स्त्री विषयक 'शुचितांचे प्रकार: (प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता इ.) आणि समकालीन प्रयोजन (?)
खरे म्हणजे ज्यांना कमी शब्दात हवे पण रुपक शैली चालते त्यांच्या साठी हा विषय जरासा अप्रत्यक्ष पद्धतीने मी माझ्या जुन्या जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन धागा लेखातून मांडलेला आहे. अलिकडच्या काळात मिपावर काशीबाई ते मस्तानी; स्त्री पोषाख आणि संस्कृती ते पॉर्न अशा विषयांवर मनमोकळी चर्चा झाली आहे. तेव्हा कदाचित याही विषयावर मनमोकळी चर्चा होऊन या विषयावरील चर्चेत अधिक लोकांना सहभागी करून घेणे शक्य असल्यास पहावे म्हणून हा चर्चा विषय मिपा वाचकां पुढे ठेवतो आहे.
- हा धागा लेख वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? आणि स्त्रीयांच्या प्रती यू अॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख अभिवृत्ती या धागालेखांना समजून घेणे कदाचित उपयूक्त होऊ शकेल.
खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य ज्ञानेश वाकुडकर
मनाच्या खुलेपणा बद्दल कवीवर्य ज्ञानेश वाकुडकर विचारत असलेल्या प्रश्नातील दारं, खिडक्या, भिंती या मानवी मनांच्या भिंती आहेत आणि या भिती जगातील अर्ध्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्येवर अन्याय्य असतील तर आम्ही आमच्या मनातील अनावश्यक आणि अन्याय्य पडदे आणि भिंतीं दूर सारू शकू का हा मानवी संस्कृतीच्या सुसंस्कृतपणाच्या प्रगतीसाठीचा महत्वाचा टप्पा असू शकेल का ?
शुचिता शब्दाचा ज्या पद्धतीने स्त्री विषयक वापर होतो त्या बद्दल शब्दार्थ आंतरजावर दिसले तरीही नेमकी व्याख्या दिसली नाही, कुणि व्याख्या नमूद करण्यात साहाय्य करू शकल्यास हवे आहे. खाली एका प्रतिसादात शुचिता शब्दाचा अर्थ पावित्र्य असा दिला गेला आहे. मागच्या एका धाग्यात कामभावना कागदांवरच्या रेषेत नसते ती माणसाच्या मनात असते असा रजनीशांचा संदर्भोल्लेख आलेला आहे त्याच पद्धतीने पावित्र्य हे स्त्रीच्या शरीरात असते का माणसाच्या मनात असते ? एकनिष्ठतेची व्याख्या पावित्र्य अशी करावयाची आणि कुटूंब या टिम युनीटच्या गरजे पलिकडील एकनिष्ठता लादायची असे काही होते आहे का ? या लेव्हलला जरासा अवघड प्रश्न विचारतो -दुखावले जाऊ नका- आमची संस्कृती विवीध मानवेतर प्राण्यांनाही पवित्र मानते आणि हे प्राण्यांबद्दलचे पावित्र्य स्विकारताना त्यांचे शरीरसंबंधांचे स्वरूप जर आड येत नसेल तर स्वतः मानवी स्त्री बाबत तसे ते आड का यावे ?
मानवी संस्कृतीत समुह, प्रांत, देश, संस्कृती, पंथ, धर्म, भाषा इत्यादी पैकी ज्या कोणत्या म्हणून ओळखी एखाद्या स्त्री (अथवा स्त्री समुहास) लागू पडतात त्यानुसार सर्वसाधारणपणे शुचितेच्या कोणत्या न कोणत्या प्रकाराची अपेक्षा स्त्रीयांकडून केली जाताना दिसते. या सर्व शुचिता वरकरणी एकाच प्रकारच्या वाटत असल्यातरीही त्यात उपप्रकार असतात का ? जसे की, प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता, सांस्कृतीक शुचिता, पांथिक शुचिता, धार्मीक शुचिता इत्यादी -यात एका IVF हॉस्पीटलच्या जाहीरातीत एका नव्या शुचितेची भर पाहिली ती म्हणजे अंड-शुचिता जाहीरातीत मॅरेज सर्टीफीकेट आणि नवरा सोबत असणे आवश्यक असे काहीसे लिहिले होते असो- आणि त्या काळ स्थळ, परिस्थिती, नाते समुहानुसार बदलत्या असणार. या विवीध शुचितांना बराच मोठा इतिहास, मिथके, परंपरा, पुस्तकी आदेश, कौटूंबीक आदेश, समुहाचे आदेश, जोडीदाराचे आदेश, मुलांचे आदेश इत्यादी असणार हे ओघाने आलेच. अशा या विवीध शुचिता प्रकारांचे स्त्रीया कधी स्वप्रेरणेने अथवा सवयीचा अथवा आदेशाचा भाग म्हणून पालन करत असतात (अधाशी मिश्यांच्या तालावर नाचत असतात), कुठे कसूर झाल्यास प्रसंगी विवीध प्रकारच्या शिक्षांना अथवा प्रतारणेस -सौम्य ते आघोरी- सामोर्या जाताना दिसतात. या अशा विवीध शुचितांचे मराठी/महाराष्ट्रीय/भारतीय/जागतीक स्त्रीवर समकालीन प्रभाव काय आहेत त्यांचे प्रयोजन काय आहे किंवा रादर प्रयोजन शिल्लक आहे का ?
मी शुचितांचे वेगवेगळे प्रकार सुचवले आहेत त्यात योनी शुचिता हा प्रकार सर्वसाधारण पणे माहित असतो, पण पारंपारीक भारतीय संस्कृतीत स्त्री कडून केवळ योनी शुचिता शरिर शुचिता या प्रकारांच्या पलिकडे जाऊन मनो शुचितेचीही अपेक्षा केली जाते. खरे म्हणावयाचे झाल्यास मनो शुचितेची अपेक्षा केवळ स्त्री कडूनच नाही तर विशीष्ट परिस्थीत पुरुषांकडूनही केली जाताना दिसते परंतु ह्या धाग्याचा उद्देश स्त्री पर्यंतच मर्यादीत ठेवायचा आहे. कुटूंब हे युनिट खेळातील एका टिमच्या समकक्ष समजले तर आपली टिम यशस्वी व्हावी म्हणून टिमच्या ध्येया प्रती लॉयल्टी ठेवणे अथवा लॉयल्टीची अपेक्षा -जी परिस्थीती सापेक्ष आणि केवळ कौटूंबिक टिमप्लेयर म्हणुनच्या केवळ आवश्यक कर्तव्यांपुरती मर्यादीत आहे - ठेवणे यात काही गैर नसावे. पण अशा मर्यादीत उद्देशाच्या लॉयल्टीच्या पलिकडे जाऊन मनो शुचिता, प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता, सांस्कृतीक शुचिता, पांथिक शुचिता, धार्मीक शुचिता व्यक्ति स्वातंत्र्याचा बळी देऊन लादल्या जाण्याची खरेच गरज असते का ? किमान समकालीन व्यक्तिस्वांतत्र्याच्या काळात त्यातील टाकाऊ मुल्ये कोणती याचा शोध घेतला जाऊ शकेल का? हा ह्या धागा चर्चेचा मुख्य विषय आहे.
