मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतता

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ----- परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली ---- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फार जीवघेणी असते नाही? ------ किनार्‍यावर एकटचं भटकतांना 'तो' खडक दिसला पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली तासन् तास त्या खडकावर सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं आता कां कोण जाणे 'तो' खडक खुपच ओबडधोबड वाटला बेढब दिसला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ---- शेवटी काय पाऊस जाण्यासाठीच येतो जीवघेणी शांतता तेवढी राहते सोबतीला --- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०८/२०१६)

वाचने 5386 वाचनखूण प्रतिक्रिया 32

निखिल निरगुडे 08/08/2016 - 05:30
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही...... अगदी! आणि मनाला हुरहूर लागलेली असताना न कोसळणाऱ्या पावसाची शांतता सुद्धा!

In reply to by निखिल निरगुडे

नीलमोहर 08/08/2016 - 15:05
कोसळेस्तोवर तुडुंब भरलेलं आभाळ असतं आणि पाण्याचा एक टिपूसही पडत नाही, तेव्हा जीव नकोसा होतो. अप्रतिम कविता..

चाणक्य 08/08/2016 - 06:39
सुरेख जमलीये. कासावीस करणारी रचना.

गवि 08/08/2016 - 07:03
वाह..

एक एकटा एकटाच 08/08/2016 - 07:26
Class

ज्ञानोबाचे पैजार 08/08/2016 - 09:35
फार दिवस वाट पहायला लावलीस. पण त्या प्रतिक्षेचे चिज झाले ही कविता वाचून. तू लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू पैजारबुवा,

अभ्या.. 08/08/2016 - 10:14
अह्हाहाहा, मिका, बरसत रहा. शांतता नकोसी असते खरेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/08/2016 - 11:14
आवडली कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

मृत्युन्जय 10/08/2016 - 11:21
मी कविता सहसा वाचत नाही. एकतर फारस्या कळत नाहित आणि कळाल्याच तर खुप नाटकी वाटतात. पण मिकाच्या कविता मात्र सहसा चुकवत नाही. एक नंबर जमली आहे ही कविता पण. बाबारे मिका कधी भेटलो तर तुझ्या सह्या घेउन ठेवीन म्हणतो. मोठा कवी झाल्यावर लोकांना दाखवता येतील.

In reply to by मृत्युन्जय

मिसळलेला काव्यप्रेमी 10/08/2016 - 11:57
सही?? सहीचा जमाना गेला, आता आपण सेल्फी काढू, ;) आणि मोठा कवी होण्याच नंतर बघू पण मी आताच अभिमानाने दाखवीन लोकांना. बघा हे आमचे मित्र.

विप्लव 10/08/2016 - 11:50
परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली
आई ग कसलं दर्दी