मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.
लेखनविषय:
लॉर्ड ऑफ द रिंग्जचे जरा जुनाट पद्धतीने केलेले वर्णन आहे. जाड्या टाईपातल्या शब्दांमुळे लग्गेच समजेल.
मध्यदेशे पुरा कल्पे निर्मिता: अङ्गुलीयका: |
धृतास्ते तु त्रयो एल्फै: ये तत्र पण्डितोत्तमा:||१||
सप्त धृता: खलु ड्वार्फै: ते सर्वे खानकोत्तमा: |
अङ्गुलीयका: नवति लोभिभि: मनुजै: धृता: ||२||
अङ्गुलीयकै: खल्वेतै: राजन्ते तु नृपा: खलु |
तान्सर्वान वञ्चयत्येकः मान्त्रिकस्तु भयङ्करः||३||
मॉर्डॉरमंडले एकोऽत्तुङ्गो ज्वालामुखी नगः |
मृत्युपर्वतनाम्ना सः मध्यदेशे प्रकीर्तितः||४||
मान्त्रिकः स सॉरॉनाख्यः मृत्युपर्वतवह्निषु |
मन्त्रशक्त्या: हि कृतवान् अमोघं अङ्गुलीयकम्||५||
अन्यातिशायी एको हि तस्य भो: अङ्गुलीयकः |
तस्य सामर्थ्यमात्रेण इतरास्तु हतप्रभा: ||६||
अन्धःकारे नॄपान्सर्वान् बद्ध्वा कारागृहे तथा |
मध्यदेशोऽनुवर्तेत ममैतं चाङ्गुलीयकं ||७||
मनस्येतन्मन्यमानः सर्वथैव मुहुर्मुहु: |
मध्यदेशस्य राज्यानि स दासीकृतवान् खलु ||८||
केचिदासन् परं तत्र खलु स्वातंत्र्यकामिन: |
आहूतः अंतिमः सङ्घः तथा मनुजएल्फयो: ||९||
भयङ्करं महायुद्धं मृत्युपर्वतरोधसि |
सॉरॉनस्य ये योद्धारः ऑर्कनाम्ना प्रकीर्तिता: ||१०||
एल्फमनुष्ययोश्चैव दृष्टमानः जयो यथा |
मान्त्रिकेभ्यः महाकाय: सॉरॉन: समुपस्थितः ||११||
महोत्तुङ्गो दंडधारी युध्यमानः स्वयं खलु |
न शक्यं तमपाकर्तुं केनाप्यायुधजीविना ||१२||
तथापि स: प्रयतत शूरः गान्धारभूनृपः |
दण्डप्रहारमात्रेण क्षिप्तः दूरे स शत्रुणा ||१३||
पितरः कृते विलपति पुत्रस्तस्य इसिल्डुरः |
यदानीमसिदण्डं स: अगृह्णात् महदाहवे ||१४||
तदानीमेव अचिरात् मान्त्रिकेण पदेन वै |
द्विधा कृतः असिदण्डः तेन च भयकारिणा||१५||
जयाशा हि गता एव तथा मनुजएल्फयो: |
गतो राजा तदानीं तु किं नु युद्धेन सिध्यते ||१६||
तथापि स इसिल्डूरो न बिभेति कदाचन |
खण्डितेनासिमात्रेण युद्धाय कृतनिश्चयः ||१७||
अछिनत् सः सपद्येव सॉरॉनस्याङ्गुलान्यहो!!
निष्प्रभस्तु तथा तस्य प्रचण्डः अङ्गुलीयकः ||१८||
महत्शौर्यं महद्धैर्यं देवतुल्यं हि साधु भो: !!!
