अंबाडा
लेखनविषय:
काव्यरस
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?
दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?
ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
- संदीप चांदणे
वाचने
14355
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
वाह!!!!!
धन्यवाद ३ए!
एका शब्दांत अतिशय बोलकी प्रतिक्रिया!
अगदी पहिल्याच कडव्याला तोंडातून उत्स्फूर्त दाद बाहेर पडली.!
संदीपराव प्रत्येक लेखागणीक आमच्या तुमच्यावर असलेल्या अपेक्षा वाढवताय.
अहाहा. सुरेख.
जिओ संदीपराव.
धन्यवाद किसनदेवा आणि अभ्यादादा! __/\__
@किसन शिंदे : असेच अपेक्षांचे ओझे वाढवित राहा. त्यातच खरी मजा आहे!
सुरेख....!
राग व गंध सांडला लिहीले तर मला जास्त आवडेल. अर्थात हे फक्त सजेशन.
कविता आवडली.
क्या बात हे !!
हळुवार सुंदर रचना. आवडली.
धन्यवाद प्यारेदादा, शुचितै, स्रुजातै आणि चाणक्य!
कवितेबद्दल अजूनही कुणाच्या काही सूचना असतील तर त्या ऐकायला आवडतील!
:)
आवडली!
आवडली!
रातराणी आणि प्राची अश्विनी तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे!
लयदार लय!
In reply to लयदार लय! by शिव कन्या
कैच नै कळ्ळं!! :-/
कळेल अस लिहा की वो तै!
In reply to लयदार लय! by शिव कन्या
कैच नै कळ्ळं!! :-/
कळेल अस लिहा की वो तै!
In reply to लयदार लय! by शिव कन्या
कळ्ळ! :)
खूप छान लिहिताय! वेगवेगळे प्रयोग करून बघा. कधी मुक्तछंदात तर कधी वृत्तबद्ध.
वा सुरेखच!
आवडली
पैसाताई, ईशा१२३, जव्हेरगंज, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
Kaay Mhanaave..shabda naahiyet...itka sundar lihile aahe..waah.
आवडली...
आवडली!
अजूनही प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले!
निनाव, विशाल कुलकर्णी, अनुप ढेरे प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
कवितेची मैफल जर घडली कुणासोबत तर मजा येईल!
मला आवडेल जॉईन व्हायला, किंवा पाठिंबा मिळाल्यास आयोजित करायलाही! :)
Sandy
कविता आवडली
समोर मनात बिम्बलेल्या आजवरच्या काही सुंदर पहाट येऊन गेल्या! तुमची कविता त्यांच्यासारखीच सुन्दरय!
प्रतिसादासाठी धन्यवाद विश्वजीत.
ही माझीच कविता माझ्याच मनात एक वेगळी जागा करून राहिली आहे!
तुझ्यासारखच प्रत्येकाला काहीना काही दिसावं वा अनुभवता यावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. :)
Sandy
कडवे क्र.३,४ सुरेख
छा गये दिलपे.
बेहद्द आवडली!
गुर्जीं, प्रसाद धन्यवाद!
कवितेतले शब्द नेमके भावविश्व उभे करतात.
सुरेख रचना.
एक सुचवावेसे वाटते की त्या, ती, तो वगैरे fillers सतत वापरले नाही तर अधिक योग्य होईल.
In reply to सुरेख रचना. by यशोधरा
धन्यवाद यशोतै!
वृत्तात बसवताना ते वापरावे लागले! पण सूचना एकदम मान्य.
यापुढे कविता लिहिताना नक्की प्रयत्न करीन फिलर्स टाळण्याचा! :)
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला?हडळ असेल कुणीतरी
In reply to अंधाराचा अन पहाटेचा by तुडतुडी
तुम्ही तर नव्हता?
जमलंय!! अजून येऊ द्या.
In reply to जमलंय!! अजून येऊ द्या. by सूड
वरच्या प्रतिसादाने कवितेवर 'सूड' उगवलाय आणी तुमचा असा छान प्रतिसाद!
केवढा विरोधाभास!
धन्यवाद!
आणखी येणारच आहे!
Sandy
In reply to :) by चांदणे संदीप
अहो, मला वाटतय तो प्रतिसाद मजेमजेत दिलाय! त्यावर तुमचा रिप्लाय जास्तच टोकाचा वाटला. हे आपलं माझं एक निरिक्षण!!
In reply to अहो, मला वाटतय तो प्रतिसाद by जव्हेरगंज
सोडा घ्या… आपल... (नुसतंच) सोडा!
आवडली.
अप्रतिम..... आवडली
रचना आवडली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper
Avadli kavita. Pu.le. shu.
तुम्ही तर नव्हता?माझे केस अंबाडा घालण्याइतके लांब नैत
वाह!!!!!