✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.

ब — बॅटमॅन, गुरुवार, 12/20/2012 - 19:56
लॉर्ड ऑफ द रिंग्जचे जरा जुनाट पद्धतीने केलेले वर्णन आहे. जाड्या टाईपातल्या शब्दांमुळे लग्गेच समजेल. मध्यदेशे पुरा कल्पे निर्मिता: अङ्गुलीयका: | धृतास्ते तु त्रयो एल्फै: ये तत्र पण्डितोत्तमा:||१|| सप्त धृता: खलु ड्वार्फै: ते सर्वे खानकोत्तमा: | अङ्गुलीयका: नवति लोभिभि: मनुजै: धृता: ||२|| अङ्गुलीयकै: खल्वेतै: राजन्ते तु नृपा: खलु | तान्सर्वान वञ्चयत्येकः मान्त्रिकस्तु भयङ्करः||३|| मॉर्डॉरमंडले एकोऽत्तुङ्गो ज्वालामुखी नगः | मृत्युपर्वतनाम्ना सः मध्यदेशे प्रकीर्तितः||४|| मान्त्रिकः स सॉरॉनाख्यः मृत्युपर्वतवह्निषु | मन्त्रशक्त्या: हि कृतवान् अमोघं अङ्गुलीयकम्||५|| अन्यातिशायी एको हि तस्य भो: अङ्गुलीयकः | तस्य सामर्थ्यमात्रेण इतरास्तु हतप्रभा: ||६|| अन्धःकारे नॄपान्सर्वान् बद्ध्वा कारागृहे तथा | मध्यदेशोऽनुवर्तेत ममैतं चाङ्गुलीयकं ||७|| मनस्येतन्मन्यमानः सर्वथैव मुहुर्मुहु: | मध्यदेशस्य राज्यानि स दासीकृतवान् खलु ||८|| केचिदासन् परं तत्र खलु स्वातंत्र्यकामिन: | आहूतः अंतिमः सङ्घः तथा मनुजएल्फयो: ||९|| भयङ्करं महायुद्धं मृत्युपर्वतरोधसि | सॉरॉनस्य ये योद्धारः ऑर्कनाम्ना प्रकीर्तिता: ||१०|| एल्फमनुष्ययोश्चैव दृष्टमानः जयो यथा | मान्त्रिकेभ्यः महाकाय: सॉरॉन: समुपस्थितः ||११|| महोत्तुङ्गो दंडधारी युध्यमानः स्वयं खलु | न शक्यं तमपाकर्तुं केनाप्यायुधजीविना ||१२|| तथापि स: प्रयतत शूरः गान्धारभूनृपः | दण्डप्रहारमात्रेण क्षिप्तः दूरे स शत्रुणा ||१३|| पितरः कृते विलपति पुत्रस्तस्य इसिल्डुरः | यदानीमसिदण्डं स: अगृह्णात् महदाहवे ||१४|| तदानीमेव अचिरात् मान्त्रिकेण पदेन वै | द्विधा कृतः असिदण्डः तेन च भयकारिणा||१५|| जयाशा हि गता एव तथा मनुजएल्फयो: | गतो राजा तदानीं तु किं नु युद्धेन सिध्यते ||१६|| तथापि स इसिल्डूरो न बिभेति कदाचन | खण्डितेनासिमात्रेण युद्धाय कृतनिश्चयः ||१७|| अछिनत् सः सपद्येव सॉरॉनस्याङ्गुलान्यहो!! निष्प्रभस्तु तथा तस्य प्रचण्डः अङ्गुलीयकः ||१८|| महत्शौर्यं महद्धैर्यं देवतुल्यं हि साधु भो: !!! अतिचिरात् स सॉरॉनः मध्यदेशात् पलायितः||१९|| कथैषा कथिता आदौ जेआरार्-टोल्किनेन या | आङ्लवाण्यास्तु आनीय भारत्यां अनुकीर्तिता ||२०|| अपूर्णं काव्यमेतत्तु अवशिष्टम् अनेकशः | स्फूर्ति-समयबाहुल्यात् रचयिष्याम्यहं खलु ||

प्रतिक्रिया द्या
7902 वाचन

💬 प्रतिसाद (39)

आईगं...