अतिचिरात् स सॉरॉनः मध्यदेशात् पलायितः||१९||
कथैषा कथिता आदौ जेआरार्-टोल्किनेन या |
आङ्लवाण्यास्तु आनीय भारत्यां अनुकीर्तिता ||२०||
अपूर्णं काव्यमेतत्तु अवशिष्टम् अनेकशः |
स्फूर्ति-समयबाहुल्यात् रचयिष्याम्यहं खलु ||
वाचने
7924
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
अवघड आहेस रे बाबा. दंडवत !
साष्टांग दंडवत! सगळं वाचून समजून घ्यायला जरा वेळ लागला. पण लै भारी. वाल्गुदेयाची कथा पण अर्धी राहिलीय ना! लवकर पुरी कर.
आणि यात यमक, वृत्त, छंद वगैरे कोणते आहेत ते कोण सांगणार? :D
धन्यवाद फाकडे इष्टुर आणि पैसातै :)
पैसातै, वाल्गुदकथा स्फूर्ति-समय-बाहुल्याप्रमाणे लिहीन जरूर. वृत्त तर साधं अनुष्टुप आहे, तुम्हाला कळालं असेलच :) बाकी संस्कृतला यमकाबिमकाचे टेन्शन नै, सो बरंय ;)
मी संस्कृत मध्ये कॉप्या करून पास झालो नसतो तर कदाचित पूर्ण काव्य समजलं असतं ....असो चित्रपट पहिला असल्याने थोडीफार अब्रू वाचली म्हणायची !
मालोजीरावां सारखी आमच्याकडे पण संस्कृत ची बोंब.. परंतू चित्रपट पाहीला असल्याने वरील काव्याचा आनंद घेऊ शकले...
बॅमॅ राव जबरदस्त जमवलयंत सगळं,,, खुप भारी ,,,
संस्कृतात सुभाषितांच्या जोरावर माज करण्यार्या मला सपशेल माघार घ्यावी लागते आहे, याचे भाषांतर उपलब्ध होईल का? बॅटमॅन आपण संस्कृताभिमुख पुरातन बॅटमॅन आहात का? आताचा बॅटमॅन तुमचा वंशज आहे का?
और ये गया बाऊंसर.
In reply to भारीच रे बॅट्या.. by ह भ प
+१
संस्कॄतची शिकवणी लावावी का काय? :(
In reply to +१ by इनिगोय
+२
बिलकूलच समजलं नै.
_/\_
महान आहेस.
आता अपूर्ण न ठेवता पटापटा पूर्ण कर पाहू.
आमची संस्कृतची गाडी इतक्या पुढे नाही पोचली कधी :)
_/\_
संस्कृत वर चांगलाच हातखंडा आहे तुम्चा. असच बॅटमॅनच चरीत्र पण लिहुऊन टाका
महान आहेस रे बाबा !!!
काव्य आवडले. संस्कृत वर जोरदार पकड आहे तुझी.
_/\_
कविर्ब्यॅटम्यॅन कविर्ब्यॅटम्यॅन कविर्ब्यॅटम्यॅन न संशयः ||
शिरसाष्टांग दंडवत !!
साष्टांग दंडवत आणि कोटि कोटि प्रणिपात.
मति गुंग झाली वाचून. असेच लिहित रहा वाघुळराव.
....अवशिष्टम् रचा सूनःशुवरः....
विशेषण-विशेष्याच्या विभक्ती जरा कुठे कुठे गंडल्या आहेत.... पण भारी.
नुस्तं भारी लिहिता आलं असतं, पण अपूर्ण कथा पूर्ण करशील त्यात कमीत कमी चुका असाव्यात म्हणून लिहिले.
राग नसावा :)
In reply to विशेषण-विशेष्य by चैतन्य दीक्षित
बरोबर आहे चैतन्य, राग नाही तर सुधारणेस आवश्यक अशा सूचनांचे सफैव स्वागतच आहे :) मी नंतर पुन्हा तपासून पाहिले, तेव्हा गंडलेले काही दुवे दिसले, काही करेक्ट केलेत. सध्यापुरती अद्ययावत व्हर्जन इथे दिसेल.
http://www.aisiakshare.com/node/1463
In reply to विशेषण-विशेष्य by चैतन्य दीक्षित
सहमत.. आमचे पन जर्मन भाषेत लिहीतान्ना अगदी असेच होते....विभक्ती, प्रत्यय, लिन्ग, वचन काही विचारु नका...
