अंबाडा
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?
दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?
ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?
अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?
- संदीप चांदणे
वर्गीकरण
वाह!!!!!
धन्यवाद!
फॅन झालो ब्वॉ आपण तुमचे.
अहाहा. सुरेख. जिओ संदीपराव.
धन्यवाद...
सुरेख....!
राग व गंध सांडला लिहीले तर
क्या बात हे !!
मस्त
:)
आवडली!
आवडली!
धन्यवाद…
लयदार लय!
In reply to लयदार लय! by शिव कन्या
हे काय्ये?
In reply to लयदार लय! by शिव कन्या
हे काय्ये?
In reply to लयदार लय! by शिव कन्या
कळ्ळ!
सुरेख!
वा सुरेखच!
आवडली
अरेव्वा!
Nishabda...aprateem
आवडली...
आवडली!
मस्त!
कविता आवडली
खूप छान!
विश्वजितभौ धन्यवाद!!
आहाहा...........
बेहद्द आवडली!
अरेव्वा!
सुंदर कविता
सुरेख रचना.
In reply to सुरेख रचना. by यशोधरा
धन्यवाद यशोतै!
अंधाराचा अन पहाटेचा
In reply to अंधाराचा अन पहाटेचा by तुडतुडी
तुम्ही तर नव्हता?
जमलंय!! अजून येऊ द्या.
In reply to जमलंय!! अजून येऊ द्या. by सूड
:)
In reply to :) by चांदणे संदीप
अहो, मला वाटतय तो प्रतिसाद
In reply to अहो, मला वाटतय तो प्रतिसाद by जव्हेरगंज
जाऊद्या!
सुंदर आहे!
अप्रतिम..... आवडली
रचना आवडली...
Mastach
तुम्ही तर नव्हता?