नोटबंदी'च्या चाव्या (IT डिपार्टमेंट) चोरांच्या हातात...!!
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by डॉ सुहास म्हात्रे
घ्या तुम्ही असे काही लिहिणार याची कुणकुण करविभागाला लागली आणि ते मोठे (की मध्यम आकाराचे ?) मासे पकडायच्या कामाला लागले पण :) ...अडीच वर्ष झोपले होते का आय टी वाले ?
In reply to घ्या तुम्ही असे काही लिहिणार by मार्मिक गोडसे
In reply to हो ना ! ७० वर्षांच्या सवयी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सॉरी, तो विनोद होता हे माहीत by मार्मिक गोडसे
In reply to घ्या मी असे काही लिहिणार याची by विशुमित
डोंगर पोखरून उंदीर तर बाहेर येणार नाहीत नाउंदीरही बाहेर येणार नाही. डोंगराकडे लांबून बघणाऱ्या उंदरांचा ब्लॅकमनी व्हाईट करायची नवी स्कीमही आणली आहे म्हणे.
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to ८ नोव्हेंबर ला नोटबंदीची by विशुमित
In reply to अगदी १४ लाख कोटी जमा झाले असे by श्रीगुरुजी
In reply to १.५ लक्ष कोटीच्या उंदरासाठी by विशुमित
In reply to बरं माना तसं. न मानायची सक्ती by श्रीगुरुजी
In reply to अगदी १४ लाख कोटी जमा झाले असे by श्रीगुरुजी
In reply to केव्ळ १४ लाख कोटी जमा होतील by मृत्युन्जय
In reply to जुन्या नोटा जमा करायची मुदत by श्रीगुरुजी
In reply to निदान मुख्य अंदाज तर सपशेल फसला आहे by संजय क्षीरसागर
रद्द करण्यात आलेल्या साडे पंधरा लाख कोटी रुपयांपैकी ३ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा होणार नाही, असा केंद्र सरकारचा अंदाज होता. देशात ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आहे आणि हा पैसा नोटाबंदीनंतर आपोआप चलनातून बाद होईल, असा सरकारचा अंदाज होता लिंकअंदाजच होता ना? का अगदी कागदावर गणिते करून अगदी परीपूर्ण आकडा काढला होता? अजून दीड लाख कोटी रूपये बँकेत यायचे आहेत. पैसे भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत उर्वरीत पूर्ण दीड लाख कोटी रूपये परत येणे शक्य वाटत नाही. दुसरं म्हणजे अनेकांनी काळा पैसा उघड व्हायचा धोका पत्करून पैसे दडवून न ठेवता बँकेत भरले आहेत. भविष्यात काय कारवाई होईल बघू. जरी आपल्या भरलेल्या पैशाबद्दल संशय आला तरी आपल्यापर्यंत आयकर विभाग, अंमलबजावणी संचलनालय पोहोचायला खूप वर्षे लागतील. उगाच पैशाची वेगळी विल्हेवाट लावण्यापेक्षा खात्यात भरून टाकू, पुढचं पुढं बघू या भावनेतून अनेकांनी धाडस करून पैसे खात्यात भरले आहेत (उदा. बसपने लागोपाठ ६-७ दिवस आपल्या खात्यात रोज १६-१८ कोटी रूपये असे एकूण १०४ कोटी रूपये खात्यात भरले). तिसरं म्हणजे काही पुढार्यांनी आपले वजन वापरून बळजबरीने आपला काळा पैसा बँकेत जाऊन बदलला. नाशिकमधील एका बँकेत ४-५ संचालकांनी मॅनेजरला दमदाटी करून बँकेची स्ट्राँगरूम उघडायला लावून आपल्या जवळील ५००/१००० च्या स्वरूपात असलेले ३५ कोटी तिजोरीत ठेवून त्या बदल्यात १०० च्या नोटा नेल्या असे उघडकीस आले आहे. चौथं म्हणजे काही जणांनी