Skip to main content

मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 27/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत. मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून! या स्पर्धेच्या दोन फेर्‍या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्‍या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.
अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21444
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

मस्त कल्पना आहे ! सर्व इच्छुक स्पर्धकांना शुभेच्छा !

आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!
हायला ! ही कल्पना भन्नाटच आहे !! अभिनंदन आणि शुभेच्छा !!

नव्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. शुभेच्छा.

+१ :)

आयला शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!! (हिंट : पहिल्या फेरीत कथा अशी लिहावी की पुढे काय होईल हे कळून घेण्यासाठी लोकांनी तिला मते देऊन अंतिम फेरीत पोहचवावी)

In reply to by तुषार काळभोर

@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट देतात, तसा तुम्ही दिला की!! >> +++१११

या स्पर्धेच्या निमित्ताने खूप छान शतशब्द कथा वाचायला मिळतील. अतिवास यांचे हा एक अनोखा साहित्य प्रकार मिपा वर आणला या बदद्ल त्यांचे आभार.

माझी आधी प्रकाशित झालेली कथा देऊ शकतो का स्पर्धेत...?

In reply to by योगी९००

क्षमस्व!
स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
अर्थात नवीन कथा लिहू शकताच!

In reply to by उगा काहितरीच

आयडी नावामुळे आवडल्याचा प्रतिसाद भारी वाटतो - वा ! स्तुत्य उपक्रम . - उगा काहितरीच - वा ! स्तुत्य उपक्रम . :)

मस्तच कल्पना आहे. संभाव्य स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा

भन्नाट आयडीया.. खास करुन 'सीक्वल'ची. एक कथा आहे मेंदूत, ती टाकावी म्हणतो. अर्थात नामकरण केल्यानंतर दोनेक वर्षांनी आणि तीपण मिपावर शतशब्दकथांचा पुर आलेला असतांना, ती कितपत टिकाव ढरेल, ह्याबद्दल शंकाच आहे..

सिक्वेल हा प्र॑कार पटला नाही..! शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे. त्याऐवजी पुढच्या फेरीत नवीन शशक मागवावी.

In reply to by योगी९००

थोडासा असहमत..
शशक म्हणजे शंभर शब्दात संपणारी कथा...तेथे सिक्वेलला स्कोपच नसला पाहिजे.
हे मान्य असलं तरी अशी शतशब्दकथा लिहीणं, जी स्वतंत्रपण असावी, आणि गरज पडल्यास जिच्यातून आणखी एक शशक फुलवता यावी, हेच चॅलेंज आहे..

काही प्रश्न १. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ? २. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना . ३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत

In reply to by तुडतुडी

१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं हि त्याच्या आवडीची असतील कि संपादकांच्या ?
बजेट ठरलेलं असेल. विजेते बजेटमध्ये बसणारी आपल्या आवडीची पुस्तकं सुचवू शकतात.
२. "आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) लिहायचा आहे!" हा काय प्रकार आहे ? शतशब्दकथा म्हणजे ती १०० शब्दांत लिहून पूर्ण व्हायला हवी ना .
हेच तर आव्हान आहे. पहिल्या फेरीतली कथा १०० शब्दांत स्वयंपूर्ण तर असायला हवीच, पण त्या कथावस्तूत सीक्वल आणण्याएवढा जीव पाहिजे. तो सीक्वलही १०० शब्दांत बसवता आला पाहिजे.
३. "वाचकांना समजेल अशी " असा निकष आहे का ? कारण सध्या प्रकाशित होणार्या काही शतशब्दकथा आमच्या डोक्यावरून जाणार्या आहेत
वाचकांच्या मतांना ५०% महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा ;)

सिक्वलची आयडिया लय आवडलेली आहे.. थोडक्यात मुद्द्याचं बोलणं तसंही जमत नसल्याने वाचकाची भुमिका आनंदाने निभावण्यात येईल!

