विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत
In reply to अजून तेच गुर्हाळ चालू आहे ! by विवेक ठाकूर
In reply to अजून तेच गुर्हाळ चालू आहे ! by विवेक ठाकूर
In reply to काही जण `सगळं समजल्यासारखे' by संदीप डांगे
In reply to या लेखमालेतील आतापर्यंतचा by सतिश गावडे
या लेखमालेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ लेख.१०००% सहमत! - (स्वजनक) सोकाजी
पुनरूत्पादनासाठी नुसता `स्वजनक' असून कसं चालेल ? `स्वजननी' नको का?लैंगिक पुनरुत्पादन हा प्रकार तसा नवा आहे. काही अब्ज वर्षं तरी पुनरुत्पादन अलैंगिक पद्धतीनेच होत होतं. अजूनही अनेक प्रजातींमध्ये अलैंगिक पुनरुत्पादन दिसून येतं. अनेक झाडं अलैंगिक पुनरुत्पादन करतात. अनेक प्रजाती लैंगिक आणि अलैंगिक पुनरुत्पादन करू शकतात. यीस्टच्या काही प्रजातींमध्ये लैंगिक पुनरुत्पादन होणार की अलैंगिक हे दोन जीन्सद्वारा ठरतं. तेव्हा पुनरुत्पादनासाठी जनक आणि जननीची गरज नसते. https://en.wikipedia.org/wiki/Asexual_reproduction http://education.seattlepi.com/five-examples-organisms-use-asexual-reproduction-5849.html http://www.biology-pages.info/A/AsexualReproduction.html
In reply to पुनरूत्पादनासाठी नुसता by राजेश घासकडवी
In reply to आता निदान स्वतःचं हे वाक्य तरी लक्षात ठेवा ! by विवेक ठाकूर
In reply to अमिबाचं रिप्रोडक्शन हा शाळेत by अनुप ढेरे
In reply to हा ही भाग आवडला. by अर्धवटराव
In reply to तंत्रं खूप वेगवेगळी वापरली by राजेश घासकडवी
In reply to तंत्रं खूप वेगवेगळी वापरली by राजेश घासकडवी
In reply to थोड़े अवांतर by कवितानागेश
In reply to अभिनंदन by अरुण मनोहर
मन हे काय असते, केवळ मेंदूमध्ये न्युरोन्सची धावपळ की आणखी काही?'केवळ न्यूरॉन्सची धावपळ' या शब्दांमुळे त्यामागे असलेली रचनेकडे दुर्लक्ष होतं. हे म्हणजे 'ताजमहाल म्हणजे केवळ दगडावर दगड' असं म्हणण्यासारखं आहे. मन हे मेंदूतच आहे याबद्दल अनेक पुरावे देता येतात. - आपली मनस्थिती रसायनांच्या सहाय्याने बदलता येते. - मेंदूच्या विशिष्ट भागांना इजा झालेली असेल तर भाषा, विचारक्षमता, आठवणी, प्रवृत्ती बदलतात - आपल्या मनात विशिष्ट भावना/विचार येत असताना विशिष्ट भागातले न्यूरॉन्स अधिक प्रमाणात धावपळ करताना प्रत्यक्ष दिसतात - मेंदूसारख्या न्यूरल नेटवर्क्सना अनेक गोष्टी शिकवता येतात. स्वतः आपोआप शिकणारी न्यूरल नेटवर्क्सदेखील असतात मन हे मेंदूबाहेरचं काहीतरी नसण्यासाठीचा युक्तिवाद - मनाचा भौतिक जगावर कसा परिणाम होतो हे दाखवणारा एकही प्रयोग नाही. - मनाचा मनांशी व्यक्तींच्या माध्यमापलिकडे संपर्क होतो हेही प्रयोगांत सिद्ध झालेलं नाही - उदाहरणार्थ इएसपी. मेंदू उत्क्रांत झाला तसंच मनही उत्क्रांत झाल्याच्या खुणा - एकपेशीय प्राण्यांमध्ये मेंदू नसतो त्यामुळे भावभावना, विचार नसतात - आपल्याला दिसणारे सस्तन प्राणी चढत्या क्रमाने मन असल्याच्या, भावना असल्याच्या खुणा दाखवतात. नुकताच कुठेतरी जादूचा प्रयोग दाखवल्यावर खदाखदा हसणाऱ्या माकडाचा व्हिडियो बघितला. कुत्रे, गायीबैल माणसांवर व इतर प्राण्यांवर जीव लावतात, हत्ती आपल्यातलं कोणी गेलं की दुःख करतात हेही दिसलेलं आहे. पण त्यांच्या मनातले विचार, भाषा या मनुष्याइतक्या प्रगल्भ नसतात. इतकं सगळं असतानाही मन ही काहीतरी भौतिक बदल घडवून आणणारी शक्ती आहे हे मला स्वतःला पटत नाही.