आपल्या ओळखीतल्या गरीबांच्या जनधन खात्यावर त्यांना लालूच दाखवून आपले पैसे त्यांच्या खात्यावर भरले. माझी एक मेव्हणी एका सहकारी बँकेत काम करते. बँकेच्या एका संचालकाने तब्बल २० वेगवेगळ्या खात्यात प्रत्येकी २ लाख असे ४० लाख रूपये भरले. त्याने तिलाही ऑफर दिली होती की तिच्या खात्यात २ लाख भरून ६ महिन्यांनी तिने फक्त १ लाख ८० हजार त्याला परत द्यायचे. हीच ऑफर त्याने इतरांना दिली असणार. म्हणजे बँकेत जमा झालेला सर्व पैसा श्वेत नाही. त्यात काळ्या पशाचाही समावेश आहे. आता अशी खाती शोधून आयकर विभाग, अंमलबजावणी संचलनालय किती लवकर कारवाई करते ते बघायचं. पाचवं म्हणजे काही जणांनी तर जुन्या ५००/१००० च्या नोटा चक्क जाळून टाकल्या किंवा मोट्।या देवालयाच्या पेटीत टाकल्या अशाही बातम्या आल्या होत्या. सहावं म्हणजे अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकेत येण्याआधीच जप्त केला गेला आहे. या सर्व वैध/अवैध मार्गांमुळे बँकेत अंदाजापेक्षा कमी पैसे आले यात नवल नाही. परंतु जो काळा पैसा अधिकृतरित्या बँकेत जमा केलेला आहे तो ट्रॅक करता येईल.
शिवाय महागाई कमी होईल, अतीरेकी कारवायांना आळा बसेल, रिअल इस्टेटमधे भाव क्रॅश होतील वगैरे बाता मोदींनी मारल्या होत्या.... ते घंटा काही झालं नाही. आणि आता यानंतर होण्याची काडीमात्र शक्यता नाही.जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले आहेत, भाव न मिळाल्यामुळे टोमॅटो/कांदे/दूध इ. रस्त्यावर फेकून दिल्याच्या बातम्या येत आहेत. काश्मिरमधील दगडफेक थांबलेली दिसत आहे. नक्षलवादी कारवाया थांबलेल्या दिसत आहेत. सीमेपलिकडून येणारे जिहादी अतिरेकी मात्र फारसे कमी झालेले नाहीत कारण त्यांच्या कारवाया ५००/१००० च्या नोटांवर अवलंबून नाहीत.
आता लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे, भरलेल्या पैशातला बेहिशेबी पैसा शोधणं इन्कमटॅक्सच्या हातात आहे आणि ती फार क्लिष्ट प्रक्रिया आहे.असू शकेल.
पुन्हा कार्ड चार्जेस, इंटरनेट चार्जेस याबाबत काहीही न करता केवळ मूर्खासारख्या लॉटरी बक्षिस योजना जाहीर करुन सरकार आपल्या अकलेचं दिवाळं काढतंय.बाजारात निशुल्क सेवा देणारी अनेक कार्डे उपलब्ध असताना तुम्ही मूर्खासारखं भरपूर चार्ज लावणारं कार्ड वापरता यात सरकारच्या अकलेचा काय संबंध? असलाच तर तुमच्या अकलेचा संबंध आहे.
थोडक्यात, नव्या नोटांवर पुन्हा जुनाच खेळ सुरु होणार आहे.हा चोरपोलिसांचा खेळ आहे. तो सुरूच राहणार. सरकारने एक चाल खेळली काळाबाजारवाले पुढची एकदम वेगळी चाल खेळायचा प्रयत्न करणार. म्हणून काहीच न करता स्वस्थ बसायचे हा उपाय नाही.
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
In reply to <<<<आता अशी खाती शोधून आयकर by विशुमित
भाव न मिळाल्यामुळे टोमॅटो/कांदे/दूध इ. रस्त्यावर फेकून दिल्याच्या बातम्या येत आहेत.>>> -- हे चांगलं झाले असे म्हणायचे आहे का तुम्हाला?अन्नपदार्थ रस्त्यावर फेकणे हे वाईटच आहे, परंतु हे भाव कमी होण्याशी नोटाबंदीचा संबध नाही.
हा चोरपोलिसांचा खेळ आहे. तो सुरूच राहणार>>> -- लहानपणी बेडकांची एक गोष्ट पाठ्यपुस्तकात होती... " तुमचा होतो खेळ पण आमचा जातो जीव " हे असाच चालणार असेल तर एवढा अवसानघातकी निर्णय घेऊन देशाचे नुकसान होऊ शकते याचा विचार निर्णयकर्त्याने घेतला होता का?हा निर्णय अवसानघातकी कसा? या निर्णयामुळे देशाचे काय नुकसान झाले आहे?
In reply to >> by श्रीगुरुजी
In reply to समस्त नोटाबंदी विरोधकांना सणसणीत चपराक देणारा हा एक forward आहे. by बोका-ए-आझम
In reply to दत्ता जोशींचा पगार समजेल काय? by संदीप डांगे
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
In reply to असं कसं, असं कसं ???!!! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to <<<<काळ्या पैशांविरुद्ध by विशुमित
जी नोटबंदीची कारणे ८ नोव्हेंबर नंतर सांगितली गेली होती त्याला हातच्या कंगनाला आरसा कशाला? ते सुस्पष्ट दिसतंय.काय सांगितलं होतं कि ३० तारखेला दहशतवाद संपलेला असेल? काळा पैसे संपलेला असेल? ३० तारीख अजून आली सुद्धा नाही तोपर्यंत आपला ८ नोव्हेंबरलाच ठरवलेला निष्कर्ष पुढे रेटण्यात काय अर्थ आहे? म्हणजे हे निष्पक्ष निरीक्षण कसे?
-- आता पर्यंत तरी ह्या निर्णयाची वाटचाल शोबाजीकडेच चाललेली दिसत आहे.हे तुमचं वैयक्तिक मत असावं! ते तसं वाटण्याचे काही विशिष्ट प्रसंग/निर्णय काय असावेत बरे?
५० दिवसात सगळे बदलण्याचा अट्टाहासच या निर्णयाला नडला आहे, हे वेळो वेळोवेळी बदलेल्या ६३ नियमातून दिसेलच आहे.काय सगळं ५० दिवसात बदलण्याचा अट्टाहास कोणी कधी जाहीर केला? ६३ वेळेला कुठले निर्णय बदलले गेले? म्हणजे ६३ नियम ८ तारखेला सांगितले गेले होते ते वेळोवेळी बदलण्यात आले होते असे आपले म्हणणे आहे का? प्रत्येक दिवसाची परिस्थिती बघून त्यानुसार होणाऱ्या त्रासाला हॅण्डल करण्यासाठी निर्णय घेण्यात येतील असं अर्थसचिवांनी सुरुवातीलाच सांगितले नव्हते का? आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे नियम बदलण्यात? त्यांनी डे १ ला नियम करून ५० दिवस स्वस्थ बसणे परिणामकारक होणार होते असे आपले मत आहे काय? ते ६३ नियम एकेककरून मांडून तो निर्णय चुकीचं होता कि बरोबर किंवा त्या निर्णयाने परिस्थिती सुधारण्यास हातभार लागला कि कि परिस्थिती चिघळली असं वर्गीकरण मांडून मग नियमबदलानं जोडे मारणे जास्त संयुक्तिक नाही का?
In reply to जी नोटबंदीची कारणे ८ by हतोळकरांचा प्रसाद
काय सगळं ५० दिवसात बदलण्याचा अट्टाहास कोणी कधी जाहीर केला? ६३ वेळेला कुठले निर्णय बदलले गेले? म्हणजे ६३ नियम ८ तारखेला सांगितले गेले होते ते वेळोवेळी बदलण्यात आले होते असे आपले म्हणणे आहे का? प्रत्येक दिवसाची परिस्थिती बघून त्यानुसार होणाऱ्या त्रासाला हॅण्डल करण्यासाठी निर्णय घेण्यात येतील असं अर्थसचिवांनी सुरुवातीलाच सांगितले नव्हते का? आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे नियम बदलण्यात? त्यांनी डे १ ला नियम करून ५० दिवस स्वस्थ बसणे परिणामकारक होणार होते असे आपले मत आहे काय? ते ६३ नियम एकेककरून मांडून तो निर्णय चुकीचं होता कि बरोबर किंवा त्या निर्णयाने परिस्थिती सुधारण्यास हातभार लागला कि कि परिस्थिती चिघळली असं वर्गीकरण मांडून मग नियमबदलानं जोडे मारणे जास्त संयुक्तिक नाही का?फुकट पैसे खायचे मार्ग बंद झाले असतील. म्हणून जळजळ चालली असेल. दुसरं काय !