न म स्का र.......... बाकी आम्ही फक्त दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलं त्यामुळं काही बोलायची डेरिंग नाही, फक्त दंडवत.
In reply to न म स्का र.......... बाकी by ५० फक्त
दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलंदहावीला मार्कांसाठी संस्क्रुत कॉप्यून सोडलं...आणि सोडलं ते सोडलंच कायमचं !
बाबौ!
आमच्या वर्गातला एक मुलगा नववीमध्ये असताना संस्कृत मध्ये कॉमेंट्री करायचा ते आठवलं. (एखादं क्रियापद सापडलं नाही तर सरळ हिट्यते वगैरे विभक्ती प्रत्यय लावून तयार!)
-(दहावी पर्यंत पुर्ण संस्कृत घेउनही 'नदी' शब्दसुद्धा पाठ नसलेला) दादा :(
In reply to _/\_ by दादा कोंडके
१ नंबर :D
In reply to _/\_ by दादा कोंडके
हिट्यते!!!!!!!!
एकश्च नंबरो एषः ;)
(इयं मिपावाणी-संप्रति दंगा श्रूयताम्) =)) =))
पण भाषान्तरा सोबत असेल तर नक्की चान्गले...
हा धागा आत्ता पाहीला. मस्तच आहे!
आता तुम्ही तुमचे आयडी "सुसंकृत बॅटमॅन" असे करा. :-)
अरे वटवाघुळ मानवा ! असे कसे एकदम भारी लिहतोस रे तू ? ;)उलटे लटकण्याचा परिणाम तर नाही ना ? ;)
ते वाल्गुदेया पुराण अजुन झेपले नाही मला,त्यामुळे हे कथामॄत पिण्याचे कष्ट घेतले नाहीत बघ ! ;)
लगे रहो... :)
कुणी समश्लोकी करुन देइल का? :)
काय सुरेख काव्यरचना केली आहे... (अर्धवटराव, तुम्हाला काय घं* कळलं त्यातलं ?)
अर्धवटराव
संस्कृत घंटा काही कळत नाही आणि 'अंगठ्यांचा देव'ही पाहीलेला नाहीय.. पण तुमच्या हिमतीला सलाम..
वृत्तराज. काव्यविहारी.वाघुळशास्त्री...आमचा शि.र.शासन दंडवत घ्यावा...! --^--^--^--
पण एवढे सर्व जण कौतुक करताहेत म्हणजे नक्कीच भारी असणार !
म्हणून आम्हीपण कौतुक..

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार :)
In reply to सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक by बॅटमॅन
पुढील भागांची आतुरतेने वाट पहात आहोत ...
-/\-
ही कुठली भाषा आहे ? :गोंधळलेली बाहुली:
In reply to ही कुठली भाषा आहे ? by सांजसंध्या
संस्कृत आहे. :)
बॅटमॅनजि.....आपली प्रतिभा काही औरच आहे.....काय पण वर्णन केलय. लई भारी!
काव्य आवडले. संस्कृत येत नाही पण शिकण्याची जबरदस्त इच्छा आहे, म्हणूनच तुमच्या बद्दल कौतुक मिश्रित आदर वाटतो.
बाकी मिपाचे आद्य संस्कृत कवी श्री. नाणा* ( की णाना ? ) याण्ची आठवण झाली... त्याण्चा प्रतिसाद कुठे दिसेना तो?
* टारू बाळाशी आमचे नाते नाही हो..अंमळ गैरसमज व्हायचा नाहीतर..::)
आईगं...