टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
27 Jun 2011 - 11:36 pm

आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.

ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.

सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.

जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात.
संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!!

या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही.
जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!!

काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....

आमेन!!!!
:)

धर्मइतिहाससमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

27 Jun 2011 - 11:39 pm | शेखर

ख प लो :)

मी-सौरभ's picture

28 Jun 2011 - 12:30 am | मी-सौरभ

ख ह प ह लो हो !!!

प्रभो's picture

27 Jun 2011 - 11:43 pm | प्रभो

=)) =)) =)) लई भारी!!

(जमात-ए-कंपूचा एक सामान्य कार्यकर्ता)प्रभो

मूकवाचक's picture

28 Jun 2011 - 3:58 pm | मूकवाचक

भट्टी मस्त जमली आहे.

पैसा's picture

28 Jun 2011 - 12:08 am | पैसा

हसतेय हसतेय हसतेय!!!

(मी तुमच्या कंपूत हां!)

प्रियाली's picture

27 Jun 2011 - 11:50 pm | प्रियाली

:-)

कवितानागेश's picture

27 Jun 2011 - 11:51 pm | कवितानागेश

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर>>
हसून हसून मेले.....

श्रावण मोडक's picture

27 Jun 2011 - 11:52 pm | श्रावण मोडक

आमेन!!!

सदस्यत्वाचा अर्ज कुठे मिळेल? ;-)

धनंजय's picture

28 Jun 2011 - 12:11 am | धनंजय

हीही

अर्धवटराव's picture

28 Jun 2011 - 12:12 am | अर्धवटराव

आयला, सदर अंडरग्राऊंड कंपुगिरी आताशी उघड व्हायला लागली आहे. पिवळे महाराजांनी जातीने लक्ष्य घालुन चळवळीची नीट व्यवस्था लावावी हि विनंती.

(कंपूबाज) अर्धवटराव

शिल्पा ब's picture

28 Jun 2011 - 12:13 am | शिल्पा ब

=)) =))

प्राजु's picture

28 Jun 2011 - 12:16 am | प्राजु

=)) =)) =))

गणेशा's picture

28 Jun 2011 - 12:19 am | गणेशा

वाचुन मस्त मजा आली ...

सर्व खोडसळ धाग्यांना उत्कृष्ठ प्रत्युत्तर दिल्याबद्दल "पिवळ्या संतमहात्म्यांचे" मन:पूर्वक आभार.....

खी: खी: खी:, अजून काही उठलेले बाजार आणि टेंपोत बसवून धाडल्या गेलेले नग आठवले ;)

पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....

आमेन!

Nile's picture

28 Jun 2011 - 2:52 am | Nile

आमेन!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2011 - 4:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण असा प्रतिसाद चक्क नंदनकडून.

(जाळकरी) अदिती

चेतन's picture

28 Jun 2011 - 12:25 am | चेतन

झक्कास विडंबन

>>पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....

फक्त अधुनमधुन या संस्थेकडुन काही सभ्य (?) संपादकाचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होतो... ;) वैरी वैरी जन्म मरणांतें वैरी भारी पडले सारे ट्वाळ बाजारी

ते जालिंदरबाबा आणि शरदिनी अम्मांचा सत्संग कधी होणरे कुणास ठाउक तो पर्यंत आद्यटवाळ डँबिसबाबांच्या इतिहासावरील प्रवचनाचा लाभ घेण्यात यावा.

(माळकरी) चेतन

केशवसुमार's picture

28 Jun 2011 - 12:29 am | केशवसुमार

डांबिसशेठ,
पाय कुठे आहेत.. _/\_
एकदम झकास :))))))))
आमेन

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2011 - 1:21 am | अत्रुप्त आत्मा

साष-टांग नमन हे माझे, डेंबिस पिवळा विडंबका
असेचं लीहीत ह्रा हो,देतं रहा...(ह्हा ह्हा)...अचुक दणका

वाचत राहू आंम्ही,दुखत राहिला जरी मणका
लिहित रहा असेच लेखं,खाऊ आंम्ही बकाबका...ह्ही ह्ही ह्ही

गणपा's picture

28 Jun 2011 - 2:28 am | गणपा

विडंबन असाव तर असं. :)
वाक्यानं वाक्य दाद देण्या जोगं.