In reply to रद्द करण्यात आलेल्या साडे by श्रीगुरुजी
In reply to नामी प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
In reply to नामी प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
अंदाजच होता ना? का अगदी कागदावर गणिते करून अगदी परीपूर्ण आकडा काढला होता? अंदाज न करताच मूर्खासारखा निर्णय घेण्याची हिंमत करणं हे प्रतिसाद पातळीवर ठीके पण राष्ट्रीय पातळीवर असं करता येत नाही. आणि तो अंदाजच फसला, हा मूळ मुद्दा आहे.राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक क्षेत्रात अंदाजावर आधारीतच पुढील योजना आखल्या जातात. वार्षिक अंदाजपत्रक सादर करताना पुढील आर्थिक वर्षात करसंकलन किती होईल, अंदाजपत्रकीय तूट किती असेल, किती टक्के असेल, राष्ट्रीय उत्पन्न किती असेल, जीडीपी किती असेल, निर्यात व आयात किती असेल, चलनविनिमयाचा दर असेल, महागाईचा दर किती असेल इ. अनेक घटकांचे अंदाजच असतात. अनेक वर्षांची प्रत्यक्ष ऐतिहासिक आकडेवारी हातात असली तर कोणताही अंदाज १००% बरोबर येत नाही. हे अंदाज अनेकवेळा सकारात्मक किंवा नकारात्मक रित्या चुकतात. नोटाबंदीच्या निर्णय घेताना अशी ऐतिहासिक आकडेवारी उपलब्धच नव्हती. काळा पैसा किती आहे याचे फक्त ढोबळ अंदाजच होते. तुमचे या विषयावरील सर्व प्रतिसाद बघता तुम्ही खरोखरच सीए आहात की एखाद्या किराणाभुसार व्यापार्याच्या पेढीवर लाल चोपड्यात हिशेब लिहिणारे दिवाणजी/मुनीमजी आहात याविषयी दाट शंका आहे कारण तुमच्या प्रतिसादात निव्वळ पूर्वग्रहाशिवाय दुसरे काहीही नाही आणि इतरांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव कितीही लिहिले तरी माझंच खरं असा दुराग्रहही आहे.
कुठल्या दुनियेत राहाता ? महागाई कमी झालीये ? सगळे भाव जसेच्या तसे आहेत. बाजारात जाण्याचा प्रसंगच येत नसल्यामुळे असा गैरसमज झाला असेल. ज्या अतिरेकी कारवाया थांबल्याची शेखी मारली जातेयं त्या शुल्लक आहेत आणि स्थिती केंव्हाही पूर्वपदावर येईल.परत एकदा इतरांबद्दल आणि बाहेरील परिस्थितीबद्दल तुमच्या मनात ठाम चुकीची गृहितके आहेत आणि आपण समजतो तसाच दुसरा वागतो हा प्रचंड गैरसमजही मनात आहे.
खाजगी बँकात खाती उघडून कार्ड चार्जेस वाचवायचा मूर्खपणा आपणच करु जाणे. नॅशनलाइज्ड बँकात खाती असणारे कित्येक करोड लोक आहेत आणि ते सरकारी उपक्रम असल्यानं सरकारनी त्याविषयी निर्णय घ्यावा इतकी साधी गोष्ट समजत नसेल तर आपल्या आकलनाची कमाल आहे.खाजगी बॅकेत मी किंवा अजून कोणी फक्त कार्ड चार्जेस वाचविण्याकरिता खाते उघडतात हे अजून एक मूर्खपणाचे गृहितक आहे. अर्थात आपण समजतो तेच सत्य असा ठाम गैरसमज मनात असल्याने अशा गृहितकांची मनात रेलचेल असणार. बाजारात निशुल्क कार्ड सेवा देणार्या जशा खाजगी बँका आहेत तशाच सरकारी बँका सुद्धा आहेत. माझ्या वडीलांचे बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेत खाते आहे. त्यांनी गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक ठिकाणी डेबिट/एटीम कार्ड वापरले आहे. कोठेही चार्जेस लागलेले नाहीत. तुम्ही इतर अनेक निशुल्क पर्याय उपलब्ध असताना भरपूर शुल्क लावणार्या बँकेचे कार्ड वापरणार आणि मग सरकारच्या नावाने ठणाणा करणार.
