ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.
-------------------------------------
जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो.
काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार.
तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे.
सत्य निश्चिती / प्रस्थापना
लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत.
१) सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे.
२) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत.
३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत.
४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य.
५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू
लागते.
यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते.
परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या.
परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो.
सत्याचे अन्वेषण / आकलन
या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत.
सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे.
त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही.
आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो.
सत्याचे प्रकटीकरण
जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth) नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते.
जंगल वाटांवरचे कवडसे
चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे.
इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया.
या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे.
भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना.
क्रमश
वाचने
41077
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरेस्टिंग!
बेग टू डिफर
In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम
हो. तुमचं बरोबर आहे.
In reply to बेग टू डिफर by एस
सत्य जाणून घ्यायचा हेतू
In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम
वरच्या माझ्या प्रतिसादातील,
In reply to सत्य जाणून घ्यायचा हेतू by Anand More
सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला
In reply to वरच्या माझ्या प्रतिसादातील, by Anand More
आपण छान विचार मांडलेत. इतक्या
In reply to सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला by सटक
सत्यशोधन ही जर का नैसर्गिक
In reply to आपण छान विचार मांडलेत. इतक्या by Anand More
तुमचे टोपणनाव असे आहे की मी
In reply to सत्यशोधन ही जर का नैसर्गिक by सटक
म्हणजे माझे संदर्भाविरहित
In reply to तुमचे टोपणनाव असे आहे की मी by Anand More
शेवटी "असो" म्हणून थांबलात
In reply to म्हणजे माझे संदर्भाविरहित by सटक
संवादाची अशी गंमत आहे पहा.
In reply to शेवटी "असो" म्हणून थांबलात by Anand More
तुम्ही माझे लेखन बारकाईने
In reply to संवादाची अशी गंमत आहे पहा. by सटक
वाचतेय.पुभाप्र
मी याचे एक स्वैर भाषांतर केले
त्यातून काही वेगळा अर्थ
In reply to मी याचे एक स्वैर भाषांतर केले by जयंत कुलकर्णी
श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल
In reply to त्यातून काही वेगळा अर्थ by जयंत कुलकर्णी
रमताराम सध्या इथे दिसत नाहीत म्हणून कमेंट करणं उचित नाही
मनोरंजनाच्या व्याख्या
In reply to रमताराम सध्या इथे दिसत नाहीत म्हणून कमेंट करणं उचित नाही by विवेक ठाकूर
मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ?
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या by Anand More
मी मला जे हवं ते घेतो... कधी
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर
बाकी सर्व राहूं द्या
In reply to मी मला जे हवं ते घेतो... कधी by Anand More
श्री ठाकूर,
In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर
* व त्यावर आलेल्या चांगल्या
In reply to श्री ठाकूर, by जयंत कुलकर्णी
जयंतराव
In reply to * व त्यावर आलेल्या चांगल्या by जयंत कुलकर्णी
आनंदश्री.... मला तर कुस्तीचा
In reply to जयंतराव by विवेक ठाकूर
तुमच्या दोघांचंही नुसतं गोलगोल चाललंय !
In reply to आनंदश्री.... मला तर कुस्तीचा by Anand More
देतो की,
In reply to तुमच्या दोघांचंही नुसतं गोलगोल चाललंय ! by विवेक ठाकूर
तुमच्या प्रामाणिकापणाला दाद देतो !
In reply to देतो की, by Anand More
धन्यवाद... भेटत राहू... :-)
In reply to तुमच्या प्रामाणिकापणाला दाद देतो ! by विवेक ठाकूर
ररांना जे भावले ते त्यांनी
श्री मोरे,
सुंदर प्रतिसाद
In reply to श्री मोरे, by जयंत कुलकर्णी
कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.जंगलवाटांवरचे कवडसे ह्या
मिपावरच्या लेखमालेच्या
In reply to जंगलवाटांवरचे कवडसे ह्या by सिद्धेश महाजन
एकूणच भिकार प्रकार वाटतोय ,
तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे
;)
In reply to तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे by Anand More
तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून
कलाभिव्यक्ती आणि सौंदर्यशास्त्र हे अवघड विषय नाहीत
In reply to तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून by Anand More
विवेक जी
इथे आधीच सनी लिऑनवरनं गोंधळ झाला आहे
In reply to विवेक जी by मारवा
विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय
विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय
औदुंबर !
