नमस्कार,
यंदा दिवाळीच्या सुट्टीत हंपी चा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. अर्थातच, फॅमिली मध्ये आमचा श्वान दुशन्त उर्फ बोल्ट ला देखील न्यायचे आहे.
जाणार:- पुणे-हंपी-पुणे
दिवस :- ४.५ (हा अर्धा दिवस का ते पुढे येईलच)
फॅमिली:- २ मोठे, २ लहान (वय वर्ष ५ आणि १३) + एक श्वान
जाणार कसे:- स्वतःच्या ४ चाकीने
थोडक्यात रूपरेषा
१. सुट्ट्या कमी असल्यामुळे हापिसातून जरा लवकर निघून कोल्हापूर/किंवा थोडं पुढे एक ब्रेक घायचा प्लॅन आहे (हाच तो ०.५ दिवस).
२. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून थेट हंपी गाठायचा प्लॅन आहे.
३. हंपी वास्तव्य आणि मग तिथे साधारण दोन ते अडीच दिवस साईट-सिईंग
४. शेवटच्या दिवशी डायरेक्ट हंपी-पुणे रिटर्न
कश्या संदर्भात मदत हवी आहे?
१. कोल्हापूर/निप्पाणी इथे पेट फ्रेंडली हॉटेल/सर्विस अपार्टमेंट/गेस्ट हाऊस माहिती आहेत काय? राहण्याचा अनुभव आहे का?
२. हंपी ला सुद्धा वरील प्रमाणे काही पेट फ्रेंडली/किड फ्रेंडली गेस्ट हाऊस ची नावे माहिती आहेत का? [किड फ्रेंडली म्हणजे खेळायला जागा, स्विमिन्ग पूल असेल तर अजून उत्तम]
३. तिथे फिरायचे २/३ ऑपशन आहेत (मी आणि मुलगा बहुदा सायकल वापरू, बायको आणि मुलगी जिथे परवानगी असेल तिथे कार ने किंवा मग मोपेड/रिक्षा भाड्याने घेऊन प्रवास करतील. ह्यात नक्की काय दक्षता घ्यावी? फिरताना काय आणि कसे सुरु करावे? कुठल्या जागा नक्कीच बघाव्यात?
४. हंपी सोडून, अजून जवळपास काही बघण्या सारखे आहे का वाटेत/थोडी वाकडी वाट करून, पण चुकवू नये असे काही?
५. जेवणा खाण्याची उत्तम ठिकाणे, [हे फारच महत्वाचे! :-)] काही माहिती असतील तर तिथे काय नक्की ट्राय करावे/करू नये, हे देखील सांगा
मी एयर-बीनबी वर शोध सुरु ठेवतोय, पण कोणाला अनुभव असतील (वरील कुठल्याही पॉईंट्स वर) तरी नक्की शेयर करावेत.
आभारी आहे!
_/\_
वाचने
16166
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी कालच हंपीहुन परत पोचलेय
मी अॅमेझोनवरुन एक पुस्तक
In reply to मी कालच हंपीहुन परत पोचलेय by प्रीत-मोहर
नाव लक्षात नाही, हंपी /
In reply to मी अॅमेझोनवरुन एक पुस्तक by केडी
हे आहे का..?
In reply to नाव लक्षात नाही, हंपी / by प्रीत-मोहर
हेच, मी मागवलंय .....अमेझॉन
In reply to हे आहे का..? by मोदक
हो हेच!! छान आहे पुस्तक
In reply to हे आहे का..? by मोदक
पुस्तक आलं, माहिती छान आहे,
In reply to हो हेच!! छान आहे पुस्तक by प्रीत-मोहर
जेवण!! जवळपास सगळ्या खानावळी
धन्यवाद! उत्तम फर्स्ट हॅन्ड
माझा धागा आहे जुना परंतू तो
धन्यवाद!
In reply to माझा धागा आहे जुना परंतू तो by कंजूस
विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी
In reply to धन्यवाद! by केडी
धन्यवाद...
In reply to विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी by कंजूस
सूचना: कलादालन धाग्यांतले
In reply to धन्यवाद! by केडी
चालणे अपरिहार्य
वाचनखूण साठवली आहे. कामाला
पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत
धन्यवाद...
In reply to पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत by प्रचेतस
यातली जवळपास सगळी ठिकाणं
In reply to पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत by प्रचेतस
http://www.misalpav.com/node
धन्यवाद
In reply to http://www.misalpav.com/node by जयंत कुलकर्णी
हॉटेल मल्लिगी.
धन्यवाद!
In reply to हॉटेल मल्लिगी. by पद्माक्षी
नक्की जाणार का?
नक्की जाणार का?
In reply to नक्की जाणार का? by कंजूस
शक्य असेल तर करून या बदामी पण
In reply to नक्की जाणार का? by केडी
हो जमलं तर बदामी सुद्धा करणार
In reply to शक्य असेल तर करून या बदामी पण by त्रिवेणी
शंका नाही. फक्त त्याच
अच्छा, आला लक्षात, तुम्ही आणि
In reply to शंका नाही. फक्त त्याच by कंजूस
हंपी
ह्या माहिती बद्दल आभार!
In reply to हंपी by सुज्ञ माणुस
मधला थांबा
कालच रात्री हंपी वरून परत आलो
मस्त
मस्त