विकास's picture

28 Jun 2011 - 3:32 am | विकास

सहज's picture

28 Jun 2011 - 5:13 am | सहज

डांपि महाराज की जय!!

तबलिगी, विहिंप, कंपू सम्दे एका माळेचे मणी म्हणताय तर!

नितिन थत्ते's picture

28 Jun 2011 - 8:15 am | नितिन थत्ते

भारी.

:)

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर


साफ फुट्लो....

पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....
हे आवडलं.

बोलाऽऽ हरितदेशस्थ टवाळखोर मिपाकरेश्वर विडंबननिपुण श्री डांबिसमहाराज पिवळे की जय !!

प्रीत-मोहर's picture

28 Jun 2011 - 9:26 am | प्रीत-मोहर

हाहाहाहा =)) =)) =))

स्पा's picture

28 Jun 2011 - 9:27 am | स्पा

=))

=))

प्यारे१'s picture

28 Jun 2011 - 9:29 am | प्यारे१

विडंबन चांगले जमले आहे.
पण सत्य निराळे आहे.

- प्यारा शख्स

आंसमा शख्स's picture

28 Jun 2011 - 9:45 am | आंसमा शख्स

विडंबन चांगले जमले आहे.
पण सत्य निराळे आहे.

प्यारे ये चोरी चपाटी क्युं? :)

सत्य निराळेच आहे आणि तेच काही लोकांना टोचते.
जे त्यांना जमले नाही ते तबलिगी जमातने घडवले म्हणून तर इतका त्रास होत आहे.
जे एकत्र येतात तेच टिकतात आणि टिकतील.

प्यारे१'s picture

28 Jun 2011 - 9:58 am | प्यारे१

>>>>सत्य निराळेच आहे आणि तेच काही लोकांना टोचते.
ए कुणाला काय टोचतंय? पटापटा हात वर करा बघू.

>>>>जे त्यांना जमले नाही ते तबलिगी जमातने घडवले म्हणून तर इतका त्रास होत आहे.
आम्ही मुस्लिम समाजाला एकत्र आणायचे कारण काय?
एक उदा.: आम्ही कट्ट्याला एकत्र येतो तेव्हा तू कोण मी कोण हे पण विचारत बसत नाही. चुकून जर जाणवलं तर थोडंफार बोललं जातं इतकंच. पण चला आपण एक विशिष्ट समाज एकत्र आणू वगैरे नाय जमणार बॉस.... माणूस असणं 'बास्स' असतं.

>>>जे एकत्र येतात तेच टिकतात आणि टिकतील.
एकत्र झुंडीनं वावरणारी मेंढरं/ शेळ्या टिकत नाहीत. कापून खाल्ली जातात. एकत्र कुणी यावं हे तितकंच महत्त्वाचं नाही काय?

बाकी आम्ही चोर्‍या करतो यावर आक्षेप नाही. सगळेच करतात असा ठाम विश्वास आहे. (तुमचा लेख तरी कुठे तुमचा आहे? कुठून तरी माहिती चोरायचीच असते ना? ;) )

वपाडाव's picture

28 Jun 2011 - 1:37 pm | वपाडाव

आम्ही विधायक कार्य/ विचार/चर्चामध्येच आमची शक्ती आणि वेळ खर्च करु असे म्हणतो.

ही प्यारेंची स्वाक्षरी वाचायला विसरलाय तो शक्स म्हणुन त्याची बत्ती लागत नाहीये....
प्यारे, शक्स को बक्ष दो....

वपाडाव's picture

28 Jun 2011 - 6:42 pm | वपाडाव

किती तोंडघशी पाडणार रे प्यारे...
लागलीच का ती स्वाक्षरी बदललीस...

धमाल रावांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
च्यायला सकाळी सकाळी ऑफिसमध्ये येड लागल्यासारखा हसत होतो बाकीचे उर्ध्वायू नजरेने पाहत न्याहाळत होते. नको नको ..................सकाळी सकाळी मिसळपाव उघडणे बंद.