आक्खा देश वेठीला धरला गेला. रांगेत उभं राहून लोकांचे नाहक बळी गेले. बँकींग यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आणि अजूनही पडतोयं, नव्या नोटा छापयचा भरमसाठ खर्च झाला आणि निष्पन्न जवळजवळ शून्य. आणि या सर्वाला विद्वजन काय म्हणतात तर चोर-पोलीसाचा खेळ ! सायकोपाथीचं यापेक्षा उत्तम उदाहरण नसेल !कोणीही वेठीला धरला गेला नाहीय्ये. वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेवर वेगवेगळ्या वेळी ताण पडत असतोच. गणेशोत्सव, निवडणुका या काळात पोलिस, सरकारी कर्मचारी इ. ताण पडतोच. खाजगी कंपन्यात डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यावर कर्माचार्यांवर ताण पडतोच. आणि तुमच्या "शून्य निष्पन्न" या छातीठोक निष्कर्षावरून, २-जी तरंगलहरींचे वाटप करताना लिलाव न करता स्वतःच्या मर्जीतील कंपन्यांना तरंगलहरी प्रदान करून देशाचे १,८६,००० कोटी रू. उत्पन्न बुडविल्याच्या अहवालावर, "झिरो लॉस" म्हणणार्या एका विद्वान राजकारण्याची आठवण आली. असो. या निर्णयाचे फायदेतोटे पहायचे असतील खालील लिंक उघडा. पण वाचण्याआधी सर्व प्रकारचे चष्मे काढून स्वच्छ डोळ्यांनी वाचा. अन्यथा लिहिलंय तेही खोटं वाटेल. http://www.misalpav.com/comment/909984#comment-909984 http://www.misalpav.com/comment/909135#comment-909135 http://www.misalpav.com/comment/909980#comment-909980
In reply to अंदाजच होता ना? का अगदी by श्रीगुरुजी
In reply to काय लिहीतायं ते कळतंय का ? by संजय क्षीरसागर
In reply to कोणताही अंदाज कधीच १००% बरोबर by श्रीगुरुजी
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to >>>>>> by डँबिस००७
In reply to >>>>>> by डँबिस००७
In reply to बाकी काही असू दे. by बोका-ए-आझम
In reply to अगदी खरे सांगायचे तर by मृत्युन्जय
In reply to पण काहीही म्हणा , दोन महिने by प्रसाद गोडबोले
In reply to येस्स by आजानुकर्ण
विशेषतः डिजिटल पेमेंट करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे वगैरे योजनाहे तर खुपच हास्यास्पद होते. फोर्ब्ज का कोणत्या तरी नियतकालिकाने नोटाबंदीच्या निर्णयाची तुलना इंदिरा गांधी च्या काळातील सक्तीच्या नसबंदीशी केली . मलाही एकझ्यॅक्टली हीच उपमा सुचली होती . आपल्याकडे नाही का जाहिराती असतात की नसबंदी करा आणि १००० रुपये कमवा तशी काहीशी योजना =)))) (राष्ट्रवादी काँग्रेसला मत देत असलो तरीही) मी मोदींचा मोठ्ठा फॅन आहे पण हा नोटाबंद्दीचा निर्णय मात्र चुकला . चुकलाच !! पण असो , लोकांची देशभक्तीची नशा अजुन उतरली नाहीये , अजुन ३-४ महिने सेम परिस्थीती रहाणार आहे , तेव्हा बघु किती समर्थक इन्टर्टेन्मेंट देतात ते !
