Skip to main content

पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 25/06/2014 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा (अनघाताई, कृपया ह घ्यावे.) बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते. सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26796
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

विडंबन एकदम खुमासदार झालयं. *ok*

लोल =))))

कहर आहेस तु! मस्त जमलयं विडंबन.

पुरुषांच्या ढेरीबद्दल म्हणजे शरीराच्या एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल असे जाहीरपणे काहीही बोलले जातेय हे पाहून एक मिपाकर म्हणून... वैग्रे वैग्रे (संमं, इकडे लक्श द्या, हे कुठल्या धोरणात बसतं वैग्रे वैग्रे.) त्यात भर म्हणून पुरुष त्यात कायकाय ढकलत असतात याचेही चर्वितचर्वण आपले वर्णन उघडपणे चालवले आहे. जणू काही बेटर हाफ् ला ढेरी नसतेच. आमची ढेरी तर तुमची कंबर. आमचे चरणे हे हादडणे आणि तुमचे चरणे काय तोंडी लावणे असते? आणि काही करा पुरुषच जबाबदार. ही पाळी तुमच्या गेल्या हज्जारो वर्षांच्या सैपाकामुळेच ओढवली नाय काय? तरी याचा पंक्तीपुरता विदा गोळा करून नि:पक्षपातीपणे स्यूडोस्ट्याटीस्टीक्स वैग्रे वैग्रे निष्कर्श काढावे आणि मग मांडावे अशी णम्र इनंती. असो, ढेरी ही ढेरी असते. त्यात स्त्रियांची ढेरी आणि पुरुषांची ढेरी असे काही नसते. एकमेकांच्या इंचांचे मोजमाप करण्यात काही हशील नाही. तुमच्या जेवणावळ्या सोप्प्या होवोत या शुभेच्छा देऊन आणि एवढे(च) बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जै म्हाराष्ट्र! (पार्श्वसंगीतात कडाम् कुडूम् असा आवाज...!!!)

In reply to by एस

ही मग अ‍ॅपल टु अ‍ॅपल तुलना झालीये का? हे म्हणजे मोठ्ठा फणस टू अ‍ॅपल होईल फार तर! ;)

In reply to by यशोधरा

यशो खुर्चीतुन पडले ना गं बाई मी!

In reply to by एस

तुमी तर नाराज झाले की भौ ! अवो, मस्ती मस्तीका मामला है, समजून घ्या ना ! बाकी ढेरी ही लिंगसापेक्ष नसावी यावर सहमत.

In reply to by सस्नेह

तुमी तर शीरियस झाल्या की तै! अवो, आमचाबी इडंबनविडंबन का मामला है, हसून घ्या ना थोडं ! बाकी विडंबन हे हास्यनिरपेक्ष नसावे ह्यावर एकमत. ;-)

फाउल नोंदवत आहे. आता ह्या अश्या धाग्यांची मिळुन एक मोठी सुतळी तयार होइल.

अगदीच मिळमिळीत... उगाच खुमासदार वेग्रे म्हणौन धाग्याचा ट्यार्पी वाढौ नये... असो... दोन-चार रायते, पाप्डं अन कश्मीरी पुलावाची कमतर्ता माझ्यासारख्या व्हेज माणसाला जाणौली... -- फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो --

In reply to by वपाडाव

ह्या धाग्याच्या निमित्ताने का होईना आपण अज्ञातवासातून बाहेर आलात हेही नसे थोडके. लोकं व्यनितून चवकशी करायलीत तुमच्याबद्दल, कुटं हायसा?

अजुन एकाही समारंभात चिकण, आईस्कीम, टंदुरी अथवा फ्रुट्सालाड असे कोणतेही पदार्थ आलेले नाहीत. आम्ही आपले बटाटा भाजी, वांग्याची भाजी, गेलाबाजार चक्रीची भाजी आणि पोळ्या, भात, वरण झालेच तर कांदा-टमाट्याची कोशिंबीर इतक्यावरच भागवतो. त्यामुळे तो ढेरीचा प्रश्ण आमच्यापुरता तरी निकालात.

काय राव ढेरी आपला जीव की प्राण. सध्या सायकलिंगमुळे ढेरी आटोक्यात आलीये, पण पंगतीला हादडायची सवय तरी जात नाय.. बाकी जय हो ढेरीपुराण..

नाही हो. अस काही नाहीये. मी रोज ३ पोळ्या खातो पण अगदी शिडशिडीत दिसणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन ५-६ पोळ्या खाऊन जातात. माझा स्पीड जेमतेम मिनिटाला अर्धी पोळी एवढा असतो. नि ह्या पोरी २ मिनिटात पोळ्या...

In reply to by प्यारे१

इतके पाप्याचं पितर दिसणारे समोर येईल ते हादडतात तरी ढेरी कै धरत नै अन आम्ही साला आंध्रा मेसमध्ये भात वरपला तरी ढेरी!!! बहुत नाइन्साफी ए!!!!

In reply to by बॅटमॅन

साक्षात हभप प्यारेमहाराजांना 'पाप्या' म्हणतोस..? वाल्गुदेया, कुठे फेडशील ही 'पापे' ? भात सोड अन पोळ्या खा पोळ्या ! 'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा ! *nea*

In reply to by बॅटमॅन

पापी' पेट का सवाल है ब्याट्या. ह्या "पापी" त अन लहान मुलांची घेतो त्या पापीत नक्की काय फरक आहे रे? पापी हा शब्द पाप या शब्दावरून डीराईव्ह केलेला आहे का?

In reply to by सस्नेह

भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला विचारार्ह आहेच, परंतु
'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा !
याच्याशी अंमळ असहमती दर्शवितो. ढेरी कमी झाल्यावर 'पापे' कमी होतील असे समहौ वाटत नाही ;)

In reply to by बॅटमॅन

ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या बाईंची पुस्तकं वाच.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईच्या हातचंही जेवतात.. बायकोच्या हातचंही जेवतात.. बहीणीच्या हातचंही जेवतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या डब्यात काहिही भरुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते दिलेलं मुकाट्याने खातात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर स्वयंपाकाच्या बाबतीत डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी.. -मिलियन वायडर ;)

In reply to by मदनबाण

अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' असे पुस्तक काढलंय आणि त्याला वल्लीशेठ बोरकरांची प्रस्तावना* लाभली आहे आणि उभ्या महाराष्ट्रात लोक ते वाचून आडवे झाले आहेत असं काहीसं स्वप्न पडलं आम्हांला काल...! ;-) *(ऋजुतातैंच्या पुस्तकाला जिने प्रस्तावना लिहिलीयं तिचा फॅन)

In reply to by एस

>>अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' अत्रुप्त दिवेकरांनी पुस्तक काढलं तर त्याचं नाव काहीसं असं असेल, "माझीच ढेरी तरी खायची चोरी". ;)

In reply to by पिलीयन रायडर

+१११ विशेषतः मिलियन वायडर साठी ;)

तीव्र निषेध, *stop* बायकोच्या हातचे जे मिळते तेच खावे लागते किबहुना पोटात ढकलावे लागते. स्वाद घेत घेत न खाल्या मुळे जेवण पचत नाही. परिणाम ढेरी निघते. त्यात पुरुषाँचा काय दोष. शिवाय जिथे स्वादिष्ट मेजवानी असेल तिथे आम्ही भरपूर ताव मारला त्यात आमची काय चूक. *mamba*

In reply to by पिलीयन रायडर

ते त्यांचं त्यांचं बघून घेतील की. फुक्कट सल्ला द्या म्हणून कुणी विचारायला आलंय का हो तुम्हांला? जिथेतिथे उपदेश-एरंडेल पाजत बस्ता ते? की संस्थळावर लिहिले म्हणून कोणीही यावे आणि सल्ले देत बसावे असं आहे?

In reply to by बॅटमॅन

त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना.. तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी.. तुम्ही लोकांच्यात नाक खुपसणं आणि काड्या सारणं कधी बंद करणार? तुम्ही अगोदर ही फुकट फौजदारी बंद करा.. (हो.. हा सल्ला आहे..) इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना... उगाच प्रतिसाद हुंगत कशाला फिरता.. बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच.. (ह्या माणसाला एकदा(चा) रामराम ठोकलेला कळत का नसावा?)

In reply to by पिलीयन रायडर

'चोर तो चोर वरती शिरजोर' ही म्हण संदर्भासहित स्पष्ट केल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!

In reply to by बॅटमॅन

तुम्ही तर बर्‍याच म्हणी अनेक दिवसांपासुन सार्थ करत आहात.. पण असो.. तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही.. जमल्यास गप बसा.. (आग्रह नाही..)

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..
म्हणून अजून खाली रसातळाला जाता, होय की नाही? बाकी ज्याची त्याची समज वगैरे...चालायचंच!

In reply to by पिलीयन रायडर

माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल काय वाटेल ते समजा... :)
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..
इथे पिरा"भाईं"शी सहमत
तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..
नैच्च करत आहे कुणी...पण जो सल्ला आहे तो यापेक्षा जालीम आहे त्याचे काय :)
इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना...
हेच पिरा"भाईं"नासुध्धा लागु पडते...पण दिलाच ना आगव सल्ला =))
बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों... साभार - इस्माईल"भाय" चार्मिनारांवालें ;)

In reply to by टवाळ कार्टा

ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...
अर्रे टवाळभाई, इत्ते साल मिपामिनार पे बैठे तो क्या खाला लोगांका टेन्शन लेनेकु? हमारी इज्जतां सस्ती नै होती कि कोई बी आये आउर बैगन मे मिलाकर भुर्ता बनाके खाये! ऐसा नै होता टवाळभै, पूरी प्लॅनिंग करनी पडती! अब हम लोगां रहते मुद्देपे, वो लोगां रहते फाटेपे! अब ह्यांसे व्हां जाना बोले तो पूरा एक मेगाबायटी प्रतिसाद होता यारो =))

In reply to by बॅटमॅन

कहर.. =)) अर्रे संक्षीभाईं..अर्रे हमारे ब्याट्याभाईंकी लडाईं हो गयीं भाई खालालोगांसे...जर्रा कुच उप्परनीचे हुआ तो आप संभालल्येओ खालांलोगोंको ....अर्रे भ ब्याट्याभाईं...संक्षीभाई बोलरेले है तुम्हारे लिये खालालोगां क्या पुरा संमं संभाललेंगे... (आल लाईन बीजी आ रहा है ;) ) संक्षींनी ह.घे. हि विनंती :)

In reply to by टवाळ कार्टा

परसो मिपापुरेमें क्या लडाई हुवी मालूम...चिंध्या लडाई हुई..मै टवाळ, बुवा, वल्ली, सूड, धन्या पूरे गये थे लोगां..मैं क्या करा बोले तो कंपुटरपे बोटां दबादबाके वो लिखा वो लिखा, घाप घीप घाप घीप घाप घीप =))

In reply to by बॅटमॅन

हे असं होतं बघा स्नेहातै, आता आवडला ना एखादी गोष्ट की त्याचा पार भुगा केल्याशिवाय पुरुषांना चैन पडत नाही... मग समोर 'स्माईल'भाई असो, की आईसक्रीम असो की तंदूरी असो की आणखी काही .... (चाणाक्ष वाचक ओळखतीलच ;) ) डायेट कोलमडते ते असं. ;)

In reply to by प्यारे१

तुम लोगां सिरेस कायकु लेते यारों ...मिपा के पठ्ठे हैं...१-२ साल से मिपा पे बैठा हुवा हु...मेरी कुच इज्जत हैं यारों ...तुम लोगां क्यातोबी संमझे रे मेरेकू

In reply to by टवाळ कार्टा

खल्लास =)) मेरेकु बोर मार्रा पार्टी मे, लांग ड्राईव्ह पे जाना बोली. अम मै क्या करां, उने बोल री बोल के ले गया. पयले पाकृ के धागे में फटु देखे, फिर जिलब्या देखा हाउर फिर ह्यां आये सीद्धाइच प्रतिसाद-प्रतिसाद खेलते. उन्हे बोली, बॅटू, मेरेकु जिलबी होना. वहीं फिर 'मोकलाया' वाली जिल्बी खिलाया उसकू, पाच-पाच डब्बा भरके जिलब्या खाये. फिर मेरेकु बोली, तुम किधर जानावाना मत, ऐसा कैसा होता? अब उने बोल री बोल के मै गया रूमपे, अब रातभर क्या हुवा नक्कॉ पूछू =))

In reply to by बॅटमॅन

हैट्ट आहे =)) अर्रे जिल्बी जिल्बी करके कित्ता बोला तुम्कू ...अबी क्या पुरें सौ करनेका इरादा है?

In reply to by टवाळ कार्टा

तुम लोगांको सुपारी दिया क्या स्नेहाबै?

In reply to by पैसा

माझ्या धाग्याचं काश्मीर..?? मै कहां हूं..?? *shok*