अर्धवट's picture

28 Jun 2011 - 9:50 am | अर्धवट

मस्त... पिडांकाका दणकट

मृत्युन्जय's picture

28 Jun 2011 - 10:09 am | मृत्युन्जय

बा जा र उ ठ व ला.

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर

हे वाचुन तर खपलो.

सुहास..'s picture

28 Jun 2011 - 10:26 am | सुहास..

या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही >>>>

ठ्या ! चोरी चोरी चुपके चुपके ;)

असो ..प्रासंगिक म्हणुन विंडबन छान च , पण खास पिडांकाका स्टाईल नाही वाटले , हा पण धागा आधी गुप्त निरोपांवर(प्रि-प्लॅन्ड) का ? असे ही वाटुन गेले ;)

विवेक मोडक's picture

28 Jun 2011 - 10:30 am | विवेक मोडक

कंपु म्हणजे नक्की काय???

सुहास..'s picture

28 Jun 2011 - 10:42 am | सुहास..

कंपु म्हणजे नक्की काय???

लोकार्थ = काही समविचारी लोकांचा ग्रुप !
आमचा अर्थ = पाच-दहा नेटुकिरडे फुंकणारे + चार-पाच रिकामटेकड्या बायका + एक दोन विकीपिडीत मंडळी आणि एक ओपन फोरम ;)

अवांतर : आम्ही काढलेला अर्थ वैयक्तीक आहे.

वपाडाव's picture

28 Jun 2011 - 1:37 pm | वपाडाव

जबरदस्त व्याख्या !!!!

श्रावण मोडक's picture

28 Jun 2011 - 8:43 pm | श्रावण मोडक

लोकार्थ = काही समविचारी लोकांचा ग्रुप

क्काय? :)

आमचा अर्थ = पाच-दहा नेटुकिरडे फुंकणारे + चार-पाच रिकामटेकड्या बायका + एक दोन विकीपिडीत मंडळी आणि एक ओपन फोरम

कॉम्प्लान प्या, मोठे व्हा. ;)
दोन्ही विधाने आणि टिप्पणी एकमेकांशी संबंधित वाचावी. स्वतंत्र वाचू नयेत. हे स्पष्टीकरणही दुसऱ्या टिप्पणीमुळेच करावे लागले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2011 - 12:26 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

+१

छोटा डॉन's picture

28 Jun 2011 - 11:01 am | छोटा डॉन

इस्कु बोल्ते है विडंबन.
एकदम धरुन फट्याक्क ऽऽऽऽ ...

अशा ह्या 'गुड मॉर्निंग'साठी श्री डांबिसमहाराज पिवळे ह्यांचे आभार.

- ( सभ्यपणाचा मुखवटा वापरणारा टवाळ ) छोटा डॉन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2011 - 11:25 am | मिसळलेला काव्यप्रेमी

किबोर्डाने आज सकाळी सकाळी चहा ने आंघोळ केलीली आहे.
=)) =)) =))

विजुभाऊ's picture

28 Jun 2011 - 11:42 am | विजुभाऊ

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर
तो त्या जवळून वहाणार्‍या नीरा नदीच्या पाण्याचा गुण आहे. बारामतीकर आणि उस्ताद असे दोन शब्द लिहून पिवळा पिताम्बर सारखी द्विऋक्ती कशाला करायची .
बाकी तुम्ही इतर कार्यकर्त्यांचा परिचय दिलेला नाही. काही कार्यकर्त्यांचे तेच नाव देखील आहे.
ठाणे परीसरातून काही जहाल कार्यकर्ते सोबत सदैव तीन पॉईंट चौदा चे रीव्होल्व्हर बाळगत पुण्यात आले होते.
हल्ली बहुतेक वयोमानामुळे ते थंड असावेत
दुसरे एक कार्यकर्ते औरंगझेबाच्या भूमीतून पुण्यात आले होते ते सूत्तलात तडीपार आहेत त्यामूळे सध्या गोळ्या झाडत नाहीत.
उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर हे मात्र लोकाना जुन्या शिकारीच्या गोष्टी ऐकवण्यात मग्न असायचे. त्यानी देखील घरच्या जबाबदार्‍या वाढल्यामुळे शिकार वगैरे बंद केली आहे.
संत महंतांच्या पावन भूमी पंढरपुरातून आलेले एक आदरणीय वायदे आझम संतशिरोमणी श्री श्री श्री छोटाजी डॉनजी निकाळजे यांच्या बद्दल काय वर्णावे....
बाकी क्रमशः लेखनाचा विषय असूनही क्रमशः असे न लिहील्याबद्दल निशेध

