मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.

बॅटमॅन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लॉर्ड ऑफ द रिंग्जचे जरा जुनाट पद्धतीने केलेले वर्णन आहे. जाड्या टाईपातल्या शब्दांमुळे लग्गेच समजेल. मध्यदेशे पुरा कल्पे निर्मिता: अङ्गुलीयका: | धृतास्ते तु त्रयो एल्फै: ये तत्र पण्डितोत्तमा:||१|| सप्त धृता: खलु ड्वार्फै: ते सर्वे खानकोत्तमा: | अङ्गुलीयका: नवति लोभिभि: मनुजै: धृता: ||२|| अङ्गुलीयकै: खल्वेतै: राजन्ते तु नृपा: खलु | तान्सर्वान वञ्चयत्येकः मान्त्रिकस्तु भयङ्करः||३|| मॉर्डॉरमंडले एकोऽत्तुङ्गो ज्वालामुखी नगः | मृत्युपर्वतनाम्ना सः मध्यदेशे प्रकीर्तितः||४|| मान्त्रिकः स सॉरॉनाख्यः मृत्युपर्वतवह्निषु | मन्त्रशक्त्या: हि कृतवान् अमोघं अङ्गुलीयकम्||५|| अन्यातिशायी एको हि तस्य भो: अङ्गुलीयकः | तस्य सामर्थ्यमात्रेण इतरास्तु हतप्रभा: ||६|| अन्धःकारे नॄपान्सर्वान् बद्ध्वा कारागृहे तथा | मध्यदेशोऽनुवर्तेत ममैतं चाङ्गुलीयकं ||७|| मनस्येतन्मन्यमानः सर्वथैव मुहुर्मुहु: | मध्यदेशस्य राज्यानि स दासीकृतवान् खलु ||८|| केचिदासन् परं तत्र खलु स्वातंत्र्यकामिन: | आहूतः अंतिमः सङ्घः तथा मनुजएल्फयो: ||९|| भयङ्करं महायुद्धं मृत्युपर्वतरोधसि | सॉरॉनस्य ये योद्धारः ऑर्कनाम्ना प्रकीर्तिता: ||१०|| एल्फमनुष्ययोश्चैव दृष्टमानः जयो यथा | मान्त्रिकेभ्यः महाकाय: सॉरॉन: समुपस्थितः ||११|| महोत्तुङ्गो दंडधारी युध्यमानः स्वयं खलु | न शक्यं तमपाकर्तुं केनाप्यायुधजीविना ||१२|| तथापि स: प्रयतत शूरः गान्धारभूनृपः | दण्डप्रहारमात्रेण क्षिप्तः दूरे स शत्रुणा ||१३|| पितरः कृते विलपति पुत्रस्तस्य इसिल्डुरः | यदानीमसिदण्डं स: अगृह्णात् महदाहवे ||१४|| तदानीमेव अचिरात् मान्त्रिकेण पदेन वै | द्विधा कृतः असिदण्डः तेन च भयकारिणा||१५|| जयाशा हि गता एव तथा मनुजएल्फयो: | गतो राजा तदानीं तु किं नु युद्धेन सिध्यते ||१६|| तथापि स इसिल्डूरो न बिभेति कदाचन | खण्डितेनासिमात्रेण युद्धाय कृतनिश्चयः ||१७|| अछिनत् सः सपद्येव सॉरॉनस्याङ्गुलान्यहो!! निष्प्रभस्तु तथा तस्य प्रचण्डः अङ्गुलीयकः ||१८|| महत्शौर्यं महद्धैर्यं देवतुल्यं हि साधु भो: !!! अतिचिरात् स सॉरॉनः मध्यदेशात् पलायितः||१९|| कथैषा कथिता आदौ जेआरार्-टोल्किनेन या | आङ्लवाण्यास्तु आनीय भारत्यां अनुकीर्तिता ||२०|| अपूर्णं काव्यमेतत्तु अवशिष्टम् अनेकशः | स्फूर्ति-समयबाहुल्यात् रचयिष्याम्यहं खलु ||

वाचने 7919 वाचनखूण प्रतिक्रिया 39

पैसा गुरुवार, 12/20/2012 - 23:29
साष्टांग दंडवत! सगळं वाचून समजून घ्यायला जरा वेळ लागला. पण लै भारी. वाल्गुदेयाची कथा पण अर्धी राहिलीय ना! लवकर पुरी कर. आणि यात यमक, वृत्त, छंद वगैरे कोणते आहेत ते कोण सांगणार? :D

बॅटमॅन Fri, 12/21/2012 - 00:17
धन्यवाद फाकडे इष्टुर आणि पैसातै :) पैसातै, वाल्गुदकथा स्फूर्ति-समय-बाहुल्याप्रमाणे लिहीन जरूर. वृत्त तर साधं अनुष्टुप आहे, तुम्हाला कळालं असेलच :) बाकी संस्कृतला यमकाबिमकाचे टेन्शन नै, सो बरंय ;)

मालोजीराव Fri, 12/21/2012 - 00:25
मी संस्कृत मध्ये कॉप्या करून पास झालो नसतो तर कदाचित पूर्ण काव्य समजलं असतं ....असो चित्रपट पहिला असल्याने थोडीफार अब्रू वाचली म्हणायची !

