एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह! अरे, आम्ही जन्माला आलो तेव्हा सुद्धा न्युड नव्हतो, खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच असा सगळा जामानिमा घेऊनच आम्ही या जगती प्रवेश करते झालो. या कवचात अश्लैल्य डिटेक्ट करणारी नॅनो चिप आहे हे तुला म्हणून सांगतो. ह्या चिपमुळे तर आम्ही चित्रपट न बघता चित्रपटातील अश्लैल्य शोधून काढतो, नुसत्या नावावरून संस्कृती किती फूट बुडणार हे सांगू शकतो. हार्दिक पटेल अन संजय जोशी यांच्यासारख्या पाप्यांच्या क्लिपा काढून त्यांचे अश्लैल्य जगासमोर आणतो. या जगतीचे सारे अश्लैल्य दूर करून १२५ कोटी बालमने प्रदुषीत होण्यापासून वाचवणे हे तर आमचे जिवितध्येय. हे ध्येय मनी धरून तर आमचे बापट रात्रीचा दिवस करू करू क्लिपा बघतात. कर्नाटकात तर मंत्री विधानसभेत डोळ्याच्या खाचा होईपर्यंत पॉर्न बघतात. ध्येय एकच: सारे अश्लैल्य नष्ट करणे. अरे, बघितल्याशिवाय कळणार कसे किती अश्लिल आहे ते! असो. चित्रपट काढताय? जरूर काढा. पण त्याला पतंजलीच्या गोमुत्र स्कॅनरमधून स्कॅन करणे क्रमप्राप्त असेल हे लक्षात राहू द्या म्हणजे झालं.
चला, निघतो. अजून दहा क्लिपातलं अश्लैल्य शोधायचंय.
---श्री नाना लाजाळू, ॲंटी अश्लैल्य स्क्वाड, पुणे ३०
वाचने
18759
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
छान
काही जमलं नाही!
फुकटच्या वाइफाइचा उपयोग काय
बाबू, सुबोध खरे, लेख वाचून
In reply to बाबू, सुबोध खरे, लेख वाचून by पुंबा
कंजूसकाकांंचा प्रतिसाद
In reply to कंजूसकाकांंचा प्रतिसाद by अभिजीत अवलिया
हा!! असू शकतं तसंच.
प्रकझा?
साहेब तुमची अँटी अश्लैल्य
नक्की काय झालंय?
हा चित्रपट चित्रकलेच्या न्यूड
In reply to हा चित्रपट चित्रकलेच्या न्यूड by एस
अगदी अगदी
समजलं
In reply to समजलं by रामपुरी
काय करणार!
In reply to समजलं by रामपुरी
काय करणार!
विषय इथं मांडल्याबद्दल
In reply to विषय इथं मांडल्याबद्दल by शब्दबम्बाळ
खरोखर
https://mumbaimirror
एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ,
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
सहमत.. समांतर सेन्सॉर नसावेच.
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
https://www.loksatta.com
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
सोमणांवर बहिष्कार घालून निषेध
In reply to सोमणांवर बहिष्कार घालून निषेध by पुंबा
सहमत...तसंही प्रश्न अजून
In reply to एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ, by पुंबा
आपण मराठी माणसे मात्र रवि
चांगलं लिहिलंय ..
In reply to चांगलं लिहिलंय .. by मराठी कथालेखक
सर्वज्ञता
In reply to सर्वज्ञता by गामा पैलवान
बाकी काहीही म्हणा पण
In reply to चांगलं लिहिलंय .. by मराठी कथालेखक
बरोबर आहे. संदर्भ द्यायला हवा
मराठी सिनेमासमोरील विघ्ने
मिपावरही हेच चालतं
‘न्यूड’ हा सिनेमा सेन्सॉरच
In reply to ‘न्यूड’ हा सिनेमा सेन्सॉरच by श्रीगुरुजी
इतर माहिती
खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच
१९७१ साली...
लेखाशी प्रचंड सहमत!
तकलादू संस्कृती
In reply to तकलादू संस्कृती by गामा पैलवान
गा पै
In reply to गा पै by नाखु
ओकाऱ्या काढणारे काढत असतील पण
In reply to ओकाऱ्या काढणारे काढत असतील पण by शब्दबम्बाळ
सहमत
इफ्फी’मध्ये ‘एस दुर्गा’ दाखवणार !