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/20/2012 - 23:17 नवीन
अवघड आहेस रे बाबा. दंडवत !
  • Log in or register to post comments

धन्य आहेस!

पैसा
गुरुवार, 12/20/2012 - 23:29 नवीन
साष्टांग दंडवत! सगळं वाचून समजून घ्यायला जरा वेळ लागला. पण लै भारी. वाल्गुदेयाची कथा पण अर्धी राहिलीय ना! लवकर पुरी कर. आणि यात यमक, वृत्त, छंद वगैरे कोणते आहेत ते कोण सांगणार? :D
  • Log in or register to post comments

धन्यवाद फाकडे इष्टुर आणि

बॅटमॅन
Fri, 12/21/2012 - 00:17 नवीन
धन्यवाद फाकडे इष्टुर आणि पैसातै :) पैसातै, वाल्गुदकथा स्फूर्ति-समय-बाहुल्याप्रमाणे लिहीन जरूर. वृत्त तर साधं अनुष्टुप आहे, तुम्हाला कळालं असेलच :) बाकी संस्कृतला यमकाबिमकाचे टेन्शन नै, सो बरंय ;)
  • Log in or register to post comments

मी संस्कृत मध्ये कॉप्या करून

मालोजीराव
Fri, 12/21/2012 - 00:25 नवीन
मी संस्कृत मध्ये कॉप्या करून पास झालो नसतो तर कदाचित पूर्ण काव्य समजलं असतं ....असो चित्रपट पहिला असल्याने थोडीफार अब्रू वाचली म्हणायची !
  • Log in or register to post comments

मालोजीरावां सारखी आमच्याकडे

आनन्दिता
Fri, 12/21/2012 - 01:08 नवीन
मालोजीरावां सारखी आमच्याकडे पण संस्कृत ची बोंब.. परंतू चित्रपट पाहीला असल्याने वरील काव्याचा आनंद घेऊ शकले... बॅमॅ राव जबरदस्त जमवलयंत सगळं,,, खुप भारी ,,,
  • Log in or register to post comments

हे काय समजेल का?

समयांत
Fri, 12/21/2012 - 10:02 नवीन
संस्कृतात सुभाषितांच्या जोरावर माज करण्यार्‍या मला सपशेल माघार घ्यावी लागते आहे, याचे भाषांतर उपलब्ध होईल का? बॅटमॅन आपण संस्कृताभिमुख पुरातन बॅटमॅन आहात का? आताचा बॅटमॅन तुमचा वंशज आहे का?
  • Log in or register to post comments

भारीच रे बॅट्या..

ह भ प
Fri, 12/21/2012 - 10:07 नवीन
और ये गया बाऊंसर.
  • Log in or register to post comments

+१

इनिगोय
Fri, 12/21/2012 - 10:19 नवीन
+१ संस्कॄतची शिकवणी लावावी का काय? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

+२ बिलकूलच समजलं नै.

किसन शिंदे
Fri, 12/21/2012 - 18:21 नवीन
+२ बिलकूलच समजलं नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

_/\_

प्रचेतस
Fri, 12/21/2012 - 10:20 नवीन
_/\_ महान आहेस. आता अपूर्ण न ठेवता पटापटा पूर्ण कर पाहू.
  • Log in or register to post comments

दंडवत..

चिर्कुट
Fri, 12/21/2012 - 11:44 नवीन
आमची संस्कृतची गाडी इतक्या पुढे नाही पोचली कधी :) _/\_
  • Log in or register to post comments

भन्नाट!

कौस्तुभ आपटे
Fri, 12/21/2012 - 13:11 नवीन
संस्कृत वर चांगलाच हातखंडा आहे तुम्चा. असच बॅटमॅनच चरीत्र पण लिहुऊन टाका
  • Log in or register to post comments

महान आहेस रे बाबा !!!

