नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वाचने
103935
प्रतिक्रिया
582
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबरे !
In reply to हा धंद्याचा विषय आहे डॉक, bjp by संदीप डांगे
वाणी वजनात मारतो हे कोणी
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
विवक्षित वेळेत नोटा छापणे व
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
एक शंका: तुमचा कॅशलेसच्या
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
कॅशलेस इंडिया या विषयावर मी
In reply to एक शंका: तुमचा कॅशलेसच्या by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद! हो तुमचे इतर
In reply to कॅशलेस इंडिया या विषयावर मी by संदीप डांगे
>>कॅशलेस असणे म्हणजे करचोरी व
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद! हो तुमचे इतर
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by हतोळकरांचा प्रसाद
ते कोण लिहिताय काय लिहिताय
In reply to धन्यवाद! हो तुमचे इतर by संदीप डांगे
कॅशलेसची जबरदस्ती.
In reply to ते कोण लिहिताय काय लिहिताय by हतोळकरांचा प्रसाद
आपल्याला असहमतीवर सहमती करावी
In reply to कॅशलेसची जबरदस्ती. by संदीप डांगे
विवक्षित वेळेत नोटा छापणे व
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
एक जाट होता.
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
:) :))
In reply to कॅश कमी आहे म्हणून कॅशलेस by हतोळकरांचा प्रसाद
कॅशलेसच्या दिशेने पहिलं पाऊल आणि काळ्यापैशावर 'सर्जीकल'
In reply to :) :)) by संदीप डांगे
आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा
In reply to :) :)) by संदीप डांगे
आधीचा प्रचार हा कन्विनियन्स
In reply to आरबीआय तीन शिफ्टमध्ये नोटा by हतोळकरांचा प्रसाद
ते कसं काय? म्हणजे ५०
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
यगझॅकटली
In reply to आधीचा प्रचार हा कन्विनियन्स by संदीप डांगे
>>8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
एक तर तुम्ही खरोखर महान आहात,
In reply to 8 तारखेअधि कॅशलेस चा मुद्दा by संदीप डांगे
चला, एक एक मुद्दा घेतो
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
पण गेल्या दोन वर्षात कॅशलेस
In reply to चला, एक एक मुद्दा घेतो by संदीप डांगे
तोच मुद्दा होता डॉक, आधीही
In reply to पण गेल्या दोन वर्षात कॅशलेस by सुबोध खरे
असे असेल तर अशा पानवाले ,
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by सुबोध खरे
No tax on agriculture income:
In reply to असे असेल तर अशा पानवाले , by अभिजित - १
No tax on agriculture income: Arun Jaitleyयाचा अर्थ, "बिगरशेती उत्पन्न, खोटेपणाने शेतीचे आहे असे दाखवून, कर चुकवणार्यांना पकडण्यासाठी काहीच उपाय केले जाणार नाहीत" असा होत नाही. बघुया, भविष्यात काय बघायला दिसते ते :)इतकी खात्री आहे ? बघू या
In reply to No tax on agriculture income: by डॉ सुहास म्हात्रे
नोटा रद्द होतील कोणी हे ८
In reply to इतकी खात्री आहे ? बघू या by अभिजित - १
अजून भुजबळ ना पण काही शिक्षा
In reply to नोटा रद्द होतील कोणी हे ८ by डॉ सुहास म्हात्रे
मी इथे लिहिले होती की नाही हे
In reply to विवक्षित वेळेत नोटा छापणे व by संदीप डांगे
मलाही शिवमुद्रा वापरून
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
क्रेडित पॉईंट म्हणजे क्रेडिट
In reply to वाणी वजनात मारतो हे कोणी by जयंत कुलकर्णी
Appa
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
पेट्रोल पंप
In reply to पेट्रोल वर मला जवळजवळ ३ % by गंम्बा
~२% सरचार्ज सर्वच ट्रांझेक्शन्सवर असतो.