In reply to येस्स by आजानुकर्ण
In reply to जुगारीपणा व माणूस by चौकटराजा
In reply to याचं उत्तर ..... by रॉजरमूर
In reply to पण काहीही म्हणा , दोन महिने by प्रसाद गोडबोले
१००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा सिस्टिमॅटिकली बंद करायचा प्लॅन दिला असता कदाचित थोडाकाहीतरी फायदा झाला असताहा प्लॅन ऐकायला/वाचायला आवडेल. सर्व जण बोलतायत पण प्लॅन कोणी सांगत नाही. पूर्वसूचना देणे या योजनेत शक्यच नव्हते. बाकी पर्याय काय असतील तर ते वाचायला आवडतील. पूर्वसूचना दीली नसताना ही योजना फसली असे मानले तर पूर्वसूचना दीली असती तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.
In reply to १००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा by खटपट्या
In reply to सिम्पल प्लॅन : by प्रसाद गोडबोले
In reply to जर दरवर्षी पूर्वसूचना देउन by खटपट्या
In reply to Ok. by प्रसाद गोडबोले
In reply to It will be a forever by संदीप डांगे
In reply to "And therefore, it is by विशुमित
In reply to हे असं करता तुम्ही । by प्रसाद गोडबोले
In reply to "And therefore, it is by विशुमित
माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील भाषणातील ही वाक्य--ते राज्यसभेत जे काही बोलले त्याला बोलले म्हणण्यापेक्षा बरळले असे म्हणणे समर्पक होईल कारण त्यांच्या तब्बल ७ मिनिटांच्या भाषणात (नोटाबंदीच्या इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर त्यांना यापेक्षा जास्त बोलता आलं नाही) निव्वळ प्रक्षोभक आरोप (उदा. संघटीत लूट) याशिवाय काहीही नव्हतं. काँग्रेसचा एक निष्ठावान या भूमिकेतून बोलल्यावर यापेक्षा वेगळं ते काय बोलणार?
In reply to माजी पंतप्रधानाचे राज्यसभेतील by श्रीगुरुजी
In reply to बाकी काय बोलले हे थोड्या वेळ by विशुमित
In reply to माझे मत (या निर्णयाच्या by श्रीगुरुजी
In reply to सिम्पल प्लॅन : by प्रसाद गोडबोले
ब्यँका झोल करणार नाहीत असे उगाचच एक अॅझम्शन आहे सर्वांचे जे की ठाम ठाम चुक आहे ! प्रतिसाद द्याअसं कुणीही नाही म्हणणार .सध्याची परिस्थिती अशी आहे की ब्यांकाच खातेदारांच्या पैशावर दरोडे टाकत आहेत . आता रूढ अर्थाने दऱोडेखोरांची संख्या कमी झाल्याने ती कमी ह्या भरून काढत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लावून आणि पेनल्टी लावून . एक नंबरचे हरामखोर सगळे. त्यात एस बी आय आणि आय सी सी आय तर जास्तच ............खातेदारांना लुटायला आता पूर्वीसारखा राष्ट्रीयकृत ,खाजगी , कोऑपरेटिव्ह असा काही फरक नाही राहिला . आणि आताची नोटबंदी तर काय यांना जसं वन्स इन अ लाईफटाइम असा मौका मिळाल्याने कित्येक बँक अधिकाऱयांनी पुढच्या पिढीची देखील व्यवस्था करून ठेवली . भयानक झोल केले गेलेत ही वस्तुस्थिती आहे .