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2011 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काका किती इकेटी घ्येनार एकाच प्रतिसादात? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

क ड क !!

बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी
लोग कुछ आयडी और आर्टिकल उडनेका सबब पुछेंगे..
उंगलियां उठेगी कुछ और आयडीस की तरफ़
नजर उठेगी मिपापर गुजरे हुए सालोंकी तरफ़
कई लोग तो जालिम हैं हर एक बात पे ताना कसते है,
बेवजह नए आयडीस को भगाने में लगे रहते हैं
क्यूं नफ़रती जुनुन से भरे पडे है कुछ आयडीस यहां?
बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी...

छोटा डॉन's picture

28 Jun 2011 - 12:54 pm | छोटा डॉन

ही कविता आहे की (तुमच्या भावना शब्दरुपाने पेश करणारा ) प्रतिसाद ?
(प्रतिसाद असेल तर तो) छान आहे.
(प्रतिसादच असल्यास तो)मराठीत असता तर अजुन छान वाटला असता.
(कवितेविषयी आम्ही काही बोलत नाही कारण त्यातले आम्हाला काही कळत नाही.) असो.

- छोटा डॉन

वाहीदा's picture

28 Jun 2011 - 12:59 pm | वाहीदा

या माझ्याभावना मी शब्दरुपाने प्रतिसाद म्हणून देत आहे
मराठीत या भावना मी उतरवू शकले नाही त्याबध्दल क्षमस्व
क्या करें दिल की धडकन कहीं ना कहीं उर्दू हि है क्यूं की वोह मेरी मादरीजुबान (mothertounge) हैं | :-)

छोटा डॉन's picture

28 Jun 2011 - 1:06 pm | छोटा डॉन

बिलकुल हरकत नाही.
मात्र यमक पाहुन आम्हाला ती कविता असल्याचा संशय आला, किंबहुना ती काहीशी समजुही लागली, अहो असा कविता समण्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग, म्हणुन आम्ही किंचित चौकशी केली.

बाकी इतर किन्तु नसावा, प्रतिसाद छान असल्याचे आम्ही आधीच नमुद केले आहे.
धन्यवाद :)

- छोटा डॉन

शिल्पा ब's picture

28 Jun 2011 - 9:15 pm | शिल्पा ब

एखाद्याची दिलकी भाषा कन्नड असेल अन दुसर्या कुणाची फ्रेंच असेल अन ज्याने त्याने त्याच्या दिल्क्याच भाषेत लिहिले तर मग काय उरले? सहज एक विचार मनात आला, तुमची पोश्ट वाचुन म्हणुन टंकले इतकेच.

बाकी कविता आम्हालाही थोडी समजली. असे क्वचित होते म्हणा.

छोटा डॉन's picture

28 Jun 2011 - 9:24 pm | छोटा डॉन

एखाद्याची दिलकी भाषा कन्नड असेल अन दुसर्या कुणाची फ्रेंच असेल अन ज्याने त्याने त्याच्या दिल्क्याच भाषेत लिहिले तर मग काय उरले?

अगदी सहमत आहे बघा . असेही क्वचितच होते म्हणा.

- छोटा डॉन

श्रावण मोडक's picture

28 Jun 2011 - 10:13 pm | श्रावण मोडक

अपरिहार्यताच ही. सहमत न होऊन काय करणार तू तरी...! ;)

आनंदयात्री's picture

28 Jun 2011 - 10:23 pm | आनंदयात्री

>>अपरिहार्यताच ही. सहमत न होऊन काय करणार तू तरी...!