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 12/21/2012 - 13:29 नवीन
महान आहेस रे बाबा !!! काव्य आवडले. संस्कृत वर जोरदार पकड आहे तुझी.
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
Fri, 12/21/2012 - 13:43 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

साधू ! साधू !!

प्रसाद गोडबोले
Fri, 12/21/2012 - 13:50 नवीन
कविर्ब्यॅटम्यॅन कविर्ब्यॅटम्यॅन कविर्ब्यॅटम्यॅन न संशयः || शिरसाष्टांग दंडवत !!
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत आणि कोटि कोटि प्रणिपात

चित्रगुप्त
Fri, 12/21/2012 - 13:57 नवीन
साष्टांग दंडवत आणि कोटि कोटि प्रणिपात. मति गुंग झाली वाचून. असेच लिहित रहा वाघुळराव. ....अवशिष्टम् रचा सूनःशुवरः....
  • Log in or register to post comments

विशेषण-विशेष्य

चैतन्य दीक्षित
Fri, 12/21/2012 - 14:01 नवीन
विशेषण-विशेष्याच्या विभक्ती जरा कुठे कुठे गंडल्या आहेत.... पण भारी. नुस्तं भारी लिहिता आलं असतं, पण अपूर्ण कथा पूर्ण करशील त्यात कमीत कमी चुका असाव्यात म्हणून लिहिले. राग नसावा :)
  • Log in or register to post comments

बरोबर आहे चैतन्य, राग नाही तर

बॅटमॅन
Fri, 12/21/2012 - 14:23 नवीन
बरोबर आहे चैतन्य, राग नाही तर सुधारणेस आवश्यक अशा सूचनांचे सफैव स्वागतच आहे :) मी नंतर पुन्हा तपासून पाहिले, तेव्हा गंडलेले काही दुवे दिसले, काही करेक्ट केलेत. सध्यापुरती अद्ययावत व्हर्जन इथे दिसेल. http://www.aisiakshare.com/node/1463
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

विशेषण-विशेष्य

केदार-मिसळपाव
Fri, 12/21/2012 - 18:54 नवीन
सहमत.. आमचे पन जर्मन भाषेत लिहीतान्ना अगदी असेच होते....विभक्ती, प्रत्यय, लिन्ग, वचन काही विचारु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

न म स्का र.......... बाकी

५० फक्त
Fri, 12/21/2012 - 14:36 नवीन
न म स्का र.......... बाकी आम्ही फक्त दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलं त्यामुळं काही बोलायची डेरिंग नाही, फक्त दंडवत.
  • Log in or register to post comments

+१ अगदी अगदी

मालोजीराव
Fri, 12/21/2012 - 15:31 नवीन
दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलं
दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत कॉप्यून सोडलं...आणि सोडलं ते सोडलंच कायमचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

_/\_

दादा कोंडके
Fri, 12/21/2012 - 18:00 नवीन
बाबौ! आमच्या वर्गातला एक मुलगा नववीमध्ये असताना संस्कृत मध्ये कॉमेंट्री करायचा ते आठवलं. (एखादं क्रियापद सापडलं नाही तर सरळ हिट्यते वगैरे विभक्ती प्रत्यय लावून तयार!) -(दहावी पर्यंत पुर्ण संस्कृत घेउनही 'नदी' शब्दसुद्धा पाठ नसलेला) दादा :(
  • Log in or register to post comments

>>हिट्यते

चिर्कुट
Fri, 12/21/2012 - 19:02 नवीन
१ नंबर :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हिट्यते!!!!!!!!

बॅटमॅन
Sat, 12/22/2012 - 00:18 नवीन
हिट्यते!!!!!!!! एकश्च नंबरो एषः ;) (इयं मिपावाणी-संप्रति दंगा श्रूयताम्) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मला शोलिड ईन्टरेस्ट आला आहे संस्कृत वाचायला....