In reply to विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय by मारवा
दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा
दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा ?
In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा by पिलीयन रायडर
ग्रेसची कविता काय आहे मग?
In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा ? by विवेक ठाकूर
मोरे.. मला तुमचा लेख खरंच
हायला. मला वाटले पिरातैला तरी
In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर
Sarcasm?! ;)
In reply to हायला. मला वाटले पिरातैला तरी by अभ्या..
हो. ह्या लेखाचा संदर्भ
In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर
मूळच्या***
In reply to हो. ह्या लेखाचा संदर्भ by Anand More
हो, ते लक्षात आलं की आधी
In reply to मूळच्या*** by Anand More
तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच
In reply to हो, ते लक्षात आलं की आधी by पिलीयन रायडर
Abstract कला आणि अंतहीन किंवा
अंतहीन किंवा अनेकांत रचना !
In reply to Abstract कला आणि अंतहीन किंवा by Anand More
नीत्शे असं पण म्हणाला होता की
In reply to अंतहीन किंवा अनेकांत रचना ! by विवेक ठाकूर
मोरेजी.. आपने दिल जीत लिया!!
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
आणि शिवाय एकदा या जगात आलो की
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
___/\___. अतिशय संयत,
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
आनंद , प्रश्न ररांचा नाही
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
विवेक, मला तुमचे प्रतिसाद
In reply to आनंद , प्रश्न ररांचा नाही by विवेक ठाकूर
आनंद,
In reply to विवेक, मला तुमचे प्रतिसाद by Anand More
नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
।।।तुम्ही जरी त्याला
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही ?
In reply to ।।।तुम्ही जरी त्याला by Anand More
खुप सुन्दर प्रतिसाद. राशोमान
In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More
मुळात ररा नामक जे काही आहे ते
हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड
In reply to मुळात ररा नामक जे काही आहे ते by स्पा
एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही.
In reply to हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड by Anand More
लेख आवडला
खरे तर मी पण हेच म्हणणार होतो
In reply to लेख आवडला by पैसा
प्रयत्न
ररा कुठे गायबलेत? पूर्वी
एकूण उहापोहावरनं माझा पहिल्या प्रतिसादातला मुद्दा योग्य होता
तुम्हाला माझे विनोद कळतात आणि
In reply to एकूण उहापोहावरनं माझा पहिल्या प्रतिसादातला मुद्दा योग्य होता by विवेक ठाकूर
आनंद,
In reply to तुम्हाला माझे विनोद कळतात आणि by Anand More
इस खुशीके मौकेपर पूरे कायनात
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
मोरे- ठाकूर गळाभेट झाली ,
In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..
अगदी अगदी. हिकडून भिंत,
In reply to मोरे- ठाकूर गळाभेट झाली , by स्पा
अभ्या, ते असं आहे
In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..
वाह ठाकूरसाब. जियो.
In reply to अभ्या, ते असं आहे by विवेक ठाकूर
धन्यवाद :-) वाट बघतो.
In reply to आनंद, by विवेक ठाकूर
:) गहिवरून आले,ड्वाले पानावले
अजि म्यां ब्रह्म पाहिलें
+१
In reply to अजि म्यां ब्रह्म पाहिलें by तर्राट जोकर
एक चक्र देऊन टाकलं
त्यासाठी चिकाटीचा संयमी
In reply to एक चक्र देऊन टाकलं by पैसा
चित्रपट पाहिला अगदी कुठलाही