याला अजून एक कंगोरा आहे. 'कन्नड' म्हटल्याने अपरिहार्यता आली आहे ;-)
डान्याला भुले बिसरे गीत वैगेरे आठवले असणार !!

-
(पंकज उधास एकणार्‍या डान्याचा मित्र)

आंद्या ट

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 6:27 pm | धमाल मुलगा

=))

तसं नव्हे आंद्याशेठ,
डानराव आसेतूसिंधूहिमाचलप्रेमी आहेत. 'कन्नड'ची काय मोठी बात, तुम्ही 'बंगाली' म्हणाला असता तरी अशीच कळ उठली असती की. ;)

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 7:47 pm | श्रावण मोडक

मराठीच्या किती कळा उठल्या असतील याच्या विचारात पडलो आहे. ;)

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 7:53 pm | धमाल मुलगा

चाफेकळ्या म्हणा. ;)

आनंदयात्री's picture

1 Jul 2011 - 8:01 pm | आनंदयात्री

किंवा कळा येउन कळवळला म्हणा.

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 8:35 pm | धमाल मुलगा

आमच्या कानडाऊ विठ्ठलुची किती म्हणून चेष्टा कराल ते. ;)

आनंदयात्री's picture

1 Jul 2011 - 8:54 pm | आनंदयात्री

मराठी माणुस एकवेळ मित्र गमावेल पण मित्राची चेष्टा करायची संधी गमावणार नाही.

-
आंद्यासाहेब कालेलकर

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक उर्दू अक्षरे वापरू नयेत.

असे काय वाचायला मिळते का काय आता असे वाटले होते.

असो..

बाकी तुमचे ऑरा छेदू द्यात...

वाहीदा's picture

28 Jun 2011 - 1:41 pm | वाहीदा

माझ्या प्रतिसादात अक्षरे देवनागरी आहेत शब्द उर्दू आहेत मान्य की जास्त उर्दूच आहेत अन मराठी कमी पण
ऑरा छेदू़णे म्हणजे काय रे भाऊ ?
ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे भाऊ ? ;-)

माझीही शॅम्पेन's picture

28 Jun 2011 - 3:22 pm | माझीही शॅम्पेन

ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे भाऊ ?

माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही :(

लेख अफलातून ! ____/|\_____

काही प्रश्न :)

१. असा एक जमात-ए-कंपू" एकच आहे की बरेचसे स्लिपर सेल चे मिळून एक कंपू झाला आहे.
२. एक आय-डि दोन कम्पुत असु शकतो का ? तसे असेल तर कम्पुतील लोक डबल क्रॉसिंग कसे ओळखतात ?
३. जमात-ए-कंपू" ह्यांची खुली आणि शस्त्रे कोणती ? ( जस नुकताच अंताक्षरी-अस्त्राचा प्रयोग एका धाग्यावर पाहिला )

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही

शाफ चुक !

ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची लाल करणे' असे म्हणतात.

माझीही शॅम्पेन's picture

28 Jun 2011 - 3:36 pm | माझीही शॅम्पेन

ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची लाल करणे' असे म्हणतात.

:) एखादा शब्द राहिला का ? आणि राहिला असेल तर तो छेदने म्हणजे काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

भावना पोचल्या ना? झाले तर मग ;)

छेदणे काय आणि मारणे काय एकच.

तुम्हाला एक फार कूट शंका बॉ ! पल्याडच्या मानसिक अस्वस्थांच्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट वैग्रे देऊन आलायत का येवढ्यात ? ;)

माझीही शॅम्पेन's picture

28 Jun 2011 - 3:49 pm | माझीही शॅम्पेन

कूट शंका ... :) सध्या अतुल कुलकर्णी यांचा हाय-टेन्शन हा क्रूरकर्म आपल कार्यक्रम फॉलो करतोय . .

पल्याडच्या मानसिक अस्वस्थांच्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट वैग्रे देऊन आलायत का येवढ्यात ?

नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे ! गेला आसाशील तर तुझा मॉल्यवन अनुभव टाक की.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार

नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे ! गेला आसाशील तर तुझा मॉल्यवन अनुभव टाक की..

