आवडत नाही? एकदा त्यांच्या दृष्टीने विचार करून तर पहा. याहूनही महत्त्वाचे दर "रोज" एक तरी तास आपण स्वतःसाठी देणे आवश्यक आहे. मग यात एखादे पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, शांत बसून कॉफी पिणे किंवा यजमान/ मित्र मैत्रीण यांच्या बरोबर गप्पा मारणे यासाठी द्या. अन्यथा आपल्या मुलाची चिंता आपल्याला मानसिक दृष्ट्या थकवणारी आहे दिवसाचे २३ तास सतत तो विचार डोक्यात ठेवून मेंदूला शीण येतो आणी आपली ब्याटरी सतत चार्जड ठेवणे कठीण जाते. यासाठी हा स्वतःला दिलेला वेळ फार अमुल्य असतो. YOU DEFINITELY DESERVE IT. विचार करून पहा. पटले तर घ्या नाही तर सोडून द्या
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा