गम्मत (शतशब्दकथा)
लेखनविषय (Tags)
''तुला काय काय करता येतं बेटा ?''
''मला … नं ? जादू करता येते !''
''कसली ? ''
''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . ''
''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?''
''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! ''
ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !''
''सॉरी अंकल !''
वेरी सॉरी हं . .
'' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले .
- काईपण बोल्लं तरी रागवतेच !
''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! ''
ममानं मला उचललं अन आत पळाली.
ममा झुरळाला घाबरली तेवडीच गम्मत सांगणार होते!
आता पाहुणे आल्यावर बोलणारच नै. . .
मग म्हणतील - '' बोलावं जरा. . !''
प्रतिक्रिया
छान!!!
?
ममाच्या मनात चांदण....
ममाच्या मनात चांदण>>>>>>
झकास!
आवडली!
चांगली जमली आहे कथा.
ह्ही ह्ही ह्ही!
वा वा मस्त
मस्त