In reply to थोडा काळ जावा लागेल by ट्रेड मार्क
२%
योग्य विषयावर चर्चा सुरु केलीयत
मला वाटत की रुपे नी आपलं नेटवर्क वाढवायला पाहीजे.
In reply to योग्य विषयावर चर्चा सुरु केलीयत by रघुनाथ.केरकर
कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल
Rupay बद्दल इथे कुणी बोलत का
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay
In reply to Rupay बद्दल इथे कुणी बोलत का by मराठी कथालेखक
सहमत.
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
सर्व नवीन आणि जनधन खाते धारकांना सध्या फक्त RuPay कार्डच मिळते.
In reply to सर्व नॅशनलाईज्ड बँकानी Rupay by मराठी कथालेखक
ते उत्तम आहे
In reply to कदाचित हा दुवा काही मदत करू शकेल by मोग्याम्बो
Government to facilitate Aadhar based transactions through mobil
पीन लेस?
In reply to Government to facilitate Aadhar based transactions through mobil by डँबिस००७
Fingerprint based
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
ऊप्स, नाही.
In reply to पीन लेस? by अनिरुद्ध.वैद्य
एकदा jio कार्ड घेऊन बघा
In reply to ऊप्स, नाही. by अनिरुद्ध.वैद्य
२ टक्क्यावर चर्चा चालली आहे.
कार्डाद्बारे बाजारातील
ठाणे जनता सहकारी बँकेने मला
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
(या बँकेच्या बी-केबिन रोडच्या
In reply to ठाणे जनता सहकारी बँकेने मला by नितिन थत्ते
(या बँकेच्या बी-केबिन रोडच्या शाखेत डॉ हेडगेवार यांचा मोठा फोटो होता असे स्मरते. आता आहे की नाही ते ठाऊक नाही.)या महितीचा इथे काय संबंध आहे..?म्हणजे ही संघाची बँक आहे
In reply to (या बँकेच्या बी-केबिन रोडच्या by मोदक
हो. हेच सांगायचे होते.
In reply to म्हणजे ही संघाची बँक आहे by अप्पा जोगळेकर
सुरक्षितता सर्व माहिती
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
खरच की
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
टेबलच्या टीडी टॅगमधे टाईप
In reply to सुरक्षितता सर्व माहिती by आनन्दा
तुम्हाला अपेक्षित असलेला बदल
In reply to टेबलच्या टीडी टॅगमधे टाईप by शाम भागवत
धन्यवाद. _/\_
In reply to तुम्हाला अपेक्षित असलेला बदल by संपादक मंडळ
माहीती
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
मी सध्या रुपय कार्ड वापरतो
In reply to माहीती by अनिरुद्ध.वैद्य
विसा, मास्टर व रुपे
In reply to कार्डाद्बारे बाजारातील by शाम भागवत
रुपेला स्विकृती कितपत आहे?
In reply to विसा, मास्टर व रुपे by सर्वसाक्षी
RBI चे २०१३ मधले नोटिफिकेशन
या आदेशात डेबिट कार्डावर २%
In reply to RBI चे २०१३ मधले नोटिफिकेशन by अमर विश्वास
दीड-दोन लाखाच्या पुढची खरेदी
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
२% का?
In reply to या आदेशात डेबिट कार्डावर २% by सुबोध खरे
Rupay ची कार्डे चालतात का
.
In reply to Rupay ची कार्डे चालतात का by llपुण्याचे पेशवेll
हा २% व्यापारी कधीच आपल्या
आपल्याकडे ग्राहकांना आपल्या
http://www.rediff.com
>>>>मोदी सरकाराचा
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
आता या १४ लाख कोटीवर हे काळा
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
त्यातील पण १३ हजार कोटी जाहीर
In reply to http://www.rediff.com by अभिजित - १
काळे चलन
बुडत्याला दर्भाचाही दंभ असेल
In reply to काळे चलन by राही
?
In reply to काळे चलन by राही
बातमीत म्हटलंय, अडिच लाख कोटी
In reply to ? by अनुप ढेरे
तुम्ही या योजनेचे विरोधक आहात
In reply to बातमीत म्हटलंय, अडिच लाख कोटी by संदीप डांगे
लै अपेक्षा ब्वा तुमच्या.