In reply to मन हे काय असते, केवळ by राजेश घासकडवी
In reply to रेणू आणि पेशी जशा उत्क्रांत by अरुण मनोहर
In reply to थोडे अजून by अरुण मनोहर
In reply to थोडे अजून by अरुण मनोहर
हे सगळे गारुड केवळ रसायन शास्त्राच्या नियमांचे परिणाम असे म्हणुन टाळता येते?इथे पुन्हा हा 'केवळ' शब्द आला. त्यातून असं सूचित होतं की केवळ दगडावर दगड ठेवून ताजमहाल तयार होत नाही. म्हणजे थोडंसं असं वाटतं की 'हो, दगडांच्या सहाय्याने बांधकाम होऊ शकतं. ते दगड नीट जोडले तर घरं वगैरे तयार करता येतात, ती सुरक्षित असतात, पण सौंदर्य केवळ दगडांनी कसं सांगता येईल?' भावना विशिष्ट रसायनांमुळे बदलतात. ड्रग्ज घेतल्यावर किंवा दारू प्यायल्यावर माणसाचं व्यक्तिमत्व बदलतं. इतकंच का, पुरेशी भूक लागलेली असली तरीसुद्धा भावना बदलतात. त्यामुळे 'केवळ' रासायनिक परिणाम असं त्यांना म्हणता येत नाही, ते खरे आहेत. किंबहुना या रासायनिक-भौतिक रचनेतून इतकं सुंदर मन कसं तयार होतं हे शोधून काढणं महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर संशोधन चालू आहे. अनेक क्लू हाती लागलेले आहेत. मेंदूचे कुठचे भाग भाषा, दृष्टी, प्लॅनिंग, इत्यादी हायर लेव्हल फंक्शनसाठी वापरले जातात याचं मॅपिंग झालेलं आहे. करुणा किंवा एकंदरीत निःस्वार्थीपणा आणि परोपकार हे उत्क्रांतीतून कसे निवडले जातात हेही उघड झालेलं आहे. कॉंप्युटर सिस्टिम्समध्ये माणूस करतो त्या अनेक गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे. एके काळी 'हो, कॉंप्युटर साधे खेळ शिकू शकतो वगैरे ठीक आहे, पण तो ग्रॅंडमास्टरला हरवेल इतकं चांगलं बुद्धीबळ खेळू शकेल का?' असा प्रश्न तावातावाने विचारला जायचा. आता ते होऊनही दशक उलटून गेलेलं आहे. आपल्या फोनवरची सॉफ्टवेअर्स चेहरे ओळखू शकतात, चेहऱ्यावर हास्य आहे की नाही हे ओळखू शकतात, बोललेलं ओळखून टाइप करू शकतात. ज्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचं संशोधन चालू आहे असे कॉंप्युटर प्रोग्राम्स तर याहून कितीतरी पुढे गेलेले आहेत. असो. थोडक्यात मी जी आधीच्या प्रतिसादांत कारणं दिलेली आहेत त्यावरून मन कसं होतं हे कळलेलं नसलं तरीही ते मेंदूमधल्या क्रियांनीच तयार होतं हे पटावं. मेंदू जर उत्क्रांत झाला आहे तर त्याबरोबरच मनही उत्क्रांत झालं असणार हेही पटावं.