तिकडे लिहिलेले तिकडे कोणी वाचत नाही. तर इकडे कोण वाचणारे ?

माझ्या माहिती प्रमाणे ऑरा म्हणजे प्रभावळ किवा तेजो-मंडळ / तेजोमय प्रकाश आता ते भेदने माहीत नाही

माहीती साठी धन्यवाद मला वाटते, महावीर अन गौतम बुध्दाच्या प्रतिमेत हे तेजोवलय दिसून येते.

I suppose AURA means a ring of positive energy around Spiritual personalities

Gautam Buddha, Mahavir had Aura of Positive energy shows in their pictures.

तेजोवलय छेदणे हे वाक्य अयोग्य वाटते असो इथे मिपावर काहीवेळा निगेटिव्ह एनर्जीच जास्त वावरतात. :-(

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वाहीदा's picture

28 Jun 2011 - 6:03 pm | वाहीदा

एवढे agitate अन annoy व्हायला काय झाले ?
मला ज्यात सोईस्कर वाटेल त्यातच मी लिहणार ना भाऊ
वाचायला त्रास होत आहे की आणखिन काही कारण असावे ?? राग राग का करतोस रे बाबा ?

शिल्पा ब's picture

28 Jun 2011 - 9:19 pm | शिल्पा ब

हेच आम्ही सांगितले असते तर थयथयाट केला असता असे अनुभवावरून वाटले.

वाहीदा's picture

29 Jun 2011 - 11:20 am | वाहीदा

जल.. जल.. जल.. बेबो
हा शेवटचा प्रतिसाद

शिल्पा ब's picture

29 Jun 2011 - 11:25 am | शिल्पा ब

आम्हाला लग्गेच खरे ठरवल्याबद्दल धन्यवाद.
जल जल म्हणजे पाणी का मला पराबद्दल जळजळ वाटते अशी तुमची विनोदी समजूत झाली हे काही समजले नाही.
बाकी प्रत्येक वेळेस "हा शेवटचा प्रतिसाद" म्हणून पुढचा प्रतिसाद देताच तर उगाच असं कशाला लिहायचं तेसुद्धा काही समजलं नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2011 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा

जगजित सिंग यांनी गायलेली आहे,अर्थात ही नज्म या प्रकारात मोडते.माझी अतिशय लाडकी गझल आहे ही,आपण केलेलं विडंबन उत्तम आहे...आपको हमारा सलाम.

इंटरनेटस्नेही's picture

1 Jul 2011 - 7:12 pm | इंटरनेटस्नेही

दर्जेदार काव्य. आवडले. :)

इंटरनेटस्नेही's picture

1 Jul 2011 - 7:12 pm | इंटरनेटस्नेही

दर्जेदार काव्य. आवडले. :)

प्रास's picture

28 Jun 2011 - 1:38 pm | प्रास

हे तर भारीच आहे की......

मुंबईमधल्या कंपू कार्यालयास भेट देण्याचा मनसुबा धरणारा -

प्रास.

अरे, कुणी जमात-ए-कंपू कार्यालयाचा मुंबईतला पत्ता देतं का रे पत्ता? भांडुपचाही चालेल ;-)

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 6:25 pm | धमाल मुलगा

उशीरच केला की हो.. भांडूपातल्या कार्यालयाला कधीच टाळं लागलं. त्या भिंद्रनवालेला गजाआड केला की हो.

आता ते केंद्र अंमळ नव्या मुंबईकडं सरकलंय अशी खबर आहे. :)

अजातशत्रु's picture

28 Jun 2011 - 2:26 pm | अजातशत्रु

काहींनी आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या आहेत, मि तरी आजच पाहीलेय त्यांना
कंपूच्या आतले आणि बाहेरचे दोन्ही कडून मनसोक्त दाद मिळाली,

(कोणत्याही कंपुत नसलेला)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2011 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते

साती's picture

28 Jun 2011 - 2:53 pm | साती

जबरदस्त!
हे थत्तेचाचांपेक्षा लई भारी झालंय.
तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे. :)

श्रावण मोडक's picture

28 Jun 2011 - 7:55 pm | श्रावण मोडक

तात्यांची गादी का गेली याची बखर मिळाल्यास कृपया संदर्भ देणे.