In reply to तुम्ही या योजनेचे विरोधक आहात by हतोळकरांचा प्रसाद
लागट प्रतिसाद.
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
?
In reply to लै अपेक्षा ब्वा तुमच्या. by मोदक
चर्चाविषयाबद्दल सहमत.
In reply to ? by संजय क्षीरसागर
स्वचा शोध?
In reply to चर्चाविषयाबद्दल सहमत. by मोदक
हो सर, काय करणार... सुधारणा
In reply to स्वचा शोध? by संजय क्षीरसागर
थोडी गल्लत
In reply to ? by अनुप ढेरे
परत न येणारी रक्कम जर १ लाख
In reply to थोडी गल्लत by राही
प्रत्यक्ष खर्च
In reply to परत न येणारी रक्कम जर १ लाख by अनुप ढेरे
त्या नोटा जमा झाल्या ह्याचा
In reply to काळे चलन by राही
म्हणजे???
In reply to त्या नोटा जमा झाल्या ह्याचा by श्री गावसेना प्रमुख
नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते
In reply to म्हणजे??? by संदीप डांगे
असंही असेल.
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
केला असेल आणि त्या विचाराचा
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
>>>**बिकॉज एव्हरी ऑफिसर विल
In reply to केला असेल आणि त्या विचाराचा by नितिन थत्ते
जणरली इथल्या पब्लिकला पटतील
In reply to >>>**बिकॉज एव्हरी ऑफिसर विल by मोदक
http://maharashtratimes
In reply to असंही असेल. by संदीप डांगे
+१
In reply to http://maharashtratimes by श्री गावसेना प्रमुख
नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by नितिन थत्ते
आयकर विभागाकडे 50,000+
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
सरकारकडे तेवढं मणुष्यबळ आहे
In reply to नोटा जमा झाल्या याचा अर्थ ते by मार्मिक गोडसे
डॉक्टर खरे याना हि पेटीम ने
सोला आणं सच !
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
मी का म्हणून १ GB चा डेटा प्लॅन घेऊ ?
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
बॅंकेच्या व्यवहारासाठी वेगळा
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
..........
In reply to डॉक्टर खरे याना हि पेटीम ने by अभिजित - १
सरकार काही ह्यांच्या गळ्याला
?
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
कायप्पा, चेपु फुकट आहे?
In reply to ? by संजय क्षीरसागर
WhatsApp , फेसबुक ची जबरदस्ती
In reply to कायप्पा, चेपु फुकट आहे? by आनन्दा
संजयराव नेट फुकट असते असे मि
In reply to ? by संजय क्षीरसागर
सेनापती
In reply to संजयराव नेट फुकट असते असे मि by श्री गावसेना प्रमुख
ग्रामिण भागात चक्कर मारुन
In reply to सरकार काही ह्यांच्या गळ्याला by श्री गावसेना प्रमुख
गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी
In reply to ग्रामिण भागात चक्कर मारुन by आनंदी गोपाळ
त्याच्याकडून अशा बर्याच
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
इतर विषय इथे कशाला जोडतांय ?