In reply to हे सगळे गारुड केवळ रसायन by राजेश घासकडवी
In reply to प्रतिसाद आवडला आणि पटला. by अरुण मनोहर
In reply to रिचर्ड डॉकिन्स आणि दीपक चोप्रा, सतीश कुमार by आरोह
In reply to सुंदर लेखमाला.. येत राहू by अत्रुप्त आत्मा
मनोरुग्ण आणि मती मंद व्यक्तींना दुर्लक्षित करून लिहित रहा.या बाबतीत मी गांधीजींचं धोरण अवलंबतो आहे. त्यांना शिव्यांची लाखोली वाहाणारं पत्र कोणीतरी पाठवलं. त्यातली उपयुक्त टाचणी तेवढी त्यांनी काढून घेतली. ;)
In reply to धन्यवाद. by राजेश घासकडवी
In reply to +१. गुड. वाचतोय. पुभाप्र. by एस
In reply to धन्यवाद. by राजेश घासकडवी
In reply to छान. मागील भाग व हा भाग अतिशय by sagarpdy
In reply to प्रतिसादाबद्दल आश्चर्य वाटले. by संदीप डांगे
In reply to लेख आवडला! by नरेंद्र गोळे
In reply to सुरेख! by साती
In reply to विवेक ठाकूरांचे प्रश्न सुरुवातीस इरिटेटींग वाटले होते पण by विवेक ठाकूर
In reply to दुसरा प्रश्न? by साती
In reply to तो तर पहिल्याहूनही महत्त्वाचा आहे! by विवेक ठाकूर
In reply to ते किरकोळ अॅनॅलिसिस करून प्रायमल कार्यकारण उलगडल्याचा दावा by विवेक ठाकूर
In reply to प्रयत्न! by साती
In reply to तुमच्या विचारांची दिशा योग्य आहे म्हणून उत्तर देतो by विवेक ठाकूर
In reply to राघांनी अवकाश नाकारलेले by साती
In reply to राघांनी अवकाश नाकारलेले मला अद्यापि तरी त्यांच्या लेखात by विवेक ठाकूर
In reply to पण by साती
In reply to सरळ आहे by विवेक ठाकूर
In reply to पण by साती
In reply to :) by अर्धवटराव
In reply to काल हा भास आहे आणि by विवेक ठाकूर
In reply to तुमच्या लेखी काळाची व्याख्या काय माहित नाहि. by अर्धवटराव
In reply to काळ म्हणजे अवकाशाची ट्रान्स्फॉर्मेशन प्रॉपर्टी ? by विवेक ठाकूर
In reply to ओके. by अर्धवटराव
In reply to येस ! by विवेक ठाकूर
निराकारातून आकार निर्माण होतो, काही काळ स्थिरावतो आणि त्यातच विलीन होतो आणि तरीही निराकार अलिप्तच राहातो.
तर मग त्या सर्वव्यापी अलिप्ततेचा अविभाज्य भाग असलेल्या त्या सदस्याला किंवा त्याच्या ड्युआयडीलाच नव्हे तर इतर साकार-सगुण सदस्यांनाही, या जन्मी किंवा पुर्नजन्मी, हे सगळे समजले-नासमजले तरी काय फरक पडतो ?! :)In reply to त्याचा पुनर्जन्म झालाय असं by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे सगळे समजले-नासमजले तरी काय फरक पडतो ? by विवेक ठाकूर
In reply to येस ! by विवेक ठाकूर
निराकारातून आकार निर्माण होतो, काही काळ स्थिरावतो आणि त्यातच विलीन होतोम्हणुनच म्हटलं कि काळ हा अवकाशाची ट्रान्सफॉर्मेशन प्रॉपर्टी आहे. तो भास नाहि.
अर्थात, हे सगळं इथल्या सदस्यांना समजण्याची सुतराम शक्यता नाही. आणि जो सदस्य समजावू शकत होता तो संकेतस्थळानं गमावलायं.असं काहि नाहि. प्रत्येकजण आपापल्यापरिने सत्याला गवसणी घालत असतो. आपल्याशिवाय कोणालाच सत्य समजु शकत नाहि सदस्याला हाच अहंकार 'त्या' ससस्याला नडला. किंबहुना 'त्या'ची एकुण तडफड बघुन सत्य उमगल्याने असं होत असेल तर मरो ते सत्य अशा अशी भावना झाली पब्लीकची. असो. त्याबद्दल आपला पास.
