शांतता
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
-----
परवा तू अचानक आलीस
दारात तुला पाहुन चमकलो
मग सुखावलो
येतांना तू आणलेला मोगरा
सगळं घर व्यापून उरला
गजरा करायला घेतला
तुझ्या केसात माळतांना
अवचित एक गाठ सुटली
गजरा विखुरला, अन्
एकदम जाग आली
----
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फार जीवघेणी असते नाही?
------
किनार्यावर एकटचं भटकतांना
'तो' खडक दिसला
पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली
तासन् तास त्या खडकावर
सुख म्हणजे कायं? ते अनुभवलं
आता कां कोण जाणे
'तो' खडक खुपच
ओबडधोबड वाटला
बेढब दिसला
---
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
----
शेवटी काय
पाऊस जाण्यासाठीच येतो
जीवघेणी शांतता
तेवढी राहते सोबतीला
---
कोसळून गेलेल्या
पावसानंतरची शांतता
फारच जीवघेणी असते नाही?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०८/२०१६)
वाचने
5386
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
भारी
सुरेख!
सुंदर!
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही...... अगदी!
आणि मनाला हुरहूर लागलेली असताना न कोसळणाऱ्या पावसाची शांतता सुद्धा!
In reply to अहाहा!! by निखिल निरगुडे
कोसळेस्तोवर तुडुंब भरलेलं आभाळ असतं आणि पाण्याचा एक टिपूसही पडत नाही,
तेव्हा जीव नकोसा होतो.
अप्रतिम कविता..
सुरेख जमलीये. कासावीस करणारी रचना.
मस्स्स्स्स्स्त
वाह..
एक नंबर
Class
अप्रतिम रे
फार दिवस वाट पहायला लावलीस.
पण त्या प्रतिक्षेचे चिज झाले ही कविता वाचून.
तू लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू
पैजारबुवा,
अह्हाहाहा,
मिका, बरसत रहा.
शांतता नकोसी असते खरेच.
In reply to अह्हाहाहा, by अभ्या..
हेच बोल्तो.
अ प्र तिम कविता मिका!!!
सुंदर!!
सुंदर
सुंदर..
अप्रतिम!!
अरे खास च कविता मि का भाऊ.
In reply to अरे खास च कविता मि का भाऊ. by उडन खटोला
याला म्हणतात ट्च मिकाचा आणि टचीही मिकाचीच कवीता...
खडकासारखा ओबड धोबड नाखु
खूप छान
जीवघेणं लिहितोस.
आवडली कविता. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
अगदी नेमके !!
मी कविता सहसा वाचत नाही. एकतर फारस्या कळत नाहित आणि कळाल्याच तर खुप नाटकी वाटतात. पण मिकाच्या कविता मात्र सहसा चुकवत नाही. एक नंबर जमली आहे ही कविता पण. बाबारे मिका कधी भेटलो तर तुझ्या सह्या घेउन ठेवीन म्हणतो. मोठा कवी झाल्यावर लोकांना दाखवता येतील.
In reply to मी कविता सहसा वाचत नाही. एकतर by मृत्युन्जय
सही?? सहीचा जमाना गेला, आता आपण सेल्फी काढू, ;) आणि मोठा कवी होण्याच नंतर बघू पण मी आताच अभिमानाने दाखवीन लोकांना. बघा हे आमचे मित्र.
अहा!
दंडवत!
परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आलीआई ग कसलं दर्दी
मि.का ३वार _/\_... जब्बर्दस्त..
खूप सुंदर
भारी