आणि स्पर्धेलाही शत्शत शुभेच्छा !!! छटाक नाखु

नमस्कार. शतशब्दकथा स्पर्धा सुरू केल्यासाठी अभिनंदन ! १) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां? २) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे? ३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत? 4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?

In reply to by अरुण मनोहर

१) स्पर्धे साठी एन्ट्री "जनातलं. मनातल" मध्येच टाकायची कां?
हो
२) कथेसाठी मत देण्याला नेहमीचा प्रतिसादाचच मार्ग आहे की, व्य.नी. वगैरे?
मत देण्यासाठी प्रतिसादात शक्यतो +१ लिहावे. छान, आवडले वगैरे लिहिलेली मतंही ग्राह्य धरली जातील, पण तरीही शक्यतोवर +१ लिहायची शिस्त पाळावी असे सुचवतो. ( - आदूगोपाल बजाज)
३) पहिल्या सहाच्या निवडीचे निकष काय आहेत?
पहिली फेरी: पहिल्या तीन कथा मतांच्या बेरजेवर ठरतील. उर्वरित कथांमधून परीक्षक तीन कथा निवडतील. अंतिम फेरी: वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन तीन विजेते निवडण्यात येतील.
4) (जर पहिल्या सहात आली), तर सिक्वेल शंभर शब्दातच हवा, की एका वाक्यात, वगैरे अशा काही अटी आहेत का?
हो. सीक्वेल शंभर शब्दांतच हवा.

शतशब्द २०- २० सुरू होतेय .......मात्र गोष्टींची जातकुळी ललित लेखासारखी नजाकतदार असणार ह्यात शंका नाही.... सगळ्या लेखकुंना शुभेच्छा !

कुठली कथा स्पर्धेसाठी आहे कुठली नाही हे कसं कळणार ? कि १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत लि प्रत्येक कथा स्पर्धेसाठी ग्राह्य असतील ?

In reply to by तुडतुडी

या कालावधीतली प्रत्येक कथा "बाय डिफॉल्ट" स्पर्धेत ग्राह्य धरली जाईल. लेखकाला कथा स्पर्धेत द्यायची नसेल तर तसे साहित्य संपादक मंडळापैकी कोणाला तरी कळवावे.

शुभेच्छा !! आणि शुद्धलेखन - ह्रस्वदीर्घ , विरामचिन्हे - साचा असे सगळे चारदा तपासून मगच प्रकाशित करावे असे सुचवतो!

In reply to by खेडूत

अनुमोदन आणि ज्यांना शुद्ध लेखन हा मुद्दा गौण वाटतो त्यांनी सोडल्य दह्यात मिश्या जे मोकलाया दाहि दिश्या चे विडंबन आहे नक्की बघावे

स्पर्धे साठी आलेल्या शाताशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करता येइल का? त्यामुळे कथा शोधून शोधून वाचाव्या लागणार नाहीत आणि मत द्यायला पण सोपे पडेल. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हेच लिहायला आले होते. सगळ्या शतशब्दकथा एकत्र दिसतील असे करावे. तसंही आजकाल शशक इतक्या येत असतात की त्याचा कायमचा वेगळा टॅब असला तरी हरकत नसावी.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खरंच स्पर्धेसाठी आलेल्या शतशब्द कथा एकाच ठिकाणी दिसतील अशी व्यवस्था करावी. एक शंका होती, प्रत्येक सदस्याला एकाच कथेला मत देता येईल की कितीही कथांना ?

खुपच अभिनव प्रयोग ! मराठी साहित्य क्षेत्रातील ह्या अभिनव प्रयोगाला शुभेच्छा :)

..कोणताही चालेल का?की त्याबद्दल काही मर्यादा आहेत?

.. सहजपणे शतशब्द्कथेच्या नावाखाली खपवला जाण्याची भीती वाटते आहे..