In reply to ते तर चोरच आहेत by रॉजरमूर
In reply to १००, ५० , २०, १०, ५ च्या नोटा by खटपट्या
. पूर्वसूचना देणे या योजनेत शक्यच नव्हते. बाकी पर्याय काय असतील तर ते वाचायला आवडतील.बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ५०० च्या जुन्या नोटा बाद करून ५०० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येतील असे जाहीर करून ५०० च्या नोटांचा पुरेसा पुरवठा होईल इतक्या नोटा आहे त्याच आकारात छापल्या असत्या व ८ नोव्हेंबरप्रमाणे अचानक ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली असती तर अगदी पहील्या दिवसापासून लोकांना चलन बदलून देता आले असते, एटीम मशिन कॅलिब्रेट करावी लागली नसती व आजच्यासारखी रोखीची टंचाई जाणवली नसती, आणि मुख्य म्हणजे २०००च्या नोटा छापायची आवश्यकताही भासली नसती व त्यावर होणारा खर्चही वाचला असता. बनावट नोटांना आळा घालणे, त्यावर पोसला जाणार्या दहशतवाद्यांची कोंडी करणे व देशातील काळा पैसा नष्ट करणे हा सरकारचा नोटाबंदीचा मुळ उद्देशही सफल झाला असता आणि तेही कुठलीही गुप्तता न पाळता. पूर्वसूचना दिल्यामूळे बनावट नोटा छापणार्यांनी १००० च्या बनावट नोटा अधिक छापल्या असत्या आणि काळा पैसा बाळगणार्यांनी तो ५००च्या चलनातील काळा पैसा १०००च्या चलनात ठेवला असता व आपसूक जाळ्यात अडकले असते. खरंतर सरकारने गुप्ततेची अट लादून घेतल्यामुळेच चांगल्या निर्णयाची परिणामकारक अंमलबाजावणी होऊ शकली नाही.
पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या नोटांचे) मार्कर्स काढुन त्या जागी नविन नोटांचे मार्कर्स एटीएम मध्ये टाकण्यासाठी कॅलिब्रेशन आवश्यकच होते.ओके. हे माहीत नव्हते. तसं असेल तर ५००च्या नवीन नोटांसाठी एटीमही अगोदर कॅलिब्रेट करता आली असती.
In reply to पुर्वीचे (५००/१०००च्या जुन्या by मार्मिक गोडसे
In reply to स्मृतीभ्रंशाचे शिरोमणी ! by जाबाली
In reply to सामान्य व्यक्तीचा साधी आणि सरळ प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला सामान्य व्यक्तीच्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to स्मृतीभ्रंशाचे शिरोमणी ! by जाबाली
In reply to असो चर्चा वाचून मजा येतेय by वरुण मोहिते
बाकी भाजप काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखी ह्यांना कमी वेळ मिळालाय त्यांना जास्त मिळालेला . पद्धती पण वेगळ्या आहेत दोन्ही पक्षांच्या .असे रागां पण म्हणत होते,कि नोटबंदी हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, पण वास्तवतः हे विधान अतिशय चुकीचे आहे, विरोधाला विरोध म्हणून काहीही निष्कर्ष काढणे गैर आहे. नोटबंदी आणि त्यानंतर उद्भवलेल्या समस्या हा अल्पअभ्यासाचा परिणाम आहे,सामान्यजणांना त्रास होतोय,आम्हालाही खूप मनस्ताप झाला,अजूनही राग येतो,पण त्यास भ्रष्टाचार असे म्हणता येणार नाही.
In reply to भाजप च्या तर मस्त पद्धती आहेत by वरुण मोहिते
In reply to भाजप च्या तर मस्त पद्धती आहेत by वरुण मोहिते
In reply to समजा तोटा झाला.. by चौकटराजा
कारण सर्वच माणसे स्वत: कर चुकवीत नसली तरी ज्याला आपण रोख पैसे देतो तो कर भरतोच याची आपण खात्री कधीच करू शकत नाही.पर्यायाने त्याला रोख देऊन आपण त्याच्या करबुडवे पणात आपला वाटा उचलतच असतो.