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
मास्तुरे,
In reply to त्याच्याकडून अशा बर्याच by श्रीगुरुजी
ओ ठणठणगोपाळ (का यडपटगोपाळ
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
मी प्रिज्युडीस असल्याचे
In reply to मास्तुरे, by आनंदी गोपाळ
उघडे पडल्यामुळे गोपाळराव या
In reply to मी प्रिज्युडीस असल्याचे by मोदक
गासे साहेब,
In reply to गोपाळराव डिजीटल पेमेंट साठी by श्री गावसेना प्रमुख
आय मीण नेटपॅक नसताना जमतं का
In reply to गासे साहेब, by आनंदी गोपाळ
मी गेले तीनेक वर्षे बँकेचे
नक्की चवकशी करा आणि कळवा
In reply to मी गेले तीनेक वर्षे बँकेचे by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक वेळी बँकेचा आलेला
In reply to नक्की चवकशी करा आणि कळवा by संजय क्षीरसागर
प्रत्येक वेळी बँकेचा आलेला एसएमएस आणि इमेल सवईने मी ताडून पाहतो. आजतागायत एकदाही कोणत्याही प्रकारचा चार्ज कापून गेलेला माझ्या बघण्यात नाही. एमेलने येणार्या महिन्याच्या बँक स्टेटमेंटमध्येही त्यासंबंधी काही चार्ज नजरेत आलेला नाही.हे वरच लिहिले आहे, चार्जेस लागत नाहीत याची अजून चवकशी करायची गरजच नाही. "बँकेने नवीन डेबिट कार्ड दिले पण ते या कारवाईमुळे झालेल्या गर्दीमुळे अॅक्टीवेट करायचे राहिले आहे" असे सद्याच्या चर्चेत मिपावरच कोठेतरी लिहिले होते. त्यावेळेस त्या कार्डाने, "माझ्या बँकेव्यतिरिक्त इतर मोठ्या बँकांच्या एटीएममधूनही नकद काढली तरी काहीही चार्जेस लागणार नाहीत हा अधिक फायदा मिळेल" हे कार्ड बदलण्याचे कारण बँकेने दिले होते. याचा अर्थ बँकांच्या अश्या काही स्कीम्स असतात असाच होतो. आता फक्त ब्रँच मॅनेजरला अशी काही स्कीम माझ्या कार्डाला लागू आहे का, हे विचारायचे बाकी आहे. या चर्चेपर्यंत सर्वच व्यवहारात असे होते असा माझा समज होता. कारण, परदेशात माझ्या डेबिट व केडीट कार्डांना कोणतेच चार्जेस लागत नव्हते. क्रेडिट कार्डाच्या खर्चाला तर विनाव्याज ९० दिवसांची मुदत होती, आणि ती खात्यातून आपोआप वळती व्हावी असा पर्याय होता. त्यामुळे खात्यात ९०व्या दिवशी आवश्यक रक्कम असल्यास कोणतेही व्याज*/चार्ज लागत नव्हता. =============== * ९० दिवसांची सूट इतकी जास्त होती की कधीच व्याज भरावे लागले नाही. पण त्या मुदतीनंतर मात्र व्याजाचा/चार्जचा दर लक्षणिय होता.मी गेली दहा वर्ष तरी कार्ड वापरत असेन
In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
एक राहीलं
In reply to मी गेली दहा वर्ष तरी कार्ड वापरत असेन by संजय क्षीरसागर
तुम्ही डोक्यावर पडले आहत असे
In reply to एक राहीलं by संजय क्षीरसागर
प्लीज़
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
.
In reply to तुम्ही डोक्यावर पडले आहत असे by निओ१
या गर्दीच्या काळात बँक
In reply to प्रत्येक वेळी बँकेचा आलेला by डॉ सुहास म्हात्रे
अप्पा,
In reply to या गर्दीच्या काळात बँक by डॉ सुहास म्हात्रे
@ आनंदी गोपाळ व संजय
In reply to अप्पा, by आनंदी गोपाळ
प्रत्येक बँकेचे अकाऊंटचे वेगवेगळे नियम असू शकतात आणि एकाच बँकेतही अकाऊंटचे वेगवेगळे प्रकार असू शकतात.
प्रत्येकाने आपल्या बँकेत आणि इतर बँकांत चौकशी करून आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेल्या बँकेतला आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर असलेला अकाऊंट स्विकारावा.
याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही,
In reply to @ आनंदी गोपाळ व संजय by डॉ सुहास म्हात्रे
चित्रात दिलेले चार्जेस केवळ
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
तर `हिडन आहेत' असा होतो. आणि
In reply to याचा अर्थ, चार्जेस नाहीत असा नाही, by संजय क्षीरसागर
तर `हिडन आहेत' असा होतो. आणि नेमका मुद्दा तोच तर आहे.अन्यथा त्या फायद्यासाठी सद्या, मी जे काही करत आहे त्यापेक्षा एका पैश्याचीही जास्त तोशीस पडावी अशी एकही कृती करावी लागत नसल्याने, तुमचा मुद्दा... जाउंदे... उगाच विनाफायद्याची चर्चा पुढे चालू ठेवण्यात अजिबात रस नाही. त्याविरुद्ध, तुमच्या सारख्या तज्ज्ञाने तुमचे "हिडन आहेत" म्हणजे नक्की काय आहे, हे पुराव्याने सिद्ध केले तर बरे होईल. त्यामुळे मला वेगळा जास्त चांगला अकाऊण्ट पर्याय निवडण्यास मदत झाली तर तुम्हाला जरूर धन्यवाद देईन.मला मुद्दा सिद्ध करायची गरजच नाही, आणि
In reply to तर `हिडन आहेत' असा होतो. आणि by डॉ सुहास म्हात्रे
सुहासजी,
In reply to मला मुद्दा सिद्ध करायची गरजच नाही, आणि by संजय क्षीरसागर
अहो साहेब, मी अनेकदा लिहीले
In reply to सुहासजी, by संजय क्षीरसागर
तुमचे विचार व चर्चेची पद्धत
In reply to अहो साहेब, मी अनेकदा लिहीले by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे विचार व चर्चेची पद्धत तुमच्याकडे व माझी माझ्याकडे.याबाबत जरा थोडेसे... या सर्व जगाचे सर्व ज्ञान माझ्याकडे नाही, अशी माझी पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे, चर्चा करताना, माझा मुद्दा जिंकण्यापेक्षा, सत्य बाहेर येणे व त्यामुळे माझ्या ज्ञानात खरी भर पडणे, हे मला जास्त महत्वाचे वाटते.तुम्हाला चार्जेस पडत नाहीत
In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला चार्जेस पडत नाहीत
In reply to तुमचे विचार व चर्चेची पद्धत by डॉ सुहास म्हात्रे
या सगळ्या करिताच मी सतत
In reply to तुम्हाला चार्जेस पडत नाहीत by संजय क्षीरसागर
मी सांगतो याच्यावर , सामान्य माणूस म्हणून
In reply to या सगळ्या करिताच मी सतत by डॉ सुहास म्हात्रे
आणि तो महागात पडत असेल तर तो
In reply to मी सांगतो याच्यावर , सामान्य माणूस म्हणून by अभिजित - १
आणि तो महागात पडत असेल तर तो नाकारण्याचा जनतेला हक्क आहे .हे कोणी नाकारल्याचा शोध कसा काय लावला ? असे "नसलेली मोहरी तयार करून तिचा पर्वत बनवण्याचा प्रयत्न करणे" अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरीतच, चांगल्या चर्चेला असे काल्पनिक (पक्षी :राजकिय) फाटे फोडण्याने काय साधले जाते हे भारतिय राजकारणात गुप्त नाही. याशिवाय, मी कधी म्हटले आहे की मी ज्याबद्दल लिहिले आहे अस्स अकाऊंट सगळ्यांनी काढावा ?! माझ्या अंदाजाप्रमाणे त्यातली बेसिक शिल्ल्क (जी तशीही फार मोठी आहे असे नाही) मिपावरच्या बर्याच जणांच्या खात्यात पडून असावी. माझ्या माहितीतल्या बर्याच जणांच्या खात्यात असते. हे सर्व असले तरीही, स्वतः माहिती घेऊन ज्याना पसंत आहे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेच मी पहिल्यापसून म्हणत आहे, नाही का ? तर मग अशी काहींना (किंबहुना बर्याच जणांना) फायदा होणार असणारी माहिती मिपावर देणे चांगले नाही का ? त्यालाही आक्षेप असला तर कमाल आहे !!!म्हात्रेजी
In reply to आणि तो महागात पडत असेल तर तो by डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
In reply to म्हात्रेजी by संजय क्षीरसागर