In reply to चयापचय !! by अर्धवटराव
In reply to मरो ते सत्य ! by विवेक ठाकूर
स्वतःच्या प्रती काढू न पाहणारा किंवा काढण्याची अतितीव्र इच्छा नसणारा डी एन ए असू शकेल काय ?'डीएनएला इच्छा' नसते, त्या डीएनएपासून घडलेल्या शरीराला, मेंदूला इच्छा असतात/नसतात. पण तुमच्या प्रश्नावरून तुम्हाला तेच म्हणायचं असावं असं दिसतं आहे. अनेक लोकांना मूल जन्माला घालावं अशी इच्छा नसते. मग अशी इच्छा बाळगू शकणारे मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण कसे होतील, आणि टिकतील कसे असा प्रश्न आहे. हा खरोखरच उत्तम प्रश्न आहे. सर्वप्रथम, 'मूल होऊ नये अशी इच्छा मनात निर्माण करणारा' असा विशिष्ट जीन नसतो. लहान मुलांविषयी प्रेम वाटणं, असहाय बालकाची काळजी घेण्याची प्रवृत्ती व्हावी, आपलं ज्ञान कोणाला देण्याची इच्छा असणं, संभोग करण्याची तीव्र गरज असणं, विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणं अशा वेगवेगळ्या आंतरिक इच्छा, ऊर्मी या मेंदूमध्ये बऱ्यापैकी हार्डवायर्ड असतात. या सर्वांचा परिपाक म्हणून मूल वाढवण्याची इच्छा होते. मेंदूची क्लिष्टता जशी वाढली आणि समाजाची क्लिष्टता वाढली तशी परस्परविरोधी विचार करण्याची क्षमताही आली. यातून त्यातल्या काही जणांना 'मूल नको, इतर गोष्टी हव्यात' अशी इच्छा होऊ लागली. नेचर आणि नर्चर यांच्या रस्सीखेचीतून यातला काही भाग आला असावा. (म्हणजे नात्यात असूनही मूल होऊ न देण्याचा पर्यायच काही शतकं आधी उपलब्ध नव्हता.) थोडक्यात, मेंदूच्या हायर फंक्शन्स - विचारक्षमता ही उत्क्रांतीतून आली. त्याचा बहुतांश प्रमाणात मनुष्यजातीला, आणि तो मेंदू बाळगणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी आणि आपले जीन्स पुढच्या पिढीत पाठवण्यासाठी फायदाच झाला. त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काहींना मूल न होण्याची इच्छा असते. उत्क्रांतीत 'शुद्ध फायदेशीर गुणधर्मच फक्त जोपासले जातील' असं होत नाही. प्रत्येक फायदेशीर जेनेटिक बदलाबरोबर इतर बाबतीत काही तोटेही निर्माण होतात. जोपर्यंत सर्वसाधारण लोकसंख्येत या हायर फंक्शन्सचे फायदे अधिक आणि तोटे कमी असतील, तोपर्यंत माणसाच्या जीनपूलमध्ये मेंदूची हायर फंक्शन्स असण्याचे जीन शिल्लक राहातील. उदाहरणार्थ जिराफाच्या मानेची लांबी वाढली त्याबरोबर त्याच्या हालचालींवर मर्यादा आली. कारण एवढी मोठी मान आणि त्या मानेच्या तुलनेचे उंच पाय बाळगायचे, तर शरीराचं स्थैर्य कमी होतं. जिराफाला पाणी प्यायला त्रासही होतो. कुठच्याही इंजिनियरींग सिस्टिममध्ये या प्रकारची फायद्या-तोट्यांची देवाणघेवाण असते. जोपर्यंत एका विशिष्ट इव्होल्यूशनरी नीश मध्ये जगण्यासाठी फायदा होतो तोपर्यंत इतर तोटे स्वीकारता येतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं अशी आशा आहे.