केदार-मिसळपाव
Fri, 12/21/2012 - 18:56 नवीन
पण भाषान्तरा सोबत असेल तर नक्की चान्गले...
  • Log in or register to post comments

बापरे

विकास
Fri, 12/21/2012 - 19:48 नवीन
हा धागा आत्ता पाहीला. मस्तच आहे! आता तुम्ही तुमचे आयडी "सुसंकृत बॅटमॅन" असे करा. :-)
  • Log in or register to post comments

अरे वटवाघुळ मानवा ! असे कसे

मदनबाण
Fri, 12/21/2012 - 22:07 नवीन
अरे वटवाघुळ मानवा ! असे कसे एकदम भारी लिहतोस रे तू ? ;)उलटे लटकण्याचा परिणाम तर नाही ना ? ;) ते वाल्गुदेया पुराण अजुन झेपले नाही मला,त्यामुळे हे कथामॄत पिण्याचे कष्ट घेतले नाहीत बघ ! ;) लगे रहो... :)
  • Log in or register to post comments

कुणी समश्लोकी करुन देइल का?

कवितानागेश
Sat, 12/22/2012 - 00:24 नवीन
कुणी समश्लोकी करुन देइल का? :)
  • Log in or register to post comments

वाह

अर्धवटराव
Sat, 12/22/2012 - 05:02 नवीन
काय सुरेख काव्यरचना केली आहे... (अर्धवटराव, तुम्हाला काय घं* कळलं त्यातलं ?) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

शष्प काही समजले नाही..

चिगो
Sat, 12/22/2012 - 12:48 नवीन
संस्कृत घंटा काही कळत नाही आणि 'अंगठ्यांचा देव'ही पाहीलेला नाहीय.. पण तुमच्या हिमतीला सलाम..
  • Log in or register to post comments

वृत्तराज. काव्यविहारी

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/22/2012 - 16:49 नवीन
वृत्तराज. काव्यविहारी.वाघुळशास्त्री...आमचा शि.र.शासन दंडवत घ्यावा...! --^--^--^--
  • Log in or register to post comments

आम्हीही संस्कृत निरक्षर.

सस्नेह
Sun, 12/23/2012 - 13:06 नवीन
पण एवढे सर्व जण कौतुक करताहेत म्हणजे नक्कीच भारी असणार ! म्हणून आम्हीपण कौतुक..Image removed.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक

बॅटमॅन
Mon, 12/24/2012 - 02:10 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार :)
  • Log in or register to post comments

पुढे ?

प्रसाद गोडबोले
Tue, 01/01/2013 - 19:02 नवीन
पुढील भागांची आतुरतेने वाट पहात आहोत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

-/\-

sagarpdy
Tue, 01/01/2013 - 19:25 नवीन
-/\-
  • Log in or register to post comments

ही कुठली भाषा आहे ?

सांजसंध्या
Tue, 01/01/2013 - 19:58 नवीन
ही कुठली भाषा आहे ? :गोंधळलेली बाहुली:
  • Log in or register to post comments

संस्कृत आहे.

प्रचेतस
Tue, 01/01/2013 - 20:04 नवीन
संस्कृत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

धन्य जाहलो....

मेघनाद
Tue, 01/01/2013 - 20:57 नवीन
बॅटमॅनजि.....आपली प्रतिभा काही औरच आहे.....काय पण वर्णन केलय. लई भारी!
  • Log in or register to post comments

काव्य आवडले. संस्कृत येत नाही

इन्दुसुता
Fri, 01/04/2013 - 22:49 नवीन
काव्य आवडले. संस्कृत येत नाही पण शिकण्याची जबरदस्त इच्छा आहे, म्हणूनच तुमच्या बद्दल कौतुक मिश्रित आदर वाटतो. बाकी मिपाचे आद्य संस्कृत कवी श्री. नाणा* ( की णाना ? ) याण्ची आठवण झाली... त्याण्चा प्रतिसाद कुठे दिसेना तो? * टारू बाळाशी आमचे नाते नाही हो..अंमळ गैरसमज व्हायचा नाहीतर..::)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा