Skip to main content

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला! ;) शोधतो मौनात बागा, निरखणे आता नव्याने पेठ गल्लीबोळ फिरुनी शोधणे आता नव्याने! कोणत्या त्या बंगली वसते परी सांगा गड्यांनो? फाटकांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने! 'भारती' अन 'वाडिया'ही वाटती का क्षुद्र आता? फर्ग्युसनच्या मृगजळी धुंडाळणे आता नव्याने! 'सीसिडी'ला पडिकणे मी सोडले आहे अताशा वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने! कन्यकांना शोधतो मी बापसांची कोण गर्दी 'लष्करा'च्या 'गांधि'मार्गी चालणे आता नव्याने! मोल कवडी हाय! उरलो, येच तू बघते घरी रे विघ्नकर्त्या हात जोडुन विनवणे आता नव्याने!! - चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3706
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

मस्तच ! 'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय. 'लष्करा'चा 'गांधि'मार्ग हल्लीच्या काळी कोथरुडात गेलाय.. त्यामुळे 'शहरा'च्या 'गर्व' मार्गी चालणे आता नव्याने असा बदल सुचवतो.

In reply to by खेडूत

'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय
तुमच्या मनात वेगळे 'फाटक' असले तर श्लेष आहे! ;)

=)) =)) पडिकणे शब्द लैच लाइकला आहे!

मूळ कविता आणि विडंबन दोन्ही छान.