काटा वजनाचा --५
लेखनप्रकार
काटा वजनाचा --४
मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते? adipostat म्हणजे काय आणि
वजन थोडे कमी होऊन परत का वाढते?
यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते.
आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात. हि ग्लुकोज तुम्हाला अन्नातून थेट मिळते किंवा इतर पिष्टमय पदार्थांचे( रवा मैदा आटा तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा रताळे इ) विघटन करून अथवा चरबी पासून तयार करून मिळवता येते. तुम्ही खाल्लेल्या अन्नातील अतिरिक्त ग्लुकोज/ किंवा पिष्टमय पदार्थ हे यकृतात ग्लायकोजन या स्वरुपात साठवले जातात. ग्लायकोजन हे ग्लुकोज चे polymer आहे म्हणजे शेकडो ग्लुकॊज चे रेणू एकत्र बांधून त्याची साखळी केली जाते आणि हे घट्ट स्वरुपात थोड्या जागेत (tightly packed) साठवले जाते. आपल्या यकृतात साधारणपणे ५-६ तास पुरेल इतकी ग्लुकोज ग्लायकोजन या स्वरुपात साठवली जाते.म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले नाहीत तर तुमच्या शरीरातील ग्लुकोज/ग्लायकोजन हे सहा तासांत संपून जाईल.आणी यामुळे आपल्याला या कालावधी नंतर "भूक" लागते. यानंतरहि आपण काही खाल्ले नाही तर आपल्या शरीरात चरबीचे रुपांतर ग्लुकोज मध्ये व्हायला सुरुवात होते आणि आपली चरबी कमी होऊ लागते. हीच प्रक्रिया जेंव्हा आपण व्यायाम करतो तेंव्हा जोरात व्हायला लागते. साखर, ग्लुकोज हे पदार्थ पटकन शरीरात शोषले जातात( म्हणूनच खेळाडूना त्वरित उर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज दिली जाते). त्या मानाने स्टार्च किंवा इतर गुंतागुंतीचे पिष्टमय पदार्थ त्यांचे विघटन करायला वेळ लागत असल्याने हळूहळू शोषले जातात. त्याशिवाय त्यात असणारे तंतुमय पदार्थ (फायबर्स)किंवा चोथा या पदार्थांचे शोषण लांबवतात.
यामुळेच केक बिस्किटे शीतपेये वेफर्स यासारखे प्रक्रिया करून त्यातील चोथा काढून टाकल्याने पदार्थ फार पटकन शोषले जातात आणि त्यामुळे लठ्ठ्पणाला आमंत्रण मिळते. हे "प्रक्रिया करून चोथा काढून टाकलेले" असे अन्न पदार्थ आहेत ज्याने वजन पटकन वाढते
आपण खातो त्या अन्नात चरबी आणि पिष्टमय पदार्थ हे दोन घटक आहेत ज्यापासून मुख्यत्वे आपल्याला कॅलरिज मिळतात. परंतु या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर त्यातील पिष्टमय पदार्थ हे उर्जा मिळवण्यासाठी "प्रथम" वापरले जातात आणि चरबी हि तुमच्या शरीरातील ग्लुकोज संपली कि मग वापरली जाते. म्हणजे काय होते? आपण उपाशी पोटी एक छान क्रीम असलेला केक खाल्ला कि त्यातील पिष्टमय पदार्थाचा वापर शरीराला कॅलरी मिळवण्यासाठी चालू होतो आणि त्यावर असलेली मलई( साय/क्रीम) किंवा चरबी युक्त पदार्थ हे सरळ आपल्या शरीराच्या चरबीच्या पेशींकडे जातात. जोवर केक मधील पिष्ट्मय पदार्थ पूर्ण वापरले जात नाहीत तोवर त्यातील चरबीचा वापर होणार नाही. पुढचे बरेच दिवस उपास घडेल या हिशेबाने ती चरबी आपल्या शरीरात साठवली जाते.
हा तुमच्या शरीरातील गुणसूत्रे आणि जनुकानी शतकानुशतके अन्नाच्या दुर्भिक्ष्याने शिकलेला धडा आहे तो असा एक दोन पिढ्यात जाणार नाही.
दुर्दैवाने असा उपास १९७० नंतर (हरित क्रांती) आपल्या देशात फारच कमी लोकांना घडतो. ( आणी ज्यांना घडतो उदा. आदिवासी. त्यांना लठ्ठपणा म्हणजे काय ते माहितीही नसते.). अशा दुर्भिक्षामुळे आपली संस्कृती काय झाली आहे कि तुमच्या घरी कोणी येणार असेल तर त्याला सुग्रास चमचमीत खाऊ घालणे. किंवा तुम्ही कुणाकडे जाणार असणार तर तेथे भेट म्हणून मिष्टान्न घेऊन जाणे.