+१००
सामाजिक जाणीव म्हणजे आकाशातून पडलेले सोन्याने मढवलेले उत्तुंग असे काहीतरी नसते तर अश्याच छोट्या छोट्या गोष्टींची जाण असणे असते, हे तथाकथित, शिक्षित, समजदार आणि/किंवा विचारवंतांना समजणे कठीण का जाते, हे समजणे कठीण आहे ! :(In reply to समजा तोटा झाला.. by चौकटराजा
In reply to ... by babubobade
१. नोटाबंदीच्या काळात नव्या नोटा सापडल्याची कितीतरी प्रकरणे झाली. सामान्य माणसाला ४००० चे लिमिट असताना इतक्या थप्प्या ह्यांच्याकडे कशा आल्या ? ह्याचे उत्तर मिळाले नाही. ३. काळे किती सापडले ?जेवढ्या घोषणा केलेल्या जेवढी अपेक्षा ठेवलेली तेवढा काळा पैसा बाहेर आला नाही, डोंगर पोखरून मोदींनी उंदीर बाहेर काडला. जालावर याबाबत विविध अर्थतज्ज्ञांनी लिहलेले लेख वाचा, नोटबंदीचा शेती व्यवसाय, construction, इन्फॉर्मल सेक्टर यावरती भयंकर परिणाम झालाय, देशात २०१७ च्या पहिल्या चार महिन्यात १५ लाख जॉब गेलेत यावर नोटबंदीचा प्रभाव आहेच. मागील वर्षी पाऊस चांगला पडून सुद्धा शेतकरी कर्जमाफी मागू लागलेत याच कारण नोटबंदी मुळे पडलेले शेतमालाचे भाव (संदर्भ : लोकसत्ता आणि कुटुंबाचा अनुभव ). म्हणजे मोदी नि हा तडाखा राज्यांचा अर्थव्यवस्थेला दिलाय. अर्थात मोदी नि हा निर्णय घेताना अर्थतज्ज्ञानं फाट्यावर (अगदी अर्थमंत्रालयालाही) मारून हा निर्णय घेतल्याने, आज जे अर्थतज्ञ् यवरती लेख लिहतायत त्यांना मोदी आणि त्यांचे समर्थक काडीची हि किंमत देणार नाहीत हे स्पष्ट आहे.
२. सरकार अजून पैसेच मोजत आहे म्हणे.ते मोजतंच राहणार अनंत काळापर्यंत
४. अतिरेकी हल्ले थांबले का ?अजिबात नाही, काश्मीर मध्ये अतिरेकी बँका लुटाय लागले. मुळात किरेन रज्जू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार भारतात खोट्या नोटांचे प्रमाण ०. १% हि नव्हते. नाहीतर सरकारने आकडा जाहीर करावा किती खोट्या नोटा सापडल्या
५. कॅशलेस किती प्रमाणात वाढले ?कॅशलेस च वाढलेलं प्रमाण अगदी कमी आहे. तरीही कॅशलेस प्रमाण वाढावे म्हणू हा निर्णय घ्यायची गरज नव्हती. म्हणजे हे असे झाले कि मासे पकडायचे आहेत म्हणून तळ्यातील पाणी आठवायचे. जगात कोणत्याही देशाने काळा पैसा बाहेर यावा म्हणून किंवा डिजिटल transactions वाढावेत म्हणून असे तुघलकी निर्णय घेतले नाहीत. आता आपल्याला प्रश्न पडेल कि जगात इतर देश जे करतात ते पाहून आपण का करायचे, याच कारण ते देश विकसित आहेत मुक्त अर्थव्यवस्थेची पुढची पायरी त्यांनी गाठलेली आहे. त्यांच्याकडे विविध निर्णय अमलात आणायची आणि त्याचे परिणाम मोजायची यंत्रणा आहे, विविध तज्ञ् आहेत. आपल्याकडे यातील काहीच नसताना हा निर्णय घेण्यात आला आज देश त्याची फळे भोगतोय. नोटबंदीचे आज दोन प्रकारचेच समर्थक उरलेत १. जे पहिल्यांदा दिलेलं समर्थन लाजेखातर मागे घेऊ शकत नाहीत ते २. भाजपचे राजकीय समर्थक. या दोन कॅटॅगोरीतील लोक सोडल्यास नोटबंदीचे कोणीही समर्थक नाहीत. मुळात माझा स्वतःचा प्रवास खालील रित्या झाला नोटबंदी चांगला निर्णय >>>>हेतू चांगला पण अमलबजावणी चुकली >>>निर्णय च चुकीचा. (fullstop) सरकारने स्वतः गोलपोस्ट बदल्या, काळा पैसा बाहेर येणार >>>खोट्या नोटा बाद (हिंसक कारवाया बंद )>>>डिजिटल इकॉनॉमी. आता सरकार मौनात गेलय.
In reply to माझे मत by अमितदादा
In reply to सरकार तर गेलेच आहे मौनात, by अभ्या..
In reply to अगदी अगदी ! by अमितदादा
In reply to माझे मत by अमितदादा
घ्या तुम्ही असे काही लिहिणार