चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ४) - Filter, Conditional Formatting आणि Text to Columns
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ३) - Entering Data, Clear आणि Paste Special
*********************************************
राम राम मंडळी, चौथा तास.
आज शिकूया..
1) Filters
2) Conditional Formatting
3) Freeze Panes
4) Text to Columns
*********************************************
1) Filters - होम टॅबवर एडिटींग सेक्शनमध्ये फिल्टर फंक्शन आहे.
Filters चा उपयोग मुख्यत्वेकरून मोठ्या डेटामधून आपल्याला हवा तो डेटा पाहण्याकरता होतो. डेटा पाहताना वेगवेगळ्या क्रायटेरीयांचा, रंगांचा वापर करता येतो.
वरील उदाहरणामध्ये मे २०१२ च्या कॉलमला फिल्टर अॅप्लाय केला आहे.
फिल्टर विंडोमध्ये वेगवेगळ्या ऑप्शन नंतर सर्वात खाली त्या कॉलममधील सर्व डेटा दिसतो. इथे हवा तो सर्व डेटा टिक करून पाहता येतो.
नंबर फिल्टर्स** मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात, Equals, Does not Equal, Greater Than.. आपण इथे Greater than or Equal to चा वापर करून 2800 व त्यापेक्षा मोठ्या संख्यांना फिल्टर लावला आहे.
१) इथे फिल्टर लावलेल्या हेडरचा (cell G2) फिल्टर आयकॉन बदलला आहे.
२) फिल्टर केलेल्या परंतु दिसणार्या Rows चे नंबर्स निळे झाले आहेत
३) Rows Number ५, ६ आणि १० हाईड झाले आहेत. (साध्या हाईडमध्ये रो नंबर निळे होत नाहीत!)
**filter केलेला डेटा, टेक्स्ट आहे की नंबर्स हे एक्सेल ओळखते व त्यानुसार आपल्याला नंबर फिल्टर्स / टेक्स्ट फिल्टर्स ऑप्शन दिसतो.
*********************************************
2) Conditional Formatting
कंडीशनल फॉरमॅटींग आपल्याला हवा तो डेटा हव्या त्या कंडीशनप्रमाणे फॉरमॅट करण्यासाठी वापरतात.
१) आपल्याला ज्या डेटा रेंजला कंडीशनल फॉरमॅटींग करायचे आहे ती रेंज प्रथम सिलेक्ट करून घ्यावी.
२) होम टॅबमध्येच कंडीशनल फॉरमॅटिंग ऑप्शनमध्ये जावून आपल्याला हवा तो रूल निवडून घ्यावा.
आपण इथे "हाईलाईट सेल्स ग्रेटर दॅन" हा रूल निवडला आहे.
आता ही विंडो समोर येईल.
३) इथे (सेल्स ग्रेटर दॅनच्या खाली) 4000 एंटर केले आहे व "लाईट रेड फिल" हा फॉरमॅट सिलेक्ट केला आहे.
जिथे आपण 4000 एंटर केले आहे तिथे आपण एखाद्या सेल चा रेफरन्स देवू शकतो. त्या सेलमधली व्हॅल्यू बदलल्यानंतर सर्व फॉरमॅटिंग आपोआप बदलेल.
जर एखादा रूल बदलायचा असेल तर Manage Rule मध्ये जावून ते Edit करावेत.
कंडीशनल फॉरमॅटींगचे आणखी काही रूल..
*********************************************
3) Freeze Panes
फ्रीझ पेन्स मध्ये एक रेंज फिक्स करून बाकीची संपूर्ण वर्कशीट स्क्रोल करता येते.
या फंक्शनचा प्रमुख फायदा एखाद्या मोठ्या डेटावरती काम करताना "हेडर व साईडचा डेटा फ्रीझ करून बाकीचा डेटा स्क्रोल करताना" होतो.
इथे Cell E5 वरती कर्सर ठेवून Freeze Panes केले आहे. त्यामुळे रेंज C2 ते D4 फिक्स झाली आहे.
याचप्रमाणे "स्प्लिट विंडो" नावाचा याच्या जवळचाच ऑप्शन संपूर्ण वर्कशीटला स्प्लिट करतो.