कोणत्याही साध्या किंवा ओल्या पार्टी मध्ये येणारे खाद्य पदार्थ काय असतात ते पहा- वेफर्स, तळलेले दाणे किंवा काजू, चीज येथपासून पनीर /चिकन टिक्का, मटण कबाब, luncheon meat.
कोणत्याही लग्नाच्या जेवणात काय असते तेही पहा, पनीर बटर मसाला, चिकन माखनवाला,व्हेज तवा, चिकन हंडी याबरोबर बटर रोटी किंवा नान चार पाच फरसाण पदार्थ( कॉर्न कबाब, भजी,दाल वडा, चीज सामोसा) शेवटी दाल माखनी किंवा दाल तडका आणि जीरा फ्राईड राइस. सरते शेवटी तीन ते पाच मिष्टान्ने( रसमलाई, तुपातील गाजर हलवा, आइस क्रीम, शाही टुकडा,मलईयुक्त मालपुवा).
यावर अजुन होणारा आग्रह इ.तर मी बोलतच नाही.
यातील बहुसंख्य पदार्थ high Glyacemic index असलेले आहेत. म्हणजे काय? तुम्ही ते पदार्थ खाल्ले कि तुमच्या शरीरातील ग्लुकोज फार झपाट्याने वाढते. आता हि एकदम वाढलेली ग्लुकोज कमी करण्यासाठी तुमचे स्वादुपिंड इन्स्युलीन तयार करते ज्याने या ग्लुकोजचे रुपांतर ग्लायकोजन मध्ये होते आणि उरलेल्या ग्लुकोजचे रुपांतर लगेच चरबी मध्ये होते.
असे "एक भरपेट" जेवण तुम्ही करत असलेल्या दहा दिवसांच्या(DIET) मिताहाराच्या इतके असते. म्हणूनच बरेच लोक महिनोन महिने "डाएट" करत असतात तरीही त्यांचे वजन काही कमी होत नाही. कारण मी दहा दिवस डाएट केला आता एक दिवस तरी मला "पोटभर खाऊ दे" असे ते स्वतःला( आणि इतरांना) सांगत असतात
त्यातून तुम्ही लोक कसे ताट भरून घेततात ते पहा. रोटी, चिकन, पनीर, भाज्या फरसाण यांनी ताट पूर्ण भरून जाईल असे एकदाच घेतात (परत परत उठायला नको म्हणून) आणी मग तब्येतीत जेवत राहतात. त्यात मग कबाब, समोसा वगैरे आवडले तर ते अजून घेऊन यायचे आणि शेवटी परत एक डिश भरून गाजर हलवा, रसमलाई आईस्क्रीम वगैरेने पोट "भरून" घेतात.
आता यावर सर्वसाधारण उत्तर हेच असते कि डॉक्तर, "म्हणजे आम्ही लग्नात जेवायचेच नाही का?" याचे उत्तर असे आहे.
पहिल्यांदा आपले ताट छान पैकी सलाडने भरून घ्या त्यावर मीठ लिंबू चाट मसाला टाकून ते खाऊन घ्या. शिवाय बहुसंख्य लठ्ठ माणसांचे पोट "भरल्या"शिवाय समाधानच होत नाही. त्यामुळे एक पेला ताक पिऊन घ्या. या सर्व गोष्टीनी आपले पोट भरल्याची संवेदना होते.
यानंतर आपल्याला कोणते पदार्थ "हवे" आहेत ते ठरवा. केवळ समोर आहेत म्हणून खाणे बरोबर नाही.केवळ समोर आहे म्हणून बटाट्याची भाजी किंवा अळवाचं फतफतं पानात घेण्याला काय अर्थ आहे? मग असे हवेत ते पदार्थ निवडूनच ताटात घ्यावेत आणि चवीने खावेत . केवळ पोट भरण्यासाठी मैद्याचे नान किंवा भात खाल्ला तर लगेचच तो आपल्या चरबीला भेटायला जाईल.
स्वामी चिन्मयानंदानी सांगितलेला एक किस्सा मला इथे उद्धृत करावासा वाटतो.--
एक माणूस आपल्या मित्राच्या लग्नाला जातो. तेथे तो चाळीस गुलाब जाम खातो. आणि त्यामुळे त्याला कसंसंच व्हायला लागतं. यावर त्याचा दुसरा मित्र म्हणाला कि अरे तुला इतका त्रास होत आहे तर घशात दोन बोटे घालून तू उलटी का करून टाकत नाहीस त्याने तुला बरे वाटेल. यावर हे महाशय म्हणाले अरे जर "दोन बोटं" घालायला जागा असती तर अजून दोन गुलाब जाम नसते का खाल्ले?