एका मिथकात नहात असलेल्या आईच्या आदेशासाठी पूत्र पित्याशी लढतो, तर द्सर्या टोकाच्या एका मिथकात कुणी गंधर्व केवळ मनात आला म्हणून -मनो शुचिता- वडलांचा आदेश मानावयाचे टोक गाठत एका आईची हत्या पुत्राकडून घडवली जाते , तर दुसर्या एका धर्मात धार्मीक नियमानुसार अधिकृतपणे घटस्फोटीत अथवा विधवा असल्यास पुर्नविवाह संमत आहे यात जिवनात टोकाची शरीर शुचिता दाखवत विवाहीत जोडीदारा- टूबी प्रिसाईज + वडील, सखखे भाऊ आणि स्वतःची मुले- शिवाय इतर कुणाला पुरुषास स्त्रीचे नखही दिसू नये अशी शरीर शुचिता + कुटूंब शुचिता आहे या पैकी कोणतीही शुचिता मोडली तर अगदी दगडाने ठेचून मारले जाऊ शकण्याची -काही ठिकाणी अॅसीड, नाक कापणे ऑनर किलींग, जेनीटल म्युटीलेशन - अशा अमानुष शक्यताही नाकारता येत नाही, एका ठिकाणि वडील, सखखे भाऊ आणि स्वतःची मुले सारे समोर असले तरीही स्त्रीला दगडाने ठेचले जाऊ शकते दुसर्या केसमध्ये एक मुलगा आपल्याच आईला मारतो आहे (स्त्रीवर अत्याचार होतोच पण तीच्या मुलांच्या मनावर कोण अत्याचार होत असतील कोण जाणे ?) अशा एका धर्मात पुर्नविवाह मान्य असल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या योनी शुचिता नाही मग कुटूंब आणि शरीरदृष्य शुचितेच्या टोकाच्या आग्रहाचे कारण काय असावे ? या मानवी वृत्तीच्या मागे नेमके काय आहे ? स्त्रीने कुटूंबातील टिमप्लेयर म्हणून कर्तव्ये यथायोग्यपणे पार पाडल्यानंतर ती बाहेर कुठे पहाते या वरून पतीला-मुलांना-कुटूंबीयांना-समाजाला असुरक्षीत वाटण्यासारखे नेमके काय असते ? या मनोशुचितेचे आणखीही कंगोरे आहेत ते तपासण्या पुर्वी या स्टेजला एक नेहमी विचारली जाणार्या शंकेची/टिकेची दखल ती म्हणजे स्त्रीला शुचिता-बंधन स्वातंत्र्याची मागणी हि पुरषी आप्पलपोटेपणाच्या हावरटपणातून होत असते -काही पुरुषांची तशी अपेक्षा असेल पण कामभावना आणि आशा हि काय केवळ पुरुषांनाच असते का ? कामभावना आणि आशा स्त्रीयांना सुद्धा असते आणि त्यांच्या स्त्रीत्वाच्या त्या मानवी भावनांचा तुमच्या मनात विनाअट पावित्र्यराखून आदर केला असता या शंकेचे निरसन व्हावयास नको का ?- महत्वाचे म्हणजे हा धागा लेख कोणत्याही प्रकारे स्त्री देहाचे ऑब्जेक्टीफिकेशन, ट्रेड इन ह्युमन बीइंग्स, कोणतेही शोषण याचे समर्थन करत नाही, बुरखा ते विरुद्ध टोक या स्त्रीच्या पोषाख स्वांतंत्र्यावर अनावश्यक निर्बंधांचे समर्थन करत नाही.
उपरोल्लेखीत शंकेची दखल घेतल्या नंतर आपण मनोशुचितेकडे वापस येऊ, एखाद्या स्त्रीची अथवा स्त्री समुहाची त्यांच्या व्यक्तीगत निवडी अथवा लादल्या गेलेल्या परिस्थीतीवरून कुत्सीत अवहेलना आणि कुत्सित असलेले तथाकथित विनोद करणे आणि अशा अवहेलनेच्या वागणार्यांची समज योग्य समजून त्यांच्या भूमिकेतील त्रुटी समजावून न देता आपला (कुटूंबाचा/समुहाचा) ऑनर कमी झाला समजणे या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका मनोशुचितेच्या ओव्हर द बोर्ड अॅक्टीव्हीटीचे लक्षण असतात की अजून कशाच्या ?
