वादळ (शतशब्दकथा)
एक एक काडी आणून चिमणा चिमणी घरटं बांधत होते.
त्यांच्या लगबगीचं हिला फार अप्रूप.
"अरे ही काडी इथे लावायची होती ना ?"
"आधी नाही का सांगायच?"
"आता सांगितल ना?"
त्यांच्या चिवचिवाटाला तिचे शब्द.
काल रात्री पावसानं धुमाकूळ घातला.
तिनं खिडकीतून पाहिलं तर घरटं चिखलात पडलं होतं.
एक एक काडी वेगळी झाली होती.
सकाळी स्वच्छ ऊन पडलं होतं.
झाडाखाली अस्ताव्यस्त घरट्याभोवती चिमणी चिवचिवाट करत होती.
तो तिच्या मागे फिरत होता. काही दिवस सगळच विस्कळीत.
एक दिवस अंगणात गजबज जाणवली.
पुन्हा एकदा चिमणा चिमणीला काड्या आणून देत होता.
कितीतरी वेळ तिनी दोघांची लगबग पाहिली. भानावर आल्यावर त्याला फोन केला.
"मला परत यायचंय, आपल्या घरी."
वाचने
6582
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
आवडली...
सुंदर!
मस्त.
छान लिहिलय
छान लिहिलंय !
सुंदर!
वाह. मस्तं.
गोड लिहिलय. आवडलं.
सुंदर! आवडलं!
सुबक आणि सुचक.
मस्त!
मस्तच
खरच सुंदर
मस्त.
चांगलीय कथा ..
तिने फोन केला .. इथपर्यंत अर्धा भाग झाला.
त्यावर त्याने काय आणि कसे उत्तर दिले .. यावर पुढचा भाग लिहा की
खुप छान. कथेचे तात्पर्य काय?
भारी.
सुंदर
मस्त!
दुसरा भाग येणार आहे का?
कथा आवडली..
आव॑डली कथा.
कथा आवडली.
छान कथा.
वा: मस्तच
अतिशय सुंदर
आवडली :)
सर्वांचे खूप आभार. :) सध्या हापिसात लयीच धूनी धूवायला लागत असल्यामुळे उत्तरार्ध लिहणे जमेल की नाही शंका आहे. :) आपल्यापैकी कुणी ही कथा पूर्ण केलीत तर माझी काहीच हरकत नाही. उलट आवडेल दुसऱ्या कुणाच्या द्रुष्टीकोनातून लिहलेला उत्तरार्ध वाचायला.:)
In reply to सर्वांचे खूप आभार. :) सध्या by रातराणी
कथा आणि उत्तरार्ध
दोन्ही आवडले
छान आहेत.
In reply to कथा आणि उत्तरार्ध by सुबोध खरे
धन्यवाद
भन्नाट लिहिले आहे.
शेवटची ओळ जबरदस्त.
मस्त