वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने
लेखनविषय:
काव्यरस
शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने
मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने
कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो
माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने
भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता?
अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने
तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने
माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी
लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने
मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे
विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने
विशाल कुलकर्णी
वाचने
6595
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
अप्रतिम रचना!
मीटर + मॅटर दोन्ही सही !
इतक्या सुघड, सुबक, सुरेख कवितेसाठी धन्यवाद.
धन्यवाद !
__/\__
सुरेख!
सुंदर!
सल्लाम!
एकदम कडक गजल!_/\_
आमचा नजराणा पेश आहेच!
-चतुरंग
नेहेमीप्रमाणेच कविता आवडली गड्या रे
'अजून येऊद्या' काय म्हणणे आता नव्याने!
मस्त, आवडली!
सुरेख!
छान!
एकंदरीत मिपावर काव्य विभागात दुष्काळच असतो !
एक काव्य स्पर्धा आय्प्जित करा
In reply to मस्त ! by कपिलमुनी
विडंबन स्पर्धा आयोजित करा, सगळे कवी तांब्या लेखण्या सरसावून भाग घेतील.
In reply to विडंबन स्पर्धा आयोजित करा, by बॅटमॅन
लै वेळा.... ;)
मस्त लिहिलेय!
जबरदस्त रचना
मनःपूर्वक आभार मंडळी !
छान रचना! आवडली!
छान लिहिलेयस! :-)
कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो
माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने
भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता?
अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने
हे दोन शेर विशेष आवडलेत.
In reply to आवडली रे! by राघव
धन्यवाद राघव !
वाहवा!