In reply to स्वतःच्या प्रती काढू न by राजेश घासकडवी
सर्वप्रथम, 'मूल होऊ नये अशी इच्छा मनात निर्माण करणारा' असा विशिष्ट जीन नसतो.नसेल कदाचित, पण आपल्याला मुल व्हावे किंवा अजून प्राथमिक पातळीवर म्हटले तर आपल्या जीन्स पिढ्यान पिढ्या टिकाव्यात अशी इच्छा निर्माण करणारी प्रवृत्ती तर जेनेटिक आहे ना ? आतापर्यंतच्या माझ्या (इतरत्र ) वाचनातून आनंदी राहणे , दु:खी होणे , क्रोधित असणे ई भावना जरी संस्कार, आहार, सभोवतालची परिस्थिती यांमुळे बदलत असल्यातरी या प्रवृत्ती काही अंशी जीन्समुळे प्रभावित असतात असे मला वाटते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नेहमीच आनंदी राहण्याकडे (वा कमी दु:खी होण्याकडे) कल असू शकतो तर एखादी व्यक्ती नेहमीच काहीशी अधिक उदास वा कमी आनंदी असते तेव्हा त्या प्रवृत्तींवर जीन्सचा प्रभाव असू शकेल असे मला वाटते. आत्महत्या या टोकच्या गोष्टीचा विचार केला तरी संस्कारातून आलेली मानसिकता, तत्कालिक कारणे या पलीकडे मला वाटते की काही जीन्स आत्महत्येची प्रवृत्ती नियंत्रित करत असू शकतील (असे काहीसे मी वाचल्याचे स्मरते). तुलनेने आत्महत्या ही फार तात्कालिक गोष्ट आहे आणि तत्कालिक भावनांचा कल्लोळ त्यास कारणीभूत असू शकतो. परंतू निपुत्रिक राहण्याचा निर्णय हा दीर्घकालीन निर्णय आहे. यात काहीजणांची भूमिका फक्त पालकत्वातून येणारी जबाबदारी नको इतकीच असेलही परंतू मूल होण्याची क्षमता असून दत्तक घेणारे पण लोक आहेत. शारिरिक समस्या नसतानाही हेतुपुर्वक अविवाहित राहणे (इतर प्राण्यात जोडिदार न शोधण्याच्या घटना/उदाहरणे आहेत का हे माहित करणे रंजक ठरेल), लग्नानंतरही मुल जन्मास न घालणे, मुल दत्तक घेणे हे सगळं करणार्यात 'मला माझ्या जीन्स दीर्घकालीन जतन करायच्या आहेत' या सहजप्रवृत्तीचा अभाव असेल का ? एक अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय गायिका , देशातील जनतेचे लाडके (अनेक) नेते,एक यशस्वी आणि सन्माननीय उद्योगपती जेव्हा अविवाहित राह्तात , अपत्यांना जन्म देत नाहीत तेव्हा "त्यांना फक्त जबाबदारी नको होती" किंवा "तरुणपणी विशिष्ट अर्थिक/कौटूंबिक परिस्थितीमुळे लग्न करता आले नाही" असे मानणे कठीण आहे, किंवा एखाद्या तत्कालिक कारणात गुंतून (प्रेमभंग ई) 'जीन्स जतन करण्याची ' आसक्तीच त्यांच्या मनातून नाहीशी होण्याइतके ते अपरिपक्व असतील असे मानण्याचे कारण नाही. म्हणजेच 'विशिष्ट जीन्सचा अभाव' असण्याची शक्यता वाढते. तुम्ही म्हणता तसे कदाचित जीन्स मधील बदलाने त्यांना काही खास असामान्य कौशल्ये बहाल केली असण्याची व त्याचवेळी काही आसक्ती त्यांच्यातून हिरावून घेतली असण्याची शक्यता आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं अशी आशा आहे.खरंतर.. विषय खूपच रोचक आहे. मी म्हणेन 'अभी तो चर्चा शुरु हुई है'... पण तुम्ही या संपुर्ण लेखमालच्या कार्याला भिडलेले असताना तुलनेने कमी महत्वाच्या उपविषयात तुमचा वेळ आणि उर्जा अडकवणे मला योग्य वाटत नाही. तरी पुन्हा कधी याबद्दल काही लिहलेत तर वाचायला नक्की आवडेल.
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by मराठी कथालेखक
In reply to सुरेख लेखमाला ........ by सुधीर कांदळकर
उत्कृष्ट