मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता? अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने विशाल कुलकर्णी

वाचने 6595 वाचनखूण प्रतिक्रिया 22

कपिलमुनी Fri, 02/03/2017 - 16:44
एकंदरीत मिपावर काव्य विभागात दुष्काळच असतो ! एक काव्य स्पर्धा आय्प्जित करा

राघव Mon, 02/06/2017 - 10:25
छान लिहिलेयस! :-) कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता? अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने हे दोन शेर विशेष आवडलेत.