शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने
मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने
कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो
माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने
भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता?
अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने
तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने
माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी
लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने
मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे
विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने
विशाल कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6595
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!
मीटर + मॅटर
इतक्या सुघड, सुबक, सुरेख
धन्यवाद !
__/\__
सुरेख!
सुंदर!
सल्लाम!
क्या बात है!
नेहेमीप्रमाणेच कविता आवडली
मस्त, आवडली!
सुरेख!
छान!
मस्त !
विडंबन स्पर्धा आयोजित करा,
In reply to मस्त ! by कपिलमुनी
तांब्यालेखण्या सरसावून भाग घेतील.लै वेळा.... ;)
In reply to विडंबन स्पर्धा आयोजित करा, by बॅटमॅन
मस्त लिहिलेय!
सलाम
मनःपूर्वक आभार मंडळी !
छान रचना! आवडली!
आवडली रे!
धन्यवाद राघव !
In reply to आवडली रे! by राघव