In reply to by निमिष सोनार

विषय कोणताही चालेल. खपवायला काय काहीही खपवता येईल. पण मत देणारे वाचक त्या खपाऊ मालाला कितपत आपलंसं करतील हा प्रश्नच आहे.

नव्या उपक्रमाबद्दल मिपा व्यवस्थापनाचे अभिनंदन. सिक्वल लिहायची कल्पना पटली नाही. कथा पूर्ण असली पाहिजे. दोन भाग झाले की एकच कथा दोन भागात लिहिल्यासारखे होते. कथा १०० भागात संपली पाहिजे असं माझं मत आहे. असो. लेखकांना शुभेच्छा :)

In reply to by आदिजोशी

>>>>कथा १०० भागात संपली पाहिजे हो ना! आम्ही किती भाग झाले 'होणार सून मी या घरची' संपायची वाट बघतोय. ;) मिपासाठी या निकषावर फ़क्त बुवांची सिरीज उतरते. १०० मध्ये संपवतील नक्की! (हलकं घ्या बुवा) आता एक सुचवणी : स्पर्धेसाठीची कुठलीही कथा अथवा छायाचित्रं ही लेखकाच्या/ छायाचित्रकाराच्या नावाशिवाय यावीत. एका विश्वासू व्यक्तीला व्यनि मार्फ़त कथा किंवा छायाचित्रं पोचाव्यात आणि नंतर एका ठराविक क्रमानं गोष्टी प्रकाशित व्हाव्यात. फ़क्त कथेसंबंधी अथवा छायाचित्रांसबंधी खरं मत त्यामुळे समजेल. आतादेखील बहुतांश तसंच होतं मात्र कुठेतरी 19 20 होतंच. लेखक कोण आहे? अमुक ढमुक म्हणजे कथा चांगलीच आहे असं होऊ नये असं वाटतं. यात गोपनीयतेमुळे नवीन लोकांचा फ़ायदा होऊ शकतो.

स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना- विजेत्याला पुस्तकाऐवजी कुपन द्यावे.(उदा.bookganga वर सोय आहे) विजेते आवडची पुस्तकी घेतील.(एक कथा पुर्वी लिहीली होती पण वेळेअभावी प्रकाशीत नाही. केली.आता या format मधे perfect बसेल)

वाचकांची मतं लक्षात घेताना केवळ +१ एवढच बघू नये . सगळ्यांचे प्रतिसाद लक्षात घ्यावेत . कृपया 'शीर्षकविहीन ( शतशब्दकथा-स्पर्धा-कथा)' ह्या कथेवरचा शब्दबम्बाळ ह्यांचा प्रतिसाद पहावा

In reply to by तुडतुडी

वाचकांची मतं लक्षात घेताना केवळ +१ एवढच बघू नये . सगळ्यांचे प्रतिसाद लक्षात घ्यावेत . कृपया 'शीर्षकविहीन ( शतशब्दकथा-स्पर्धा-कथा)' ह्या कथेवरचा शब्दबम्बाळ ह्यांचा प्रतिसाद पहावा
अर्रे व्वा.. म्हणजे 'निगेटीव्ह मार्किंग' का? ;-) आयडीयाची कल्पना चांगली आहे. ('निगेटीव्ह मार्कींग'प्रेमी) चिगो

बहुतेक सर्वच शशक दुसरा भाग लिहायचा असे मनात धरुन लिहिल्या जात आहे ! हे ही भारीच आहे कारण बहुतांश कथा उत्सुकता ताणण्यात यशस्वी ठरत आहेत . तेव्हा पहिल्या शशक वरुन इलिमिनेशन न करता +१ असा स्कोर ची बेरीज जाहीर करुन लीडर बोर्ड करावा अन मग दुसर्‍या भागातील +१ त्यात मिळवुन फायनल निर्णय घ्यावा ... काय सांगता... सुरुवातीला बोरिंग वाटलेल्या कथेचा दुसरा भाग तुफ्फान असेल तर !