4) Text to Column
या फंक्शनमध्ये एकाच सेलमध्ये असलेला डेटा वेगवेगळ्या सेल्स मध्ये प्लॉट करता येतो.
उदा.
Misalpav.2073.co.in.Pune
Misalpav.1583.co.in.Mumbai
अशा प्रकारचा डेटा
Misalpav 2073 co in Pune
Misalpav 1583 co in Mumbai
असा प्लॉट करायचा असेल तर Text to Column वापरतात.
सर्वप्रथम हवा असलेला डेटा सिलेक्ट करून घ्यावा व Data टॅबमध्ये Text to Column सिलेक्ट करावे.
पहिल्या विंडोमध्ये आपल्याला Text to Column कसे वापरायचे आहे ते ठरवायचे आहे.
1) Delimited - यामध्ये डेटा एखाद्या स्पेशल कॅरेक्टरनुसार टप्प्यांमध्ये विभागला जातो.
2) Fixed With - यामध्ये डेटा सरळ एखाद्या रेषेनुसार विभागला जातो.
आपण इथे Delimited चे उदाहरण बघूया..
Preview section मध्ये डेटा बदलत जातो याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Delimited सिलेक्ट करून
Next
येथे सेमीकोलन, कॉमा, स्पेस वापरून अथवा इतर कोणतेही स्पेशल कॅरेक्टर (Other समोरच्या जागेत) एंटर करायचे आहे.
Next
येथे डेटा फॉरमॅट तसेच विभागलेला डेटा कुठे प्लेस करायचा ते ठरवायचे आहे.. आपण जनरल फॉरमॅट व C3 ही रेंज सिलेक्ट केली आहे.
Next
सिलेक्ट केलेला ओरिजिनल डेटा आणि Text to Column वापरून विभागलेला डेटा.

पुढील भागापासून आपण Formulae बघायला सुरूवात करूया..

Book traversal links for चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग ४) - Filter, Conditional Formatting आणि Text to Columns
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान.
शिकवायच्या तळमळीला सलाम
कंडीशनल फॉर्म्याटिंग मधे कॉशन
कंडीशनल फॉर्म्याटिंग मधे कॉशन खातर ब्लिन्कची सोय असायला पाहिजे होती नाही का ?म्हणजे नक्की कशी हो चौरा..?असे की
मी फिल्टर्स वापरते.
मस्त रे, धाग्याचं कांपोझिशन
धन्यवाद गुरुजी,
इथून पुढचे भाग अधिकाधिक
एकदम छान भाग!! कंडिशनल
नेहेमीप्रमाणेच झकास धागा,
सुंदर
हा भाग एकदमच खास...
आज शिकूया.. 1) Filters 2) Conditional Formatting 3) Freeze Panes 4) Text to Columnsही एक्सेलची पॉवर फिचर्स वापरायला सोपी पण वेळ आणि श्रम वाचवायला प्रचंड उपयोगी पडतात... Conditional Formatting वापरून Filters लावण्याची सोय तर अफलातून आहे ! भाराभर डेटा व्यवस्थीत बघायाला Freeze Panes सारखे दुसरे टूल नाही. लेखमाला एकदम मस्त चालू आहे... पुभाप्र. MS Excel चा केवळ पंखाच नव्हे तर अगदी ३ टनी एसी... इस्पिकचा एक्काआमची रोजीरोटी ह्यावरच चालते
Text to column... अत्यंत
excel शिकण्याचा सर्वात सोपा
उदाहरणार्थ
+१ हेच बोल्तो...
फारच छान !
अतिशय चांगली मालीका मोदक
अशीच एखादी मालिका जावा किंवा
अशीच एखादी मालिका जावा किंवा .नेट वर करता येईल का ?अवश्य करता येईल, अशा मालिका चालवणे फारसे अवघड नाहीये, पण मला या लॅग्वेजेस येत नाहीत. :-( मिपावरचे आयटी तज्ञ विमे, धन्या, वल्लीशेठ वगैरे मदत करू शकतील. उत्तम सूचनेबद्दल आभार.मोदक पाजी
पेशन्स चौरा.. पेशन्स...
आम्हालाही शिकवा डॉटनेट...
मस्त मालिका...
माझे वडिल सुद्धा तुझी ही
धन्स हो मदनबाण..
मस्त!
धागा वर काढतोय
मी गेले ९ वर्षे गुगल शीटवर
सहकार्यबद्दल धन्यवाद.
एक्सेल
१) एक्सेल किंवा गुगल मध्ये
Data validation declaration केलं.
हे मी एक्सेल शिकुया धाग्यावर