तात्पर्य -- पोट फुटेस्तोवर खाण्यात काय अर्थ आहे?
जीवनात खाणे हा एकच आनंद नाही. उत्तम संगीत, उत्तम मित्र, उत्तम पुस्तके, उत्तम साथीदार असे अनेक आनंद असताना माणसे मात्र फक्त "खाण्यात" आनंद शोधात असल्याने ते "अंगावर" चढणारच.
क्रमशः
वाचने
30049
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
Uttam!!
पुभाप्र!
डॉक... या विषयावरचा हा धागा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANG BANGबाहेर सलाड खायची....
डॉक, प्रोटीन फॅट्स फायबर्स
तोंडाला पाणी सुटले
In reply to तोंडाला पाणी सुटले by अगम्य
+१
व्यायामाची सवय नसल्यास उर्जा
गोळी
लेख आवडला
खूप क्लिष्ट माहिती
थियरी सोपी
उत्तम लेख.......एक शंका
In reply to उत्तम लेख.......एक शंका by तिरकीट
दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन
In reply to दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन by सुबोध खरे
कोण आहारतज्ञ
In reply to कोण आहारतज्ञ by मन१
आपले म्हणणे मान्य आहे.
In reply to दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन by सुबोध खरे
माझ्या माहीतीत तरी त्या आहार तज्ञांकडूनच उपचार घेत आहेत.....पण
In reply to उत्तम लेख.......एक शंका by तिरकीट
हे आयुर्वेदिक उपचार नव्हेतच
छान लेख.पुभाप्र
डॉक, म्हणजे थोडक्यात
In reply to डॉक, म्हणजे थोडक्यात by पिलीयन रायडर
व्यायाम केल्याशिवाय चरबी
In reply to व्यायाम केल्याशिवाय चरबी by सुबोध खरे
अच्छा म्हणजे कमी खा, पण जे
In reply to अच्छा म्हणजे कमी खा, पण जे by पिलीयन रायडर
बरोबर
सुप्पक धागा! पसरवतोय.
उत्तम
इअतर
वाचतोय. बाकी कितीही खा आम्ही
सुंदर लेखमाला… खुप खुप
भारी!! आधीच्या चार लेखांच्या
In reply to भारी!! आधीच्या चार लेखांच्या by सूड
भारी!!
In reply to भारी!! by स्पा
आहे ते आहे. जिथे आवडलं नाही
In reply to आहे ते आहे. जिथे आवडलं नाही by सूड
आँ, अच्च जाल्ल
In reply to आँ, अच्च जाल्ल by स्पा
ओह आय सी!!
उत्कृष्ट माहिती !
In reply to उत्कृष्ट माहिती ! by सस्नेह
बहुतांश
In reply to बहुतांश by नाखु
अरे वा !
पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर
In reply to पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर by असा मी असामी
माझ उलट आहे
In reply to पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर by असा मी असामी
आदल्या दिवशी जडान्न( अति
वाचतिये. उत्तम माहिती. असे
या जगात दोन प्रकारचे लोक
In reply to या जगात दोन प्रकारचे लोक by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे साहेब
In reply to घाटपांडे साहेब by सुबोध खरे
माझे लोकांना हेच सांगणे आहे
पोट भरणे व भूक शमल्याचे
पु. लं. च म्हणणे डोळे झाकुन
अतिशय सोपे व मार्गदर्शक लेखन
वाखु साठवलेली आहे.. चार दिवस
सुरेख लेख
'काटा वजनाचा' हे पाच ही धागे
In reply to 'काटा वजनाचा' हे पाच ही धागे by जय२७८१
आपल्या मुलीचे साडे चार
In reply to आपल्या मुलीचे साडे चार by सुबोध खरे
रोखठोक प्रतिसाद
उत्तम धागा
डॉक्टर साहेब्,
In reply to डॉक्टर साहेब्, by मराठी कथालेखक
वर म्हटलेले आहेचओल्या पार्टी
In reply to वर म्हटलेले आहेचओल्या पार्टी by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टर साहेब.
In reply to धन्यवाद डॉक्टर साहेब. by मराठी कथालेखक
साहेब,
In reply to साहेब, by सुबोध खरे
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
कमी खा =))
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
हा शुध्ध हलकटपणा आहे माने =))
In reply to लेख आवडला. by धनंजय माने
पोट कमी करण्याचा ज्याय
अतिशय उत्तम माहिति... धन्यवाद
दोन सुप्रसिद्ध म्हणी आठवल्या...
ज्या भाषेत तुम्ही सांगत आहात
In reply to ज्या भाषेत तुम्ही सांगत आहात by असंका
साहेब
प्रतिसाद वाचनीय