In reply to by प्रसाद गोडबोले

हम्म. पुढच्या टायमाला करू हा प्रकार. लीडरबोर्डची आयड्या भारी आहे.
सुरुवातीला बोरिंग वाटलेल्या कथेचा दुसरा भाग तुफ्फान असेल तर !
स्पर्धा संपल्यावर भाग २ लिहायचं स्वातंत्र्य अर्थातच लेखकांना आहे.

१०० शब्द-मर्यादा: आतापर्यंत दोन कथा सोडता इतर कथांमध्ये कमी (८७ शब्दांची एक) वा आधिक शब्द (१०३-१२८) वापरले गेले आहेत. ज्यांच्या कथालेखनावरून स्फूर्ती घेऊन ही स्पर्धा सुरू झाली आहे त्या आतिवास यांच्या प्रत्येक कथेत १०० शब्दांचं बंधन काटेकोरपणे पाळलं गेलं आहे. लेखकांनी शंभर शब्दांचे बंधन काटेकोरपणे पाळायचा प्रयत्न करावा. तसेच, याचीही एक आठवण: सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल.

In reply to by आदूबाळ

आतिवास यांच्या प्रत्येक कथेत १०० शब्दांचं बंधन काटेकोरपणे पाळलं गेलं आहे.
ओह! हे माहीत नव्हते. सर्वांना शुभेच्छा! विजेत्या कथांव्यतिरीक्त इतर वेचक कथांना उजवीकडच्या रकान्यात वेगळी प्रसिद्धी दिली तर आवडेल. आंजी सारक्या नवीन पात्रांच्या प्रतिक्षेत.

In reply to by आदूबाळ

१०० शब्दांमध्ये फक्त शब्दच धरले जाणार की विराम चिन्हेही ? इंग्लिश शब्देही चालणार ना? धन्यवाद..

मिपाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्द्कथांच्या लिंक्स दिसत आहेत. इतर धागे शोधावे लागत आहेत. स्पर्धेतील सर्व शतशब्दकथा एका वेगळ्या ग्रुपमध्ये हलविता येतील का?

In reply to by श्रीगुरुजी

वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण स्पर्धेतील कथा त्या ग्रुपमध्ये आणि "नवीन लेखन" विभागात पण दिसत आहेत. त्यामुळे या कथा सोडून इतर धागे झाकोळले गेले आहेत. या कथा फक्त त्या ग्रुपमध्येच दिसाव्यात व "नवीन लेखन" मध्ये दिसू नयेत अशी सूचना आहे.

In reply to by dadadarekar

अंतिम फेरीत गेलेल्या सहा लेखकांचीच सीक्वल्स स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्वांनीच सीक्वल लिहिल्या तर स्वागत आहेच

In reply to by आदूबाळ

पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य लेखकांनी मूळ कथेच्या प्रतिसादातच सिक्वल लिहीला तर? (अन्यथा हे शंभर आणि ते शंभर असा धाग्यांचा गुंता होईल. शिवाय सिक्वल एकाच असावा असा नियम थोडाच आहे?)

कृपया पुढच्या वेळेला अशी कथांची स्पर्धा घेताना 'पहिल्या भागाचा अर्थपूर्ण शेवट ' हा निकष पण लावावा . दुसरी गोष्ट म्हणजे, पहिली कथा कैच्या कै . , दुसरी बरी , तिसरी चांगली , चौथी उत्कृष्ट असं होत असल्यामुळे लेखकाची शेवटची कथा लक्षात घेत येईल काय ?

In reply to by तुडतुडी

१००% सहमत. पहिली कथा अर्थपूर्ण असेल आणि शेवट कथेतच होत असेल तरच सिक्वेल बद्दल अंदाज बांधता येणार नाही. या गोष्टीचा विचार निकष साठी करावा.

अबब! पूरच आला आहे, शतशब्द कथांचा पाहता पाहता महोत्सव झालाय. दिवाळी अंका प्रमाणे मिपाने स्वातंत्र्य दिवस अंकाची तयारी करण्यास हरकत नाही.

