गम्मत (शतशब्दकथा)

खेडूत जनातलं, मनातलं
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली. ममा झुरळाला घाबरली तेवडीच गम्मत सांगणार होते! आता पाहुणे आल्यावर बोलणारच नै. . . मग म्हणतील - '' बोलावं जरा. . !''
वर्गीकरण
लेखनप्रकार

10 टिप्पण्या 3,190 दृश्ये

Comments

बहुगुणी नवीन

आवडली. (शरु आन्जीची थोडीशी शहरी आवृत्ती वाटली.)