मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

पुंबा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह! अरे, आम्ही जन्माला आलो तेव्हा सुद्धा न्युड नव्हतो, खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच असा सगळा जामानिमा घेऊनच आम्ही या जगती प्रवेश करते झालो. या कवचात अश्लैल्य डिटेक्ट करणारी नॅनो चिप आहे हे तुला म्हणून सांगतो. ह्या चिपमुळे तर आम्ही चित्रपट न बघता चित्रपटातील अश्लैल्य शोधून काढतो, नुसत्या नावावरून संस्कृती किती फूट बुडणार हे सांगू शकतो. हार्दिक पटेल अन संजय जोशी यांच्यासारख्या पाप्यांच्या क्लिपा काढून त्यांचे अश्लैल्य जगासमोर आणतो. या जगतीचे सारे अश्लैल्य दूर करून १२५ कोटी बालमने प्रदुषीत होण्यापासून वाचवणे हे तर आमचे जिवितध्येय. हे ध्येय मनी धरून तर आमचे बापट रात्रीचा दिवस करू करू क्लिपा बघतात. कर्नाटकात तर मंत्री विधानसभेत डोळ्याच्या खाचा होईपर्यंत पॉर्न बघतात. ध्येय एकच: सारे अश्लैल्य नष्ट करणे. अरे, बघितल्याशिवाय कळणार कसे किती अश्लिल आहे ते! असो. चित्रपट काढताय? जरूर काढा. पण त्याला पतंजलीच्या गोमुत्र स्कॅनरमधून स्कॅन करणे क्रमप्राप्त असेल हे लक्षात राहू द्या म्हणजे झालं. चला, निघतो. अजून दहा क्लिपातलं अश्लैल्य शोधायचंय. ---श्री नाना लाजाळू, ॲंटी अश्लैल्य स्क्वाड, पुणे ३०

वाचन 18759 प्रतिक्रिया 39