एखादि कथा अशा रीतीने संपली कि सिक्वेल शक्यच नाही असे वाचकाला वाटायला हवे. आणि त्यानंतर सिक्वल लिहिण्यात लेखकाची खरी कसोटी लागेल. नाहीतर "आमची गाडी बंद पडली आणि सुनसान वाड्याचे दार किरकिरत उघडले … " इथे पहिली कथा संपणार आणि to be continued… सारखी दुसरीकथा (सिक्वेल) "समोर कंदील घेऊन एक म्हातारा उभा होता" अशा काहीशा वाक्याने सुरु होणार अशा कथांमध्ये पुढच्या भागाची उत्सुकता असली तरी तिला पूर्ण कथा म्हणता येईल का ?

कृपया सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा. कथेचा पहिला भाग रहस्यमय लिहून दुसऱ्या भागात तसे का घडले स्पष्टीकरण देणे याला सिक्वेल म्हणायचे का ?

In reply to by कहर

अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच देतील हो. प्रीक्वल सिक्वल समजणारे परीक्षक असणारच की. निदान ५० मार्क तरी त्यांच्या हातात असणारच. तुम्ही लिहा बिनधास्त.

कृपया ह्या शतशब्दकथांचे वेगळे पान बनविता येईल काय ? उदाहरणासाठी ऐसीवरचा भा.रा. भागवत विशेष अंक बघा. म्हणजे नेहमीचे इतर लेख व्यवस्थित वाचता येतील.

http://www.misalpav.com/comment/726016#comment-726016 ह्यावर संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादकांचे आणि नीलकांत चे काय मत आहे ? अन्य भाषातील साहित्य मिपावर चालेल का ?

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही . हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे मराठीचा आग्रह असलाच पाहिजे . अहो आपणच असं करायला लागलो तर आपल्या मराठीचं काय होणार ? आधीच पुढची पिढी इंग्लिशमय झालीये . :-( आणि फक्त मी पा वरच नै तर इतर वेळी सुधा आपण हटकून मराठीतच बोललं पाहिजे .

In reply to by तुडतुडी

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही
हे आपल्याला वाटते हो ! पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे ! काही माणसे उगाचच इथेही हिंडी रेट्ण्याचा प्रयत्न करतात , आपण त्यांच्याशी वाद घालु नये , आपण डायरेक्ट संपादकांकडे बोलावे , ते ठरवतील ! एक्गाद दुसरा ईम्ग्रजी हिंदी शब्द मराठीत आणणे निराळे अन हिंदी अख्खी भाषाच व्याकरणासकट मराठी संकेतस्थळावर रेटणे निराळे ! आपण वादात पडु नये ! संपादक ठरवतील काय ठरवायचे ते ! आता उद्या हिंदी किंव्वा इंग्रजी किंव्वा उर्दु लेखनाला मिपावर परवानगी मिळाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही अन्य भाषातही लिहितोच की :)

पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे !>>> महाराज मी पा काय फक्त संपादक मंडळ आणि नीलकांत च्या जीवावर चालतं का ? आणि मी त्यांच्याशीच बोलतेय तुम्हाला मी कुठं काय म्हणलाय का ? तुम्ही कशाला वादात पडताय ?

१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं शब्द असणार्‍या कथा स्पर्धेमधुन बाद केल्या जाव्यात. लेखकांना कुठल्याही प्रकारचा बदल संपादक अथवा साहित्य संपादक मंडळाने करुन देउ नये. अपवाद नावामधे [शतशब्दकथा स्पर्धा] असा फ्लॅग टाकणे. हि स्पर्धा आहे. नो सेकंड चान्स.

डु आयडीने बक्षिस मिळवल्यास त्याला ते कसे देणार ? ....की त्यालाच तडीपार करणार ?