प्रेम शुचिता यात कुणावर कुठे केव्हा प्रेमकरू नये इत्यादी या विषयी बंधने अथवा बंधंनांचे मार्गदर्शन असते -यात अगदी नाते/जात/गल्ली/गाव शुचितेची अपेक्षा सुद्धा केलेली असू शकते म्हणजे जसेकी आपल्या नात्यात/जातीत/गल्लीत/गावात काय कमी मुले आहेत म्हणून अमुक तमूक गल्ली बाहेरच्या मुलावर प्रेम करते- ;
सांस्कृतिक शुचितेत संबंधीत संस्कृतीची बंधने स्विकारावी लागतात, अमुक दिवशी प्रेमव्यक्त करणे आमच्या संस्कृतीत
बसत नाही म्हणून तमुक दिवशी तुम्ही प्रेमव्यक्त करू नका, यातले दुसरे उदाहरण कर्नाटकातील एका मंदिरात अंधश्रद्धेने असेल पण स्वेच्छेने -इतर कुणासही आडवे न येता, कोणतीही शोषणाची बाजू नसताना, - पोषाखा शिवाय देवाची प्रार्थना आपखुशीने करणार्या स्त्रीयांचे व्यक्तिस्वातंत्र्यात उर्वरीत समाजाच्या सुसंस्कृतीच्या संकल्पनांसाठी हस्तक्षेप वाजवी ठरतो का ? (येथे काही राज्यांमध्ये स्त्रीयांना विशीष्ट परिस्थीत कमी कपडे वापरण्याचे जबरदस्तीचे बंधन होते याचे मुळीच समर्थन करावयाचे नाही स्त्रीने कोणता पोषाख करावा याचे अधिकतम स्वातंत्र्य देणे आणि जे काही स्वातंत्र्य स्त्रीने वापरले तदोपरांत तिचे कोणतेही शोषण अथवा अन्याय न करणे या खर्या सुसंस्कृत स्थितीला एक माणूस म्हणून तुम्ही आणि आम्ही पोहोचू शकतो का ?
पंथ आणि धार्मिक शुचितेत संबंधीत पंथ आणि धर्माच्या नियमांचे पालन करावे लागतेच त्या शिवाय गल्ली शुचितेप्रमाणे संबंधीत धर्मापलिकडचे मुलगे निवडण्यास परवानगी नसते. यात स्वखुशी आणि फूस लावणे यातील सीमा रेषेची व्याख्या मोठी कठीण असते खासकरून मुख्यशत्रूवत पंथ-धर्मा-गल्लीकडे लक्ष जाणे हा सर्वाधिक मोठा अपराध नाते/जात/गल्ली/गाव/पंथ/धर्म घटक समूहांच्या अधीक तीव्र अविश्वास आणि संघर्षांनाही कारणीभूत होऊ शकतो.
शेवटी तुमच्या/आपल्या कळत नकळत आपल्याकडून अन्याय होणारी स्त्री तुम्ही नाही आहात, तिचे व्यक्तीस्वातंत्र्य पायदळी तुडवण्यापुर्वी एक माणूस म्हणून तुमची ती कुणी लागत असते, जन्म एकच असतो का अधिक कुणी एकच म्हणते कुणी अधिक म्हणतात अधिक जन्म मिळणार असतील तरी या जन्मी आवडलेला माणूस तिला या जन्मीच हवा असू शकत नाही का? तुमच्या घरादाराची कुटूंबाची काळजी घेतल्यानंतर तिचे स्वतःचे काही भावविश्व तिला जगून पाहताच येणार नाही का ?
धागा लेखातील माझे मुख्य मुद्दे लिहून झाले आहेत. (अर्थात लेख पुढे चालून गरजेनुसार अद्ययावत करेन त्यामुळे जे आधी वाचन करतील त्यांना कदाचित पुढील भेटीत पुन्हा वाचण्याची इच्छा असल्यास ठिकच)
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आणि परस्पर व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आभार
वर्गीकरण
वाचने
16117
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मी पयला...