आनन्दिता Fri, 12/21/2012 - 01:08
मालोजीरावां सारखी आमच्याकडे पण संस्कृत ची बोंब.. परंतू चित्रपट पाहीला असल्याने वरील काव्याचा आनंद घेऊ शकले... बॅमॅ राव जबरदस्त जमवलयंत सगळं,,, खुप भारी ,,,

समयांत Fri, 12/21/2012 - 10:02
संस्कृतात सुभाषितांच्या जोरावर माज करण्यार्‍या मला सपशेल माघार घ्यावी लागते आहे, याचे भाषांतर उपलब्ध होईल का? बॅटमॅन आपण संस्कृताभिमुख पुरातन बॅटमॅन आहात का? आताचा बॅटमॅन तुमचा वंशज आहे का?

प्रचेतस Fri, 12/21/2012 - 10:20
_/\_ महान आहेस. आता अपूर्ण न ठेवता पटापटा पूर्ण कर पाहू.

विशेषण-विशेष्याच्या विभक्ती जरा कुठे कुठे गंडल्या आहेत.... पण भारी. नुस्तं भारी लिहिता आलं असतं, पण अपूर्ण कथा पूर्ण करशील त्यात कमीत कमी चुका असाव्यात म्हणून लिहिले. राग नसावा :)

In reply to by चैतन्य दीक्षित

बॅटमॅन Fri, 12/21/2012 - 14:23
बरोबर आहे चैतन्य, राग नाही तर सुधारणेस आवश्यक अशा सूचनांचे सफैव स्वागतच आहे :) मी नंतर पुन्हा तपासून पाहिले, तेव्हा गंडलेले काही दुवे दिसले, काही करेक्ट केलेत. सध्यापुरती अद्ययावत व्हर्जन इथे दिसेल. http://www.aisiakshare.com/node/1463

५० फक्त Fri, 12/21/2012 - 14:36
न म स्का र.......... बाकी आम्ही फक्त दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलं त्यामुळं काही बोलायची डेरिंग नाही, फक्त दंडवत.

In reply to by ५० फक्त

मालोजीराव Fri, 12/21/2012 - 15:31
दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत अभ्यासुन सोडलं
दहावीला मार्कांसाठी संस्क्रुत कॉप्यून सोडलं...आणि सोडलं ते सोडलंच कायमचं !

दादा कोंडके Fri, 12/21/2012 - 18:00
बाबौ! आमच्या वर्गातला एक मुलगा नववीमध्ये असताना संस्कृत मध्ये कॉमेंट्री करायचा ते आठवलं. (एखादं क्रियापद सापडलं नाही तर सरळ हिट्यते वगैरे विभक्ती प्रत्यय लावून तयार!) -(दहावी पर्यंत पुर्ण संस्कृत घेउनही 'नदी' शब्दसुद्धा पाठ नसलेला) दादा :(

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन Sat, 12/22/2012 - 00:18
हिट्यते!!!!!!!! एकश्च नंबरो एषः ;) (इयं मिपावाणी-संप्रति दंगा श्रूयताम्) =)) =))

विकास Fri, 12/21/2012 - 19:48
हा धागा आत्ता पाहीला. मस्तच आहे! आता तुम्ही तुमचे आयडी "सुसंकृत बॅटमॅन" असे करा. :-)

मदनबाण Fri, 12/21/2012 - 22:07
अरे वटवाघुळ मानवा ! असे कसे एकदम भारी लिहतोस रे तू ? ;)उलटे लटकण्याचा परिणाम तर नाही ना ? ;) ते वाल्गुदेया पुराण अजुन झेपले नाही मला,त्यामुळे हे कथामॄत पिण्याचे कष्ट घेतले नाहीत बघ ! ;) लगे रहो... :)

अर्धवटराव Sat, 12/22/2012 - 05:02
काय सुरेख काव्यरचना केली आहे... (अर्धवटराव, तुम्हाला काय घं* कळलं त्यातलं ?) अर्धवटराव

इन्दुसुता Fri, 01/04/2013 - 22:49
काव्य आवडले. संस्कृत येत नाही पण शिकण्याची जबरदस्त इच्छा आहे, म्हणूनच तुमच्या बद्दल कौतुक मिश्रित आदर वाटतो. बाकी मिपाचे आद्य संस्कृत कवी श्री. नाणा* ( की णाना ? ) याण्ची आठवण झाली... त्याण्चा प्रतिसाद कुठे दिसेना तो? * टारू बाळाशी आमचे नाते नाही हो..अंमळ गैरसमज व्हायचा नाहीतर..::)