मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा
लेखनप्रकार
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.
मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!
या स्पर्धेच्या दोन फेर्या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
वाचने
21431
वाचनखूण
प्रतिक्रिया
101
मस्त कल्पना आहे !
वाचकांसाठि ही तर पर्वणीच कि
सीक्वल!
शुभेच्छा
मस्तच कल्पना . +1
+१ :)
क्या बात है !
आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!)
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
@शशक मध्ये जसा एण्डला ट्विस्ट
In reply to आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) by तुषार काळभोर
कटप्पा ने बाहुबली को.... ;)
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.
आपण नै रे भौ.
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
खुद को कर बुलंद इतना...
In reply to आपण नै रे भौ. by पगला गजोधर
चांगल्या लेखनाला मिपावर
चांगल्या लेखनाला मिपावर कंपूच्या कुबड्यांची गरज पडत नाही !मस्त. मी तर प्रिक्वल पण देऊ
बक्षीस म्हणून 'मिसळ -पाव ' कूपन पण दया
नै पण परीक्षक कोण आहे ते
माझी जुनी कथा...
In reply to माझी जुनी कथा... by योगी९००
क्षमस्व!
वा ! स्तुत्य उपक्रम .
In reply to वा ! स्तुत्य उपक्रम . by उगा काहितरीच
आयडी नावामुळे आवडल्याचा
+१ छान उपक्रम
झक्कास कल्पना..
ह्यानिमित्ताने..
सिक्वेल..?
In reply to सिक्वेल..? by योगी९००
थोडासा असहमत..
उत्तम कल्पना
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by तुडतुडी
१. विजेत्याला मिळणारी पुस्तकं
सिक्वलची आयडिया लय आवडलेली
सर्वं स्पर्धकांना शुभेच्छा!
भन्नाट !!
श्शक्ला
नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन
नमस्कार! आजपासून शतशब्दकथा
आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष
In reply to आज लिहितो एक (बिरुटे सर लक्ष by कॅप्टन जॅक स्पॅरो
हाहा
काही प्रश्न आहेत.
In reply to काही प्रश्न आहेत. by अरुण मनोहर
१) स्पर्धे साठी एन्ट्री
चला...कामाला लागले पाहिजे...
कुठली कथा स्पर्धेसाठी आहे
In reply to कुठली कथा स्पर्धेसाठी आहे by तुडतुडी
या कालावधीतली प्रत्येक कथा
शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा !! by खेडूत
अनुमोदन
एक सुचना....
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
हेच लिहायला आले होते.
In reply to एक सुचना.... by ज्ञानोबाचे पैजार
अगदी !!
In reply to अगदी !! by नीलमोहर
कितीही कथांना मत देता येईल.
खुपच अभिनव प्रयोग !
कथेचा विषय..
एखादा विनोद हा ...
In reply to एखादा विनोद हा ... by निमिष सोनार
विषय कोणताही चालेल.
अभिनंदन
In reply to अभिनंदन by आदिजोशी
>>>>कथा १०० भागात संपली
स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना-
लय भारी़़़
पाहूया लिहून जमतंय का ते
वाचकांची मतं लक्षात घेताना
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
होय.
In reply to वाचकांची मतं लक्षात घेताना by तुडतुडी
अरे व्वा..
छोटीशी विनंती!
In reply to छोटीशी विनंती! by प्रसाद गोडबोले
हम्म. पुढच्या टायमाला करू हा
१०० शब्द-मर्यादा:
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शुभेच्छा!
In reply to १०० शब्द-मर्यादा: by आदूबाळ
शंका
In reply to शंका by नीलमोहर
फक्त शब्दच. विरामचिह्ने शंभर
मिपाच्या पहिल्या पानावर फक्त
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
अनुमोदन
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर फक्त by श्रीगुरुजी
वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण
सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?.
In reply to सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?. by dadadarekar
अंतिम फेरीत गेलेल्या सहा
In reply to अंतिम फेरीत गेलेल्या सहा by आदूबाळ
पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य
कृपया पुढच्या वेळेला अशी
In reply to कृपया पुढच्या वेळेला अशी by तुडतुडी
१००% सहमत. पहिली कथा
अबब! पूरच आला आहे, शतशब्द
पहिली कथा पूर्ण हवी
सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा
In reply to सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा by कहर
अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच
कृपया
http://www.misalpav.com
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
In reply to मला वाटतं एखाद दुसरं वाक्य by तुडतुडी
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
पण इथे संपादक मंडळ आणि
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to पण इथे संपादक मंडळ आणि by तुडतुडी
मी पा नाही मिपा. बाकी किती
१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं
एक शंका.......
In reply to एक शंका....... by माम्लेदारचा पन्खा
डु बक्षीस देणार
In reply to डु बक्षीस देणार by आदूबाळ
आणि तेक्काय बुवा?
डू आयडी वर आणिक शशका वर चर्चा