In reply to मी पयला... by ब़जरबट्टू
सहमत....
In reply to मी पयला... by ब़जरबट्टू
एकदाची धागा चर्चा वाहती झाली !
पॉर्नच्या धाग्यावरचा ह्या
In reply to पॉर्नच्या धाग्यावरचा ह्या by संदीप डांगे
+ 1
तुमच्या एकाच प्रश्नाची उत्तर
सध्ध्या हे घ्या...लागते तर
अरे अरे अरे....मिपा सारख्या
घ्या. पुसा ते डोळे. होतं असं कधीकधी ;)
In reply to घ्या. पुसा ते डोळे. होतं असं कधीकधी ;) by अजया
अंग पुसायच्या टॉवेलने?
In reply to अंग पुसायच्या टॉवेलने? by संदीप डांगे
काहीही हं सं
In reply to काहीही हं सं by पैसा
आकाराने विकार निर्माण केला
In reply to आकाराने विकार निर्माण केला by संदीप डांगे
आकाराने विकार निर्माण केला नाही तर आम्ही निर्विचारच होतो. =))
रुमाल आहे हो.बघा की :)
स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता
In reply to स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता by काकासाहेब केंजळे
वॉव. काके तुस्सी तोप हो.
In reply to वॉव. काके तुस्सी तोप हो. by अभ्या..
अरर र्र अर्धीच आली कमेंट. नो
In reply to अरर र्र अर्धीच आली कमेंट. नो by अभ्या..
ते अमेरिकन स्त्रीवादाच्या
In reply to अरर र्र अर्धीच आली कमेंट. नो by अभ्या..
काका तुम आगे बढो... हम
In reply to काका तुम आगे बढो... हम by पक्षी
अगदी अगदी
In reply to स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता by काकासाहेब केंजळे
क्या बात, क्या बात!!
In reply to स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता by काकासाहेब केंजळे
हे काकासाहेब केंजळे
In reply to स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता by काकासाहेब केंजळे
काकासाहेब
In reply to काकासाहेब by प्रदीप साळुंखे
चाणक्य अमेरिकन स्त्रीवादाचा
काकासाहेब, आदरपूर्वक साष्टांग
In reply to काकासाहेब, आदरपूर्वक साष्टांग by अजया
नाही!
मिपाचे हे व्यवच्छेदक लक्षणच
In reply to मिपाचे हे व्यवच्छेदक लक्षणच by काकासाहेब केंजळे
त्यासाठी दोन गोष्टी करायला लागतील काकासाहेब!
In reply to मिपाचे हे व्यवच्छेदक लक्षणच by काकासाहेब केंजळे
असं मला तर वाटत नाही.
In reply to मिपाचे हे व्यवच्छेदक लक्षणच by काकासाहेब केंजळे
काका, मी काय म्हणतो - तुमचं
ताई
:)
In reply to :) by अजया
अजयाबाई , अमेरिकन स्त्रीवाद
In reply to अजयाबाई , अमेरिकन स्त्रीवाद by काकासाहेब केंजळे
काकासाहेब
In reply to अजयाबाई , अमेरिकन स्त्रीवाद by काकासाहेब केंजळे
अरेच्चा,तुम्ही तर भलतेच मोठे
आता अगदी हेच झालं
असो असो , काकांच्याही
केंजळे काका माई काय म्हणताहेत
ऐकत नाहीत हं मिपाकर.
In reply to ऐकत नाहीत हं मिपाकर. by खटासि खट
=)) =)) =))
श्री श्री श्री मोक्काट्ट गाढव
काकासाहेबांनी प्रसवलेलं हे एक
In reply to काकासाहेबांनी प्रसवलेलं हे एक by पिलीयन रायडर
पिरा तै, लेखाच्या सुरवातीसच
काका साहेब राग मानू नका आणि