अगा बाब्बो... :)

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2011 - 4:12 pm | स्वाती दिनेश

मस्त!
स्वाती

सविता००१'s picture

28 Jun 2011 - 4:38 pm | सविता००१

खूप मस्त

तिमा's picture

28 Jun 2011 - 5:58 pm | तिमा

तुम्ही पि.डा. नांव का घेतले आहे ते. मजेशीर लिखाण. पण खरे प्रतिसाद वाचायला मिळाले नाहीत. नुसतं मेलो, खपलो यापलिकडचेही प्रतिसाद वाचायला आवडले असते.

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2011 - 8:13 pm | राजेश घासकडवी

हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा किंवा कंपूबाजीच अर्थ लावण्यासाठी उघडलेला नाही....अस तुमच म्हणण आहे,तर मग मी तुमच्याशी चर्चा थांबवतो...फक्त मिपाटवाळांमध्ये मधे एकिचं बळ आहे, हा युक्तिवाद तुंम्ही गांभीर्यानी तपासावा,अशी इच्छा मी या निमित्तानी व्यक्त करतो...मिपाटवाळांमधे अनेक कंपू पडलेले आहेत.आणी ते ऐतिहासिक काळापासुन एकमेकाला भडक भगवे, विचारजंती, संघिष्ट, हिरवे, कॉंग्रेसवाले आणि सर्वात वाईट म्हणजे संपादक म्हणुन झिडकारतात,भांडतात.जर तत्व खरी/प्रामाणिक असती तर असं झालं नसतं,हे तरी तुम्हाला पटावं,अशी आमची एक आपली इच्छा...(असं होईल अशी भविष्यवाणी जालिंदरगुरुजींनी पण वर्तवली होती)या अंतर्गत विषमतेची कारणं तुंम्ही तपासा...तुमच्या म्हणण्या प्रमाणे आंम्ही सर्व बिगर कंपूवाले, नवखे आयडी असंघटित/विभक्त आहोत,हे खर आहे.पण आज मिपावर सुद्धा (आणी एकंदरीत आंजावर) जेवढे लोक टवाळांमधे आले.त्यांच्यात आपापसात मतभेद नाही विषमता आहे.कारण ज्या तत्वांवरुन तुंम्ही ऐक्य करायला जाता,ती तत्वच विषमतावादी आहेत... लोक त्या तत्वांमुळे एक होत नाहित,तर भय/इहलौकिक फायदे हे नजरेसमोर ठेउन एक होतात...त्यामुळे हेतुची पुर्तता झाली,की आपापसात झगडे सुरु होतात...मिपावरील इतिहासात बहुतेक सर्व टवाळ कंपू नेहमी एकमेकांना संपवण्या साठी भांडणं करत आले,हे तर खर आहेच...त्याची दखल घ्या...आणी नीलकांत मिपाटवाळांना एकत्र आणु शकले नाहित हा काही त्यांचा दोष नव्हे...कुठल्याही सुधारकाला समाज स्वतःच्या आडमुठ्या /कर्मठ प्रव्रुत्तीमुळे दुर ढकलत असतो...हे त्या सुधारकाच अपयश नसुन त्या समाजाच दुर्दैव असत,हे तर उघड आहे...असो... आपण हे सर्व समजुन उमजुन घ्याल अशी,पुन्हा एकवार मी भाबडी आशा व्यक्त करुन ही चर्चा माझ्याकडुन थांबवतो...

काव्यकीडा-लेखसेन...भरभर लिहितो मी कवनी

आम्ही ''जन्मानी'' मिपाकर नसुन,मिपावर ''आमचा'' जन्म झालेला आहे....

श्रावण मोडक's picture

28 Jun 2011 - 8:22 pm | श्रावण मोडक

च्यायला, आवरा राव... हसून हसून कोलमडायची वेळ आली. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2011 - 8:